28 October 2020

News Flash

एमपीएससी मंत्र : नोबेल पुरस्कार २०२०

हिपॅटायटीस सी विषाणू शोधाचा सन्मान

हिपॅटायटीस सी विषाणू शोधाचा सन्मान

फारुक नाईकवाडे

सन २०२०चा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार हिपॅटायटीस सी विषाणूच्या शोधासाठी तीन शास्त्रज्ञांना एकत्रितपणे देण्यात आला. कोविड १९ या करोना वर्गातील नव विषाणूशी सामना करण्यामध्ये सगळे जग गुंतले असताना सन १९७०च्या दशकामध्ये रक्तसंक्रमित यकृतदाहाचे कारण असलेल्या हिपॅटायटीस सी  या तेव्हाच्या नव विषाणूचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांना हा पुरस्कार देणे समयोचित ठरले आहे. याबाबत परीक्षोपयोगी मुद्द्यांबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

यकृतदाह किंवा यकृताच्या कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या या नव्या विषाणूशी संबंधित संशोधनादरम्यान वेगवेगळ्या टप्प्यावर या तिघांचे वेगवेगळे योगदान आहे. हिपॅटायटीस ए आणि बी व्यतिरिक्त अन्य कुठल्या तरी कारणाने हे गंभीर आजार उद्भवत आहेत हे समजून त्यांचे निदान, उपचार आणि रक्तातून संक्रमण होऊ नये यासाठी (प्रतिबंधासाठी) प्रयत्न या शास्त्रज्ञांच्या शोधामुळे शक्य  झाले. या शास्त्रज्ञांचे पुरस्कारपात्र कार्य पुढीलप्रमाणे:

हार्वे जे. आल्टर

सन १९६०च्या दशकामध्ये काविळी (Jaundice), यकृतदाह (hepatitis) व यकृताच्या अन्य गंभीर तक्रारींसाठी हिपॅटायटीस ए आणि बीव्यतिरिक्त अन्य कुठले तरी कारण आहे हे सिद्ध केले. या आजारास Non A Non B Hepatitis – NANBH असे नाव देण्यात आले. हा आजार रक्त संक्रमणाच्या माध्यमातून होतो  हेही सिद्ध केले.

मायकेल ह्यूटन

यकृतदाहास कारणीभूत ठरणाऱ्या आल्टर यांनी शोधलेल्या NANBH च्या रुग्णांच्या डीएनएच्या विश्लेषणातून हिपॅटायटीस सी विषाणूचा आरएनए वेगळा केला. हा खऱ्या अर्थाने या विषाणूचा ‘शोध’ होता. फ्लॅविव्हायरस प्रजातीतील हा विषाणू तेव्हा कोणास माहीत नसल्याने नवविषाणू म्हणून नोंदविण्यात आला.

चार्ल्स राईस

जनुक अभियांत्रिकीचा वापर करून या विषाणूच्या पुनरुत्पादनाचे कारण शोधले व यकृताच्या गंभीर समस्यांसाठी हाच विषाणू कारणीभूत असल्याचे सिद्ध केले.

शोधांचे महत्त्व

* जगभरामध्ये ऌकश् आणि क्षयरोग अशा सर्वाधिक गंभीर आजारांइतकेच रक्त संक्रमित यकृतदाहामुळे (Blood—borne hepatitis) आजारी आणि मृत्यू पावणाऱ्या रुग्णांचे प्रमाण चिंताजनक आहे. जगभरामध्ये दरवर्षी ७१ दशलक्ष लोकांना हिपॅटायटीस सी विषाणूची लागण होते व त्यामुळे यकृतदाह (hepatitis) आणि यकृताचा ऱ्हास/काठिण्य(Cirrhosis) तसेच कर्करोग (Cancer)असे गंभीर आजार उद्भवणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय असते.

* या तिन्ही शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे हिपॅटायटीस सी विषाणूच्या निदानासाठी उच्च दर्जाची निदान चाचणी आणि या रोगावरील विषाणूप्रतिरोधक उपचार शोधणे शक्य झाले यासाठी हा पुरस्कार त्यांना एकत्रितपणे देत असल्याचे पुरस्कार समितीने नमूद केले आहे.

आनुषंगिक मुद्दे

* बरुच ब्लूमबर्ग रक्तातून संक्रमित होणाऱ्या हिपॅटायटीस बी या विषाणूच्या संशोधनासाठी सन १९७६ चा वैद्यक क्षेत्रातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. या शोधामुळे हिपॅटायटीस बी विषाणूच्या निदानाची चाचणी  आणि लस तयार करणे शक्य झाले यासाठी हा पुरस्कार देण्यात आला.

यकृतदाहास कारणीभूत हिपॅटायटीस विषाणू

* जागतिक आरोग्य संघटनेनुसार एकूण पाच प्रकारचे हिपॅटायटीस विषाणू यकृतदाहास कारणीभूत ठरतात. Hepatitis A, B, C, D, E असे हे पाच प्रकार आहेत. यातील अ आणि ए हे विषाणू संक्रमित पाणी आणि अन्नाच्या माध्यमातून पसरतात. तर B, C, D या विषाणूंचा संसर्ग पचनमार्गाव्यतिरिक्त अन्य माध्यमातून विशेषत: रक्तसंक्रमणाच्या माध्यमातून होतो.

* Hepatitis A मुळे उद्भवणारा आजार तुलनेने कमी काळात बरा होतो. तर Hepatitis B आणि C मुळे  उद्भवणारे आजार हे जास्त गंभीर आणि तीव्र असतात.

* Hepatitis A आणि B वरील लस उपलब्ध आहे. तर अन्य प्रकारांवरील लस अद्यापि उपलब्ध नाही.

नव विषाणू (Novel Virus)

कोविड १९ विषाणूचा उल्लेख बरेच वेळा Novel Corona Virus असा करण्यात येतो. हिपॅटायटीस सीच्या शोधावरील पुरस्कारामध्येही समितीने Novel विषाणूच्या शोधाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे साधा आणि Novel – नवविषाणू यातील फरक हा प्रश्नाचा मुद्दा होऊ शकतो. एखाद्या ज्ञात संवर्ग/ वर्गातील माहीत नसलेल्या प्रजातीचा शोध लागतो त्यावेळी तिचा उल्लेख नव Novel प्रजाती असा करण्यात येतो. त्यामुळे हिपॅटायटीस सी किंवा सध्याचा कोविड १९ या विषाणूंचा उल्लेख Novel या विशेषणाने केला गेला आहे.

भारतातील यकृतदाहाची स्थिती व आकडेवारी.

* भारतामध्ये दरवर्षी ४० दशलक्ष लोकांना हिपॅटायटीस बीचा तीव्र संसर्ग होतो तर किमान सहा ते कमाल १२ दशलक्ष लोकांना हिपॅटायटीस सीचा तीव्र संसर्ग होतो.

* भारताच्या सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमामध्ये देण्यात येणाऱ्या १२ लसींमध्ये हिपॅटायटीस बीवरील लसीचा समावेश करण्यात आला आहे.

* सन २०१८मध्ये राष्ट्रीय विषाणूजन्य यकृतदाह नियंत्रण कार्यक्रम National Viral Hepatitis Control Programme (NVHCP) सुरूकरण्यात आला आहे. हिपॅटायटीस सीचे सन २०३०पर्यंत उच्चाटन करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हिपॅटायटीस बी आणि सीच्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण कमी करणे तसेच हिपॅटायटीस ए आणि सीच्या संसर्गाचे प्रमाण आणि जोखीम कमी करणे हे उद्देशसुद्धा या कार्यक्रमामध्ये समाविष्ट आहेत.

* सामान्य भारतीयांना हिपॅटायटीस बीवरील लस कमी किमतीत उपलब्ध व्हावी यासाठी शांता बायोटेक्निक या भारतीय कंपनीने भारतातील पहिली  recombinant DNA—based » विकसित केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 12:01 am

Web Title: mpsc exam prepration tips nobel prize 2020 zws 70
Next Stories
1 यूपीएससीची तयारी :  आर्थिक विकास
2 एमपीएससी मंत्र : वेतन संहिता २०१९
3 यूपीएससीची तयारी : आर्थिक विकास – अनुदाने आणि संबंधित मुद्दे
Just Now!
X