एमपीएससी मंत्र : रोहिणी शहा

दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ५ मे २०२० रोजी होत आहे. या लेखापासून या परीक्षेच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे. संयुक्त पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी या घटकाबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यावर चालू घडामोडी या घटकाचा अभ्यास कसा करावा त्याची दिशा ठरवता येते. त्यासाठी आयोगाने विचारलेले काही प्रातिनिधिक प्रश्न पाहू. (या प्रश्नातील  योग्य उत्तराचा पर्याय ठळक केलेला आहे.)

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
When will the delayed MPSC exams be held The commission told reason
‘एमपीएससी’च्या लांबलेल्या परीक्षा कधी होणार? आयोगाने सांगितले कारण…
Analysis on Environmental Component in Gazetted Civil Services Joint Pre Examination and State Services Pre Examination
Mpsc मंत्र: पर्यावरण घटक

    प्रश्न १. मरीयप्पन थांगावेलू यांच्या बाबतीत खालील विधानांचा विचार करा.

अ.      तो भारतीय पॅरालिम्पिक उंच उडीपटू आहे.

ब.      रिओ दी जनेरीओ येथे भरलेल्या सन २०१६च्या समर पॅरालिम्पिक खेळात त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले.

क.      तो पॅरालिम्पिक उंच उडीमध्ये सुवर्णपदक प्राप्त करणारा पहिला भारतीय होय.

योग्य पर्याय निवडा.

१) अ, ब

२) ब, क

३) अ, क

४) वरील सर्व

   प्रश्न २. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या विविध पुढाकारांपकी पुढे दिलेल्या पुढाकारांच्या पर्यायांपकी चुकीचा पर्याय कोणता आहे ते सांगा.

१)      प्रसाद – प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांच्या येथे भाविकांना नि:शुल्क अन्न वितरण

२)      हृदय – भारताच्या वारसा असणाऱ्या शहरांचे जतन आणि नवजीवन घडविणे.

३)      इनक्रेडिबल इंडिया २.० – भारतात पर्यटनाचा विकास घडविणे.

४)      पर्यटनस्थानी ई-तिकिटांची सुविधा – ताजमहाल आणि हुमायूनची कबर येथे सुरुवात.

 

    प्रश्न ३. भारताने सुरू केलेले ई-चरक हे पोर्टल कशाशी संबंधित आहे?

१)      ऑनलाइन आयुर्वेद औषधालय.

२)      ऑनलाइन आयुर्वेदाविषयीचे मासिक.

३)      ऑनलाइन आयुर्वेदाच्या औषधासंबंधीचे मार्गदर्शन.

४)      ई चॅनेल वनौषधी, सुगंधी, कच्चामाल आणि आयुर्वेदाचे ज्ञान यासाठी

 

 प्रश्न ४. डिसेंबर २०१७ मध्ये युनेस्कोच्या समितीने खालीलपकी कशाला ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा’ ((Intangible Cultural Heritage) म्हणून मान्यता दिली आहे?

१) योगा                  २) कुंभमेळा

३) रामलीला   ४) छाऊ नृत्य

 

प्रश्न ५. पुढील विधानांपकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त ते लिहा.

अ.  सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील मद्यविक्रीवर बंदी आणली आहे.

ब.  ही बंदी पुढील वर्षी एक एप्रिलपर्यंत अमलात आणायची असून याद्वारे महामार्गाच्या बाजूने १००० मीटर अंतरावर असणारी मद्यविक्रीची दुकाने बंद करण्यात येतील.

पर्यायी उत्तरे

१) फक्त अ

२) फक्त ब

३) अ आणि ब दोन्ही

४) अ आणि ब दोन्हीही   नाही

प्रश्न ६. महाराष्ट्र शासनाचा यंदाचा डॉ. अशोक केळकर यांच्या नावाने दिला जाणारा भाषा अभ्यासक पुरस्कार नुकताच कोणाला देण्यात आला?

१) डॉ. रंगनाथ पाठारे                           २) डॉ. मिलिंद जोशी

३) डॉ. अविनाश बिनिवाले

४) डॉ. अशोक कामत

 

प्रश्न ७. अग्नी-५ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची लक्ष्यवेधाची क्षमता किती आहे?

१) ५,००० – ५,५०० किमी

२) ३,५०० किमी

३) ७,५०० किमी

४) १०,००० किमी

 

या घटकाबाबत मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून पुढील मुद्दे लक्षात येतात :

अभ्यासक्रमामध्ये जागतिक आणि भारतातील चालू घडामोडी असा उल्लेख आणि ढोबळ वर्गीकरण केलेले असले तरी या घटकामध्ये बऱ्याच व्यापक बाबी समाविष्ट होतात. यामध्ये राज्यातील चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान स्वरूपाचे प्रश्नही समाविष्ट आहेत. उदाहरणार्थ राज्य महिला आयोगाच्या कार्याबाबत, तसेच साहित्य अकादमीबाबत पारंपरिक मुद्दे विचारण्यात आले आहेत. तसेच राज्यातील व्यक्ती विशेष तसेच पुरस्कार विचारण्यात आले आहेत.

आंतरराष्ट्रीय ते राज्य स्तरावरील विविध पुरस्कार, ते मिळवणाऱ्या व्यक्तींची इतर माहिती, पुरस्कार देणाऱ्या संस्था/ संघटना यांवर प्रश्न विचारण्यात आले आहेत.

क्रीडा क्षेत्रावरील प्रश्न हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आहेत.

केंद्र व राज्य शासनाचे उपक्रम, योजना यांवरील प्रश्न नेमकी तरतूद विचारणारे आहेत.

राज्यव्यवस्था घटकावर न्यायालयीन निर्णय, चच्रेतील कायदे/विधेयके, चच्रेतील मुद्दय़ाबाबतची राज्यघटनेतील तरतूद असे मुद्दे विचारलेले दिसतात.

पर्यावरण आणि भूगोल या घटकाबाबत लक्षणीय घटना घडली असेल त्या वर्षी नेमकी माहिती विचारणारे आणि विश्लेषणात्मक प्रश्न समाविष्ट करण्यात आले आहेत.

बहुविधानी प्रश्नांमध्ये तथ्यात्मक माहितीवर आधारित पर्याय विचारण्याचे प्रमाण जास्त आहे. तर सरळसोट प्रश्न हे नेमकी माहिती असल्यास पटकन सोडवता येतील अशा काठिण्य पातळीचे आहेत. विश्लेषणात्मक मुद्दे विचारण्याचे प्रमाण कमी आहे. मात्र कोणत्या वर्षी कोणत्या प्रकारच्या प्रश्नांवर भर देण्यात येईल याबाबत खात्री नसल्याने या घटकाची तयारी पारंपरिक, तथ्यात्मक आणि विश्लेषणात्मक अशा सगळ्याच मुद्दय़ांचा समावेश होईल, अशा प्रकारेच करणे व्यवहार्य ठरेल.