24 October 2020

News Flash

सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून विविध विभागातील पदांवर भरतीसाठी परीक्षा आयोजित करण्यात येतात.

एमपीएससी मंत्र : रोहिणी शहा

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून विविध विभागातील पदांवर भरतीसाठी परीक्षा आयोजित करण्यात येतात. राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या अखत्यारीतील तांत्रिक पदांवरही आयोगाकडून भरती करण्यात येते.  यापकी सहायक मोटार वाहन निरीक्षक  या गट क संवर्गातील पदांच्या भरतीबाबत या आणि पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येणार आहे.

पदाचा तपशील    संवर्ग – अराजपत्रित, गट – क नियुक्तीचे ठिकाण – महाराष्ट्रात कोठेही

उच्च पदावर बढतीची संधी – ज्येष्ठता व पात्रतेनुसार परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक आणि त्यापुढील संवर्ग.

परीक्षा योजना

परीक्षा खालील दोन टप्प्यात घेण्यात येते

 पूर्व परीक्षा – १०० गुण. (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूप)

मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी उमेदवारांची संख्या सिमित करण्यासाठी पूर्व परीक्षा घेण्यात येते. पूर्व परीक्षेसाठी आयोगाने विहित केलेल्या किमान सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांस मुख्य परीक्षेसाठी पात्र समजण्यात येते. गुणांकनामध्ये २५ टक्के नकारात्मक गुणपद्धती लागू करण्यात आली आहे.

   मुख्य परीक्षा – ३०० गुण. (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूप)

मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारावर अंतिम निकाल व निवडीची शिफारस करण्यात येते.

गुणांकनामध्ये २५टक्के नकारात्मक गुणपद्धती आणि किमान गुणरेषा ठरविण्यासाठी शतमत पद्धत लागू करण्यात आली आहे.

       अर्हता

 • शैक्षणिक अर्हता
 • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा महाराष्ट्र शासनाने एस. एस. सी. च्या समतुल्य म्हणून घोषित केलेली अर्हता, आणि
 • माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर स्वयंचल अभियांत्रिकी (Automobile Engineering) वा यंत्र अभियांत्रिकी ((Mechanical Engineering) विषयातील किमान
 • वर्षांची पदविका वा केंद्र वा राज्य शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली पदवी / पदविका.
 • स्वयंचल अभियांत्रिकी वा यंत्र
 • अभियांत्रिकी विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा त्यापेक्षा उच्च अर्हता धारण केलेले वा केंद्र वा राज्य शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेल्या अर्हता धारण केलेले उमेदवारसुद्धा पात्र आहेत.

वरील अर्हतांना समतुल्य शैक्षणिक अर्हता म्हणून पुढील पदवी/पदविका स्वीकारार्ह आहेत.

 • डिप्लोमा इन प्रॉडक्शन टेक्नॉलॉजी
 • डिप्लोमा इन मेटलर्जी
 • डिप्लोमा इन प्रॉडक्शन इंजिनीअिरग
 • बॅचलर डिग्री इन मेकॅनिकल इंजिनीअरिंग
 • डिप्लोमा इन मशिन टूल्स मेन्टेनन्स
 • बॅचलर डिग्री इन ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग
 • डिप्लोमा इन फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी
 • बॅचलर डिग्री इन प्रॉडक्शन इंजिनीअरिंग
 • डिप्लोमा इन फॉब्रिकेशन अँड इरेक्शन इंजिनीअिरग
 • बॅचलर डिग्री इन इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंग
 • डिप्लोमा इन प्लॅन्ट इंजिनीअरिंग

  अनुभव

 • उमेदवारांनी मुख्य परीक्षेकरिता अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास त्यांच्याकडे हलकी मोटार वाहने, जड मालवाहू वाहने व जड प्रवासी वाहने यांचे दुरुस्ती व देखभाल करण्याचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून केंद्र अथवा राज्य शासनाच्या विभागामध्ये वा अंगीकृत व्यवसायांचे अखत्यारीतील यंत्रशाळामध्ये अथवा शासन वेळोवेळी निर्देशित करेल अशा संस्थांमध्ये घेतलेला किमान एक वर्ष कालावधीचा अनुभव असणे आवश्यक आहे. वरील ठिकाणी प्रशिक्षाणार्थी अथवा अ‍ॅप्रेंटिस म्हणून घेतलेला अनुभव यासाठी गृहित धरला जातो.
 • ज्या उमेदवारांना किमान एक वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून अनुभव नसेल अशा उमेदवारांनी नियुक्तीनंतर परिविक्षाधीन कालावधीमध्ये शासनाच्या विभागात अथवा अंगीकृत व्यवसायामध्ये अथवा शासन वेळोवेळी निर्देशित करेल अशा संस्थांमध्ये किमान १ वर्ष कालावधीचा अनुभव घेणे बंधनकारक असते.

 

   इतर

 • उमेदवारांनी मुख्य परीक्षेकरिता अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास त्यांच्याकडे गिअर्स असलेली मोटार सायकल, हलके मोटार वाहन आणि परिवहन वाहन (जड मालवाहू वाहन आणि जड प्रवासी वाहन) या संवर्गातील वाहन चालविण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेली वैध अनुज्ञप्ती (License) असणे आवश्यक आहे.
 • मुख्य परीक्षेकरिता अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास अशी अनुज्ञप्ती उमेदवाराकडे नसेल तर नियुक्तीनंतरच्या दोन वर्षांच्या परिविक्षा कालावधीमध्ये प्राप्त करणे बंधनकारक आहे अन्यथा उमेदवारास सेवेतून कमी करण्यात येते.
 • उमेदवार रंगांध नसावा आणि त्याची दृष्टी चष्म्यासह किंवा चष्म्याशिवाय चांगली असायला हवी.
 • उमेदवारांना मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणे आवश्यक आहे.
 • शालान्त परीक्षा मराठी आणि हिंदी विषयासह न दिलेल्या उमेदवारांनी तसेच मुख्य परीक्षेपर्यंत संगणक हाताळणी प्रमाणपत्र प्राप्त न केलेल्या उमेदवारांनी निवड झाल्यानंतर याबाबतच्या परीक्षा विहीत कालावधीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
 • परिविक्षाधीन कालावधी संपल्यावर किमान पाच वष्रे परिवहन विभागात काम करण्याचे बंधपत्र सादर करणे आवश्यक आहे.
 • परीक्षेची सविस्तर योजना आणि अभ्यासक्रमाबाबत पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येईल.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2019 6:09 am

Web Title: mpsc exam study akp 94
Next Stories
1 आर्थिक विकास
2 कर सहायक पदनिहाय पेपरची तयारी
3 तंत्रज्ञान, आर्थिक विकास आणि इतर
Just Now!
X