एमपीएससी मंत्र : रोहिणी शहा

राज्यसेवा पूर्वपरीक्षा एप्रिलमध्ये प्रस्तावित आहे. या लेखापासून पूर्वपरीक्षेच्या प्रश्न विश्लेषणाच्या आधारे तयारी कशी करावी याबाबत चर्चा करण्यात येईल. या लेखामध्ये इतिहास घटकाचे मागील तीन वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण व त्या अनुषंगाने अभ्यास करताना विचारात घ्यायचे मुद्दे याबाबत चर्चा करण्यात येत आहे.

हिंदु ‘महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह भारताचा इतिहास आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ’ मागील तीन वर्षांमध्ये विचारलेले प्रातिनिधिक प्रश्न पाहू.(या प्रश्नांतील योग्य उत्तराचा पर्याय ठळक केलेला आहे.)

 

   प्रश्न १.  खालीलपकी कोणत्या बौद्ध ग्रंथात सोळा महाजन पदांचा उल्लेख आहे?

१) अंगुत्तर निकाय

२) प्रज्ञा पारमिता सूत्र

३) नीतिशास्त्र

४) दीर्घ निकाय

 

 प्रश्न २. टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगापट्टनच्या तहात पुढीलपकी कोणती तरतूद नव्हती?

१) टिपूने युद्धखर्च म्हणून इंग्रजांना साडेतीन कोटी द्यावेत.

२) टिपूने आपले निम्मे राज्य इंग्रजांना द्यावे.

३) टिपूची दोन मुले इंग्रजांकडे ओलीस  राहतील.

४) टिपूने तनाती फौजेचा स्वीकार करावा.

 

 प्रश्न ३- पुढील घटनांची त्यांच्या कालानुक्रमानुसार मांडणी करा.

अ. ढाक्यात मुस्लीम लीगची स्थापना

ब. खुदीराम बोस यांचा देहांत.

क. लॉर्ड हार्डिग्जवर बॉम्ब फेकला.

ड. सर प्रफुल्लचंद्र चॅटरजी यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर येथे हिंदू परिषद भरविण्यात आली.

पर्यायी उत्तरे

१) अ, ब, क, ड        २) ब, अ, ड, क                  ३) अ, ब, ड, क        ४) अ, ड, ब, क

 

प्रश्न ५. खालील विधानांचा विचार करा व योग्य पर्यायाची निवड करा.

अ.      मोगलकालीन स्थापत्य कला भारतीय शैलीची आहे.

ब.      मोगलकालीन स्थापत्य कलेवर पíशयन व हिंदु अशा दोन्ही कलांचा प्रभाव आहे.

क.      मोगलकालीन स्थापत्य कलेवर विदेशी प्रभाव आहे.

ड.      मोगलकालीन स्थापत्य शैलीवर कोणाचाच प्रभाव नाही.

पर्यायी उत्तरे

१) अ विधान बरोबर आणि ब, क, ड चुकीची

२) ब आणि ड विधाने बरोबर तर क आणि   ड चुकीची

३) अ, ब आणि क विधाने बरोबर असून   ड चुकीचे

४) ड विधान बरोबर तर अ, ब, क चुकीची

 

प्रश्न ६. पुढील वाक्यात वर्णन केलेले समाजसुधारक कोण ते ओळखा.

अ.      जाती व्यवस्थेचा धिक्कार करणाऱ्या कबीराच्या शिकवणुकीवर त्यांच्या कुटुंबाचा विश्वास होता.

ब.      त्यांचे वडील सन्यात होते आणि ते सुभेदार- मेजर म्हणून निवृत्त झाले होते.

क.      त्यांच्या शाळेतील शिपाईबाईंना त्यांचे दप्तरही अस्पृश्य वाटे.

ड.      ते अस्पृश्य असल्यामुळे संस्कृत शिकू शकले नाहीत.

१) महात्मा जोतिबा फुले

२) श्री. जवळकर

३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

४) श्री. घोलप

 

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून पुढील मुद्दे लक्षात घ्यावे लागतील.

  •  एकूण १५ प्रश्नांपकी प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक कालखंडासाठीची प्रश्न संख्या निश्चित नाही. त्यामुळे सर्व कालखंडांची तयारी गांभीर्याने करणे गरजेचे आहे. मात्र आधुनिक कालखंडातील भारतीय राष्ट्रीय चळवळीचा अभ्यासक्रमामध्ये उल्लेख असल्याने याबाबतची तयारी जास्त बारकाईने करणे आवश्यक आहे.
  •  प्राचीन इतिहासातील प्रश्नांमध्ये प्रागतिहासिक इतिहासावरील प्रश्नांचाही समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रागतिहासिक उत्खनन स्थळांवर भर देऊन भारतातील प्रागतिहासिक इतिहासाचा आढावा घेणे पुरेसे ठरेल.
  •  प्राचीन इतिहासाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पलूंवर प्रश्न विचारण्याचे प्रमाण जास्त आहे. यातील वैदीक, उत्तरवैदीक आणि संगम साहित्यावर आणि सिंधु संस्कृतीतील पुरातात्विक अवशेष यांवर प्रश्न विचारण्याचा भर जास्त आहे.
  • मध्ययुगीन इतिहासाच्या सामाजिक-आíथक व सांस्कृतिक पलूंवर भर असला तरीही राजकीय इतिहासावरही प्रश्नांचा समावेश लक्षणीय आहे. उत्तर व दक्षिण भारतातील स्थापत्य आणि शिल्प व दृष्यकलांचा आढावा घेणे उपयुक्त ठरते.
  •  आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये राष्ट्रीय चळवळ हा भाग अभ्यासक्रमामध्ये स्वतंत्रपणे विहीत केलेला आहे. त्यामध्ये १८५७च्या उठावापासूनच्या स्वातंत्र्य चळवळी आणि त्या काळातील काँग्रेससह सर्व राजकीय पक्ष, संघटना, क्रांतिकारी चळवळी यांचा विचार करण्यात आलेला दिसतो.
  •  आधुनिक काळातील स्वातंत्र्य चळवळीव्यतिरिक्त देशातील समाजसुधारणा, सामाजिक संस्था संघटना, आíथक प्रगती यांबाबतही प्रश्न समाविष्ट आहेत.
  •  प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडातील राज्यकत्रे / इतिहासकार/ साहित्यकार आणि आधुनिक कालखंडातील समाजसुधारक आणि राजकीय व्यक्तिमत्त्वे यांवर बहुविधानी प्रश्न विचारलेले दिसतात.  या विश्लेषणाच्या आधारावर या घटकाची तयारी कशा प्रकारे करावी याची चर्चा पुढील लेखामध्ये करण्यात येत आहे.