इ.स.पूर्व सहाव्या शतकात राजसत्तांचा प्रभाव कमी होऊन गणराज्यांचे प्रभुत्व वाढत गेले. जनपदाची जागा महाजनपदांनी घेतलेली दिसते. उत्तर भारतातील सप्तनद्यांच्या परिसरापासून ते महाराष्ट्रातल्या गोदावरी नदीच्या खोऱ्यापर्यंतच्या विस्तृत प्रदेशांत ही महाजनपदे विखुरलेली होती.
०    इसवीसनपूर्व सहाव्या शतकातल्या भारतातील राजकीय स्थितीचे अत्यंत स्पष्ट असे विवेचन महापरिनिर्वाणसूत्र या बौद्ध ग्रंथात आढळते.
०    सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या जन्मापूर्वी काही काळ उत्तर भारतात काही प्रबळ अशी महाजनपदे उदयाला आली. या महाजनपदांची माहिती अंगुत्तरनिकाय, दिघनिकाय या निकाय ग्रंथांतून, दीपवंश आणि महावंश या महाकाव्यातून आणि महापरिनिर्वाणसूत्र या ग्रंथातून आढळते.
०    तत्कालीन भारतात एकूण १६ महाजनपदे, काही गणराज्ये आणि टोळीराज्ये होती. या राज्यांपकी अनेकांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. या राज्याराज्यांमध्ये कधी तणावाचे तर कधी सलोख्याचे संबंध असत. सत्तासंघर्षही होताच.
महाजनपदे
महाजनपदे खालीलप्रमाणे आहेत-
१.    काशी – हे पुरातन महाजनपद आहे. याचे बौद्ध जातक कथांमध्ये वर्णन आहे. सध्याच्या वाराणसी या शहाराजवळ हे राज्य होते. काशीच्या शेजारी कोशलचे राज्य होते.
२.    कोशल- सध्याच्या उत्तर प्रदेशातील अवध परिसरात हे महाजनपद होते. काशी शाक्य जमातीचा पराभव या राज्याने केला होता. याचा विस्तार करण्यामध्ये प्रसेनजीत राजाचा मोठा वाटा होता.
३.    अंग – सध्याच्या बिहार राज्यातील भागलपूर व मोंगीर जिह्य़ात हे महाजनपद होते. चंपा हे राजधानीचे ठिकाण होते. व्यापारउदिमासाठी प्रसिद्ध होते. बिंबिसाराने अंग हे राज्य मगध साम्राज्यात जिंकून विलीन केले.
४.    वज्जी किंवा वृज्जी – सध्याच्या उत्तर बिहारमध्ये आठ
जमातींचे हे एक गणतंत्र होते. वैशाली ही या गणतंत्राची राजधानी होती. वज्जीची राजधानी मिथिला होती. वैशाली ही लिच्छिवीची राजधानी होती. वर्धमान महावीराची आई लिच्छिवी वंशातली होती. वैशाली येथे दुसरी बौद्ध परिषद पार पडली होती.
५.    मल्ल – प्रजातंत्रीय राज्य म्हणून प्रसिद्ध. या राज्याच्या कुशीनगर आणि पावा या दोन राजधान्या होत्या. कुशीनगर येथे गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण झाले.
६.    चेदी – सध्याच्या बुंदेल खंड भागात हे राज्य होते.
७.    वत्स – सध्याच्या अलाहाबादजवळ होते. याची कौशम्बी ही राजधानी होती. उदयन हा पराक्रमी राजा या राज्यात होऊन गेला.
८.    कुरू – सध्याच्या दिल्ली मेरठ परिसरातील ठिकाण. येथे कुरू जमातीचे राज्य होते. वैदिक काळातच याला महत्त्व आले होते.
९.    पांचाल- दिल्लीच्या उत्तरेस व पूर्वेस हिमालयाच्या पायथ्यापासून चंबळपर्यंत पांचालांचे राज्य पसरले होते.
१०.    मत्स्य – आधुनिक राजस्थानातील जयपूर, भरतपूर, अल्वा येथे हे राज्य होते.
११.    शूरसेन – मथुरा याची राजधानी होती.
१२.    अस्मक किंवा अश्मक – अवंत राज्याच्या शेजारीचे राज्य व गोदावरी नदीच्या तटापर्यंत पसरलेले होते. हे राज्य अवंती राज्यात विलीन झाले.
१३.    गांधार – सध्याच्या पेशावर व रावळिपडी या ठिकाणी हे राज्य होते. तक्षशिला याची राजधानी होती.
१४.    कंबोज – आधुनिक पाकिस्तान व गुजरातमधील भूप्रदेश मिळून हे राज्य होते.
१५.    अवंती – उज्जन ही याची राजधानी होती.
१६.    मगध – हे बिहार राज्यातील पाटणा आणि गया या जिल्ह्य़ात होते. मगधाचा उदय सर्वात शक्तिशाली साम्राज्य म्हणून झाला.
मगध साम्राज्य  
बौद्ध काळातील १६ महाजनपदे आणि गणराज या स्वरूपातील राजकीय संरचना काही शतके अस्तित्वात राहिली, गणराज्याची भरभराट झाली. मात्र नंतरच्या काळात सत्ता विस्तारत गेली. राज्यांची साम्राज्ये झाली, सामाजिक मानसिकता बदलत गेली. या बदलत्या विचाराचे चित्र कौटिल्याच्या अर्थशास्त्रात मोठय़ा  चिकित्सकपणे रेखाटलेले आहे. प्राचीन भारतातील सत्तेच्या ध्रुवीकरण प्रक्रियेत मगध राज्य यशस्वी ठरले. बौद्ध ग्रंथ महावंश यात मगधाच्या इतिहासाची अधिक विश्वसनीय माहिती मिळते. त्यानुसार मगध राज्यावर पुढील राज्यांनी राज्य केले- बिंबिसार, अजातशत्रू, उदयभद्र / उदयिन, अनिरुद्ध, मूड, नागदशक, शिशूनाग, कालाशोक किंवा काकवर्णी. कालाशोकाचे दहा पुत्र बिंबिसार व अजातशत्रू हे सिद्धार्थ गौतम बुद्धाचे समकालीन होते.
मगधाची प्रारंभिक प्रशासन यंत्रणा – मगध जनपदातील ग्रामांची प्रतिनिधी सभा – ग्रामक. तीन प्रकारचे महामात्र प्रशासनावर नियंत्रण ठेवून असत. सभाथ्थक, व्यावहारिक, सेनानायक हे तीन महामात्र मगध जनपदाच्या केंद्रीय प्रशासन यंत्रणेत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत असतात. प्राचीन भारतातील प्रशासनाची मुहूर्तमेढच मगधात रोवली गेली.
१. बिंबिसार ( इ.स. पूर्व ५४४ – ४९२) – बिंबिसार हा गौतम बुद्धाचा समकालीन होता. याने विजय मिळवणे व आक्रमण करणे या धोरणाचा अवलंब केला. वैवाहिक संबंधातून बिंबिसाराने आपले स्थान अधिक भक्कम केले. राजगीर मगध राज्याची राजधानी होती. या काळात राजगीरचे नाव गिरीवज्र होते. तसेच गिरीव्रज पाच टेकडय़ाने वेढलेले होते.
२. अजातशत्रू – अजातशत्रू हा बिंबिसाराचा मुलगा होता व बिंबिसारनंतर याने मगधावर राज्य केले. अजातशत्रूने बापाला ठार मारून राज्य बळकावले. याच्या काळात मगध सत्ता परमोच्च शिखरावर पोचली. राज्यविस्तारासाठी आक्रमक धोरण अंवलंबिले व नात्यांचाही विचार केला नाही. अजातशत्रूने वैशाली राज्याचा नाश केला. तसेच काशी व वैशाली मगध साम्राज्यात सामावून घेतले. याच्या काळात पहिली धर्म परिषद राजग्रह या नगरीत घडली. बौद्ध ग्रंथातून या परिषदेचे सविस्तर वर्णन आढळते. अजातशत्रूनंतर मगध सत्तेला ग्रहण लागले. राज्याची वाटचाल अधोगतीकडे सुरू झाली. कर्तृत्वहीन राजे नुसते सत्तापिपासू बनले आणि राज्यसत्तेसाठी सिंहासनप्राप्तीसाठी वाटेल ते करू लागले.
३. उदयिन ( इ.स. पूर्व ४६० ते ४४४) – अजातशत्रूनंतर हा मगधच्या गादीवर आला. उदयिननंतर शिशूनाग घराणे मगधच्या राजसत्तेवर आले, यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान उज्जन राज्याचा पाडाव शिशूनाग घराण्याने केला आणि १०० वर्षांचे मगध व उज्जनमधील जुने वैर संपुष्टात आले. शिशूनाग घराण्याच्या नंतर नंद घराण्यांचे मगधावर राज्य आले. तसेच नंदाकडे  अफाट संपत्ती होती आणि ते कमालीचे शक्तिशाली होते. मगधाचे यश या राज्यात झालेले महत्त्वाकांक्षी व साहसी राजांचे कार्य यात होते. तसेच भौगोलिक घटकही मगध साम्राज्याच्या उदयाला कारणीभूत ठरले. लोखंडाच्या समृद्ध खाणी याच भागात होत्या. यामुळे प्रभावी शस्त्रे सहज बनवता येत असत.
मगधातील नंदसत्ता – नंदसत्तेच्या रूपाने भारतातील पहिली क्षत्रियेतर सत्ता उदयाला आली. वर्णव्यवस्थेतील चौकट भेदण्याचा हा पहिला प्रयत्न म्हणावा लागेल. इ.स. पूर्व २६४ ते इ.स. पूर्व २२४ अशी ४० वर्षे नंदांनी राज्य केले. पौराणिक उल्लेखानुसार महापद्मनंदाने नंद घराण्याची स्थापना केली. मात्र काही बौद्ध ग्रंथांत नंद घराण्याचा संस्थापक म्हणून उग्रसेनाचे नाव येते.
महापद्मनंद – भारतातील पहिला सम्राट – महापद्मनंद हा अत्यंत शूर पराक्रमी असा होता. त्याने सत्तेचे ध्रुवीकरण घडवून आणले. त्याने क्षत्रिय सत्ता नामशेष करून त्याची जनपदे नंद साम्राज्यात समाविष्ट केलीत. बौद्ध काळात सुरू झालेली प्रस्थापितांविरुद्धची क्रांती नंद साम्राज्याच्या रूपाने राजकीय स्थित्यंतरात रूपांतरित झाली.
महाबोधी वंश –  या बोधीवंशातून नंद घराण्यातील या राजांची नावे आढळतात. ती पुढीलप्रमाणे- उग्रसेन ( महापद्मनंद, पाण्डूक, पाण्डूगती, भूतपाल, राष्ट्रपाल, गोवीशाणक, दशसिद्धक, कैवर्त आणि धनानंद. यांपकी पहिला महापद्मनंद आणि शेवटचा धनानंद यांविषयी सविस्तर माहिती मिळते.
धनानंद – श्रेष्ठ सम्राट. नंद घराण्याचा शेवटचा राजा धनानंद यांविषयी सविस्तर माहिती मिळते. याच्या कार्यकीर्दीत अलेक्झांडर याने भारतावर आक्रमण केले. आक्रमक सन्याबरोबर ग्रीक इतिहासकारांनी धनानंदबाबत माहिती लिहून ठेवली आहे. इ.स. पूर्व ३२७ ते ३२५ या काळात म्हणजे अलेक्झांडरच्या आक्रमण वर्षांत धनानंद सत्तेवर होता. पाटलीपुत्र ही त्याची राजधानी होती. त्याच्याकडे प्रचंड लष्करी सामथ्र्य होते, मात्र राजा हा दुर्बल होता. त्याच्या राज्यातील प्रजाजन त्याचा द्वेष करीत असत. तो धनाचा प्रचंड लोभी होता. त्याने प्रजाजनांना छळले होते. त्याच्या राज्याला लोक कंटाळले होते. थोडक्यात तो प्रजाजनांसाठी अप्रिय होता. शेवटी त्याची सत्ता उलथून टाकण्यात आली. इ.स. पूर्व ३२४ मध्ये चंद्रगुप्ताने नंदसम्राटाविरुद्ध बंड केले व मौर्य साम्राज्याची स्थापना केली.
मौर्य साम्राज्य
मौर्य साम्राज्याच्या अभ्यासाचे स्रोत –
अ) साहित्य –
१. अष्टाध्यायी- पाणिनीने लिहिले, ते सर्वात जुने व्याकरणाचे पुस्तक आहे.
२. अर्थशास्त्र – हे पुस्तक आर्य चाणक्य / कौंटिल्य याने लिहिले, असे मानले जाते. या पुस्तकात वर्णन केलेल्या प्रसंगावरून मौर्य काळातील परिस्थितीचा अंदाज येतो.
३. महाभाष्य – पाणिनीच्या अष्टाध्यायीवर ही लिहिलेली समीक्षा आहे, हे पुस्तक पुश्यमित्र संघाच्या दरबारी असलेल्या पुरोहित पतंजली यांनी लिहिले आहे. मौर्य साम्रज्याचा शेवट का झाला असावा, याबाबत कारणांचा वेध या पुस्तकात घेण्यात आला आहे.
४. परिशिष्ट पर्वत – हेमचंद्र सुरी यांनी लिहिलेल्या या पुस्तकातून चंद्रगुप्त मौर्याबाबत माहिती मिळते.
. इंडिका – चंद्रगुप्ताच्या काळात सेल्युकस निकेटरचा राजदूत म्हणून आलेल्या मेगॅस्थेनिस याने हे पुस्तक लिहिले तत्कालीन सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीची कल्पना या पुस्तकावरून येते. याशिवाय शिलालेख, स्तंभालेख, मातीची विशिष्ट भांडी, स्तूप, गुंफा इ. साधनांच्या माध्यमातून मौर्य कालखंडातील इतिहास जाणून घेता येतो.
चंद्रगुप्त मौर्य – मौर्य साम्राज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्याने केली, त्याच्या कुळाविषयी वेगवेगळी मते व्यक्त केली गेली आहेत. ब्राह्मणी परंपरेनुसार असे मानले जाते की, चंद्रगुप्त मौर्य मुरा या नंदाच्या दरबारातील शूद्र स्त्रीच्या पोटी जन्माला आला तर बौद्ध परंपरेनुसार असे मानले जाते की, चंद्रगुप्ताचा जन्म क्षत्रिय वंशात झाला.
मौर्य साम्राज्याचा भौगोलिक विस्तार – जस्टिन व प्लूटार्क या ग्रीक इतिहासकारांनी चंद्रगुप्ताने निर्माण केलेल्या साम्राज्याची माहिती दिली आहे. जस्टिन या ग्रीक लेखकाने असे लिहिले आहे की, चंद्रगुप्त मौर्याने आपल्या विशाल सन्याच्या साह्य़ाने संपूर्ण भारत पादाक्रांत केला. मौर्याच्या साम्राज्यात बंगाल, ओरिसाचा बराच भाग, बिहार पश्चिम व उत्तर भारत, दख्खन याचा समावेश होता.
मौर्याचे प्रशासन – कौटिल्याचे अर्थशास्त्र व मेगॅस्थेनिसच्या इंडिका या ग्रंथातून मौर्य साम्राज्य व त्याच्या प्रशासन याची कल्पना येते. पाटलीपुत्र हे मौर्याच्या राजधानीचे ठिकाण होते, सर्व सत्ता राज्याच्या हातात होती. कौटिल्यानुसार राजा धर्मप्रवर्तक किंवा समाज व्यवस्थापन करणारा होता. मेगॅस्थेनिसच्या म्हणण्यानुसार, राज्याला सहाय्य करण्यासाठी एक परिषद होती, या परिषदेत विद्वान लोक होते. याच्या सल्ल्याचे बंधन राज्यावर नव्हते. साम्राज्याचे अनेक प्रांतांत लहान विभाग केले जात असत. ही प्रशासन व्यवस्था शहरी व ग्रामीण भागासाठी होती. नगर व शहरी प्रशासनासाठी सहा समित्या होत्या. प्रत्येक समितीत पाच सदस्य असत. शहाराची स्वच्छता राखणे. जन्म-मृत्यूची नोंद ठेवणे, वजन व मापे नियमित करणे यांसारखी कामे या समित्यांमार्फत केली जात असत. विक्रीसाठी शहरात आलेल्या प्रत्येक वस्तूवर पथकर लावला जात असे, नसर्गिक साधनसंपत्तीवर राज्याचा एकाधिकार होता. मेगॅस्थेनिसच्या लिखाणावरून, सन्याची व्यवस्था पाहण्यासाठी ३० अधिकाऱ्यांचे मंडळ होते. हे अधिकारी मंडळ पाच अधिकारी याप्रमाणे सहा समित्यांत स्थापन केलेले होते. सन्याची सहा अंगे होती- पायदळ, घोडदळ, हत्तीदळ, रथदळ, नौदल, वाहतूक  आणि त्यांचे काम.
बिंदुसार – चंद्रगुप्तानंतर त्याचा मुलगा बिंदुसार हा राज्यावर आला. बिंदुसाराच्या कारकीर्दीविषयी फारशी माहिती उपलब्ध होत नाही. त्याने ग्रीकांशी संबंध चालू ठेवले. बिंदुसाराचा उल्लेख ग्रीक लेखकांनी अमित्रघट असा केला आहे. याचा अर्थ प्रतिस्पध्र्याचा नाश करणारा असा होतो. याच्या काळात तक्षशिला येथे बंड झाले होते. हे बंड मोडण्यासाठी अशोकाला पाठवले होते. त्याने सिरीयाचा राजा अ‍ॅन्टोओक्स पहिला याला मदिरा, अंजीर आणि तत्वेले पाठविण्याची विनंती केली होती.
अशोक – बिंदुसाराला अनेक पुत्र होते. त्यांपकी अशोक याने आपल्या कर्तबगारीच्या जोरावर िबदुसाराची गादी काबीज केली. महावंश या ग्रंथात असे नमूद केले आहे की, अशोकाने आपल्या ९९ भावांना ठार मारून राज्याची गादी प्राप्त केली, प्रत्यक्ष लोकांच्या भाषेत बोलणारा अशोक हा सर्वात पहिला राजा होता.
किलग युद्ध – या युद्धात एक लाख लोक मारले गेले. जवळजवळ दीड लाख लोक बंदी बनवले गेले. कित्येक लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. या युद्धानंतर अशोकाला तीव्र पश्चाताप झाला. किलग युद्धानंतर अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्याने बौद्ध धर्माप्रमाणे आचरणास सुरुवात केली. बौद्ध धर्मातील मतभेद दूर व्हावेत आणि धर्माला पुन्हा उजाळा मिळावा, म्हणून अशोकाने पाटलीपुत्र येथे तिसरी धर्म परिषद बोलावली. या धर्म परिषदेचे अध्यक्षस्थान मोगलीपुत्र तिष्य याने स्वीकारले होते. त्याने दक्षिण भारत श्रीलंका, म्यानमार व इतर देशांत धर्मापदेशक पाठवले होते. अशोकाने आपल्या राज्यात ठिकठिकाणी शिलालेख व स्तंभालेख कोरून ठेवले, या शिलालेखावरून त्याचा राज्यकारभार व त्याची प्रजेच्या कल्याणाविषयीची तळमळ याची माहिती मिळते.
सम्राट अशोकानंतर मौर्य साम्राज्याला उतरती कळा लागली. त्याच्यानंतर सत्तेवर आलेले मौर्य राजे कमकुवत होते, त्यांच्याकडे कर्तबगारीचा अभाव होता, अशोकानंतर ५० वर्षांतच मौर्य साम्राज्याचा विनाश झाला. शेवटचा मौर्य राजा बृहद्रश याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने खून करवला व स्वत:च गादी बळकावली. मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील पहिले देशव्यापी साम्राज्य होते.
मौर्यकालीन आर्थिक जीवन
मौर्य काळात आर्थिक घडामोडीसाठी २७ अध्यक्षांची नेमणूक केली जात होती. कौटिल्याच्या अर्थशास्त्रानुसार व्यापार, वाणिज्य, वजनमापे, सूत काढणे यांसारखी कारागिरी खाणकाम यांचे नियंत्रण या २७ अध्यक्षांमार्फत केले जात असे. मेगॅस्थेनिसच्या म्हणण्यानुसार मौर्य साम्राज्यात गुलाम आढळले नाहीत. मात्र वैदिक काळापासून गुलामांचा घरगुती वापर होत होता. अशोकाने बंदी बनवून आणलेले युद्धकैदी शेतीवरील कामासाठी नेमलेले होते. मौर्य काळात जलमार्गाचा वापर केला जात असे. पाटलीपुत्राच्या चारही दिशांना जाण्यासाठी जलमार्ग होता. करव्यवस्था ही मौर्याच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख भाग होता.
मौर्यानी करनिर्धारणाला महत्त्व दिले होते. करनिर्धारणाची जबाबदारी संहर्ता या अधिकाऱ्यावर होती. याबाबत तो सर्वोच्च अधिकारी होता. खनिजाचा व भंडाराचा प्रमुख अधिकारी सन्निधता होता. करवसुली ही धान्याच्या स्वरूपात होत असे. करवसुली अधिकाऱ्यांना रोखीव वेतन दिले जात असे. एरियन या ग्रीक लेखकाने शहरांची संख्या अगणित होती, असे प्रतिपादित केलेले आहे. या काळात विटा व लाकूड यांचा घर बांधण्यासाठी वापर केला जात असे. लोखंडापासून पोलाद बनवण्याची कला ही मौर्यानीच प्रस्थापित केली, पुढे ती देशाच्या अन्य भागांत पसरली.
मौर्याची कलाशैली
दगडी बांधकाम मौर्यानी मोठय़ा प्रमाणात केले. आधुनिक पाटना शहराच्या सरहद्दीवर असलेले कुंभ्रहर येथे दगडी स्तंभांच्या व खुंटाचे अवशेष आढळतात. यांच्या वरील भागात सिंह व बल यांचे चित्र काढण्यात आले आहे. कुंभ्रहर येथील प्रत्येक स्तंभ फिकट रंगाच्या व एकाच वालुकाश्मात बनविलेले आहे. बौद्ध भिक्षुकांसाठी राहण्याची सोय दगड कोरून निर्माण केलेल्या गुहांमध्ये होती.
मौर्योत्तर काळातील परकीय सत्ता
१. इंडो ग्रीक – पहिले आक्रमण ग्रीकांनी केले व हे इंडो ग्रीक म्हणून ओळखले जाते.
मिनांदर (इ.स.पूर्व १६५ ते इ.स.पूर्व १४५) याला  मिलिंद म्हणूनही ओळखले जाते. नागसेन किंवा नागार्जुनाने मिलिंदाचे धर्मातर करून बौद्ध धर्माची दीक्षा दिली. मिलिंदाने नागार्जुनाला बौद्ध धर्माशी निगडित जे प्रश्न विचारलेत व नागार्जुनाने जी उत्तरे दिलीत ती मिलिंदपन्हो या पुस्तकात नमूद केलेली आहेत. सुवर्णाची नाणी प्रथमच इंडो-ग्रीकांनी भारतात आणली होती.
 २. शक – ग्रीकांनंतर शकांनी भारतावर आक्रमण केले. शकांच्या पाच शाखा होत्या. त्यांपकी पाचव्या शाखेने दख्खनच्या उत्तर भारतात सत्ता प्रस्थापित केली. शकांनी मोठय़ा प्रमाणात चांदीची नाणी वापरात आणली. पहिला रुद्रदमन ( इ.स. १३० ते १५० ) हा सर्वात प्रसिद्ध शक राजा होता. त्याचे राज्य सिंध, गुजरात, कोकण, नर्मदेचे खोरे, काठेवाड भागात होते. रुद्रदमन याने सुदर्शन तलावाची डागडुजी केली. हा तलाव जलसिंचनासाठी प्रसिद्ध होता. रुद्रदमनला संस्कृत भाषेची आवड होती.
३. पार्थियन – पार्शियनांमुळे शकांचे वर्चस्व नष्ट झाले.
४. कुषाण –  पार्शियनांपाठोपाठ कुषाण भारतात आले, ही भटकी जमात होती. कुषाणांनी हिंदकुश पर्वत ओलांडून गांधार प्रदेश काबीज केला. कुषाणांनी सिंधू नदीच्या दक्षिण खोऱ्यात व गंगेच्या विशाल प्रदेशावर आपले राज्य स्थापन केले. कुषाणांनंतर कनिष्क घराणे सत्तेवर आले.
कनिष्क घराणे –  कनिष्क घराण्याने शुद्ध धातूच्या असंख्य सुवर्णमुद्रा प्रचलित केल्या आहेत. कनिष्क हा प्रसिद्ध कुषाण राजा होता. कनिष्काने बौद्ध धर्माला पाठिंबा दिला होता. कनिष्काने चौथी बौद्ध परिषद काश्मीरमध्ये भरविली होती. या परिषदेत हिनयान पंथाच्या तत्त्वांना अंतिम स्वरूप देण्यात आले.    
(भाग २)

Katchatheevu island controversy
विश्लेषण: कच्चथीवू बेटावर ‘या’ हिंदू राजांनी केले होते राज्य? त्यांचा रामाशी नेमका संबंध काय होता?
chipko movement, chipko movement lokrang article
चिपको : हिमालयापासून केरळपर्यंत…
gondwana supercontinent overview interesting facts about gondwana supercontinent
भूगोलाचा इतिहास : गोंडवाना के भुईया मा..
Cooking Competition in Mumbai on the occasion of Loksatta Purnabraham publication Mumbai
‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ प्रकाशनानिमित्त आज मुंबईत पाककला स्पर्धा