News Flash

राष्ट्रीय संरक्षण अकादमी निवड परीक्षा : २०१४

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे सैन्यदलात अधिकारी पदासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौदल अकादमी निवड परीक्षा-२०१४ या निवड पात्रता परीक्षेसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत

| July 7, 2014 01:06 am

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे सैन्यदलात अधिकारी पदासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौदल अकादमी निवड परीक्षा-२०१४ या निवड पात्रता परीक्षेसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-
जागांची संख्या व तपशील : या योजनेंतर्गत निवड करण्यात येणाऱ्या जागांची संख्या ३७५ असून त्यामध्ये भूदलात २०८, नौदलात ४२, हवाई दलात ७० तर नौदलाच्या थेट निवड योजनेंतर्गत असणाऱ्या ५५ जागांचा समावेश आहे.
शैक्षणिक पात्रता : अर्जदार खालीलप्रमाणे शैक्षणिक पात्रताधारक असायला हवेत-
भूदल : अर्जदारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
हवाई दल आणि नौदल : अर्जदारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा गणित व भौतिकशास्त्र या विषयांसह उत्तीर्ण केलेली असावी.
जे विद्यार्थी यंदा वरील पात्रता परीक्षेला बसले असतील तेसुद्धा या निवड परीक्षेला बसू शकतील.
वयोगट : उमेदवारांचे वय १५ ते १८ वर्षांच्या दरम्यान असावे.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर २८ सप्टेंबर २०१४ रोजी घेण्यात येईल. त्यामध्ये राज्यातील मुंबई व नागपूर या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल.
लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड
करण्यात येईल.
अर्जासह भरायचे शुल्क : अर्जासह भरायचे शुल्क म्हणून १०० रु. रोखीने स्टेट बँक ऑफ इंडिया अथवा तिच्या सहयोगी बँकेत रोखीने भरणे आवश्यक आहे.
अधिक माहिती : अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २७ जून २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची राष्ट्रीय संरक्षण अकादमीविषयक जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsconline.nic.in  या संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०१४.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2014 1:06 am

Web Title: national defense academy examination 2014
Next Stories
1 मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
2 सीमा सुरक्षा दलात साहाय्यक निरीक्षक दळणवळण व संवाद पदाच्या २६९ जागा
3 ‘मास मीडिया’अभ्यासक्रमाविषयी..
Just Now!
X