नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, नवी दिल्ली येथे उपलब्ध असणाऱ्या पॉवर प्लँट इंजिनीअरिंग या विषयातील विशेष पदविका अभ्यासक्रमाच्या २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी उमेदवारांना प्रवेश देण्यात येत आहे.

जागांची संख्या – अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागांची संख्या ८० असून यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्जदारांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स कंट्रोल अ‍ॅण्ड इंस्ट्रमेंटेशन यासारख्या विषयातील पदविका अभ्यासक्रम चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.

निवड प्रक्रिया- अर्जदारांच्या पदविका परीक्षेतील टक्केवारीच्या आधारे त्यांची अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात येईल.

अर्जासह भरावयाचे शुल्क- अर्जदारांनी अर्जासह भरावयाचे प्रवेश शुल्क म्हणून ४०० रु. चे प्रवेश शुल्क स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारा भरणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व तपशील – अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशीलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९ ते १५ जून २०१८ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल पॉवर ट्रेनिंग इंस्टीटय़ूट, नवी दिल्लीची जाहिरात पहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या www.nptidelhi.net या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख  संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज प्रिंसिपल डायरेक्टर, नॅशनल पॉवर ट्रेनिंग इंस्टीटय़ूट (नॉर्दन रिजन), बदरपूर, नवी दिल्ली- ११००४४ या पत्त्यावर १३ जुलै २०१८ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

– द.वा.आंबुलकर