नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटमध्ये उपलब्ध असणाऱ्या मेंटेनन्स ऑफ ट्रान्समिशन अॅण्ड डिस्ट्रिब्युशन सिस्टीम या विषयातील विशेष पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश उपलब्ध आहेत.
उपलब्ध जागा : या अभ्यासक्रमासाठी एकूण उपलब्ध जागांची संख्या ६० असून, त्यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.
आवश्यक पात्रता : अर्जदारांनी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक अथवा पॉवर इंजिनीअरिंग यासारख्या विषयातील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
निवड पद्धती : अर्जदारांच्या पदवी परीक्षेतील गुणांच्या टक्केवारीच्या आधारे त्यांना २६ आठवडे कालावधीच्या नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, गुवाहाटी येथील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यात येईल.
अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास ५६२ रु.चा नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट एनईआरच्या नावे असणारा व गुवाहाटी येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.
अधिक माहिती व तपशील : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट गुवाहाटीच्या http://www.nptiguvahati.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले प्रवेश अर्ज प्रिन्सिपल डायरेक्टर, नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, एनपीटीआय कॉम्प्लेक्स, दखनीगाव, कहिलापारा, गुवाहाटी- ७८१०१९ (आसाम) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २ जून २०१४.