01 March 2021

News Flash

नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटचे विशेष अभ्यासक्रम

अर्हताप्राप्त उमेदवारांकडून प्रवेशअर्ज मागविण्यात येत आहेत.

| September 7, 2015 06:16 am

अभ्यासक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २० ते २६ जून २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, बंगळुरूची जाहिरात पाहावी अथवा एनपीटीआय-बंगळुरूच्या www.psti.kar.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. बंगळुरू येथील नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट येथे उपलब्ध असणाऱ्या ट्रान्समिशन अ‍ॅण्ड डिस्ट्रिब्युशन सिस्टीम या विषयातील विशेष पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.  अर्हताप्राप्त उमेदवारांकडून प्रवेशअर्ज मागविण्यात येत आहेत-
जागांची संख्या व तपशील अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागांची संख्या ६० असून यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत. आवश्यक शैक्षणिक अर्हता अर्जदारांनी इलेक्ट्रिकल अथवा इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स विषयातील अभियांत्रिकीची पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
निवड पद्धती
अर्जदारांची अभियांत्रिकी पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व शैक्षणिक आलेखाच्या आधारे पात्रताधारक विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.
अर्जासह पाठवायचे शुल्क
अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून ५०० रु.चा ‘पीएसटीआय-बंगळुरू’च्या नावे असणारा व बंगळुरू येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट अर्जासह पाठवणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याची मुदत
विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज प्रिन्सिपल डायरेक्टर, पॉवर सिस्टीम ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, सुब्रमण्यपुरा रोड, चनशंकरी फेज- २, बंगळुरू- ५६००७० या पत्त्यावर १४ सप्टेंबर २०१५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2015 6:16 am

Web Title: national power training institute courses
Next Stories
1 करिअरन्यास
2 सावध ऐका, पुढल्या हाका!
3 मुख्य परीक्षेला सामोरे जाताना..
Just Now!
X