भू-भौतिकशास्त्र, भूकंपशास्त्र, भू-पर्यावरणशास्त्र यांच्या अभ्यासाबरोबरच हायड्रोकार्बन, भूजलसाठे, विविध खनिजांच्या ठिकाणांचे शोध घेणे याविषयी काम करणारी देशातील अग्रगण्य संस्था म्हणजे नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट.
नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट ही संस्था म्हणजे केंद्र सरकारच्या औद्योगिक व वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या उपक्रमांपकी एक संस्था आहे. भूशास्त्रातील  बहुशाखीय संशोधनात कार्यरत असलेली ही प्रयोगशाळा १९६१ साली स्थापन झाली. भू-भौतिकशास्त्र, भूकंपशास्त्र, भू-पर्यावरणशास्त्र यांच्या अभ्यासाबरोबरच हायड्रोकार्बन, भूजलसाठे, विविध खनिजांच्या ठिकाणांचे शोध या मोहिमांतूनही संस्था प्रभावीपणे काम करीत आहे. या विषयांतील माहिती मिळवण्यासाठी आणि संशोधनासाठी संस्थेकडे अनुभवी आणि उच्चविद्या प्रशिक्षि,त संशोधकांचा ताफा उपलब्ध आहे. हैदराबाद आणि आंध्र प्रदेश येथे या संस्थेच्या शाखा आहेत.
संस्थेच्या क्षमता
* भूकंप प्रतिरोधक योजना- नवनवीन भूकंपप्रवण क्षेत्रांचा शोध घेणे. तेथील भूकंपाच्या धोक्याची तीव्रता आजमावणे.
* भू-भौतिकशास्त्राचा अभ्यास- स्थापत्यशास्त्र आणि खाणकाम यांचा एकत्रित वापर करून मोठमोठय़ा स्थापत्य रचनाची निर्मिती करणे, बोगदे खणणे (टनेलिंग), कंपने आणि कंपनध्वनी यांचा अभ्यास केला जातो.
* भूजल साठय़ाचा अभ्यास- जमिनीखालील पाण्याच्या साठय़ाच्या जागांचा शोध घेणे, त्या पाण्याचा वापर करण्यासाठीच्या यंत्रणांचा अभ्यास करणे तसेच भूजल साठय़ाचे प्रभावी नियोजन करण्याबाबत संस्था प्रयत्नशील आहे.
* नसर्गिक खनिज संपत्तीच्या उगमांचा शोध घेणे- उदा. खनिज तेल, भूजल साठे, कोळसा, हिरा, सोने आणि भूऔष्णिक ऊर्जा.
* संस्थेतर्फे चुंबकीय गुरुत्व, हिंदी महासागराच्या तळाचा भू-कंपन लहरींद्वारे अभ्यास केला जातो. हायड्रोकार्बन्सचा शोध घेण्याचे कामही संस्थेत चालते.
* एअर बोर्न जिओफिजिकल सव्‍‌र्हेद्वारे विशिष्ट प्रदेशाच्या अभ्यासासाठी कोन्टूर नकाशांचा अभ्यास केला जातो.
* पृथ्वीच्या विविध भूस्तर, पृथ्वीच्या भू-कंपन लहरी, पृथ्वीचे गुरुत्व व भू-औष्णिक ऊर्जेचा अभ्यास संस्थेत केला जातो.
संस्थेतील संशोधनाचे विषय
* हायड्रो कार्बन्सचे शोधन कार्य
* भू-रसायनशास्त्र ,
* खनिजे आणि भू-भौतिकशास्त्र
* भू-जलसाठे
* भूकंपविज्ञान
* भू-भौतिक विषयांचा अभ्यास
भू-भौतिकशास्त्राच्या अभ्यासात सुसूत्रता व परिणामकारकता येण्यासाठी १९४६ साली केंद्र सरकारने प्लािनग कमिटी फॉर जिओफिजिक्स स्थापन केली. १९६१ मध्ये नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट ही संस्था उभारण्यात आली. पृथ्वीचा भू-शास्त्रीय सखोल अभ्यास हे या संस्थेच्या संशोधनामागील प्रमुख ध्येय राहिले आहे. गेल्या ५० वर्षांच्या कालावधीत ही संस्था पृथ्वीच्या भू-भौतिकीय दृष्टिकोनातून बहुशाखीय अभ्यासाचे जागतिक स्तरावरील केंद्र बनली आहे. याचबरोबर भू-शास्त्रातील अनेक महत्त्वपूर्ण संकल्पनांचाही अभ्यासात समावेश होतो.
संस्थेची ध्येयधोरणे
* जमिनीखालील पाण्याचे साठे, खनिजे व इतर ऊर्जास्रोतांच्या शोधनासाठी निरनिराळ्या तंत्रज्ञानाचा संशोधनातून विकास करणे.
* भू-शास्त्रीय माहितीचा प्रभावी वापर.
* भू-भौतिकशास्त्राच्या प्रत्यक्ष संशोधनासाठी व अभ्यासासाठी लागणाऱ्या उपकरणांचे विकसन.
* जमिनीखालील ऊर्जास्रोतांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यासाठी उपयुक्त संशोधन
* पृथ्वीच्या विविध भूस्तरांचा अभ्यास, भूचुंबकीय क्षेत्र, भूकंप विज्ञान, भू-औष्णिक, भू- रासायनिक, भू-विद्युत अशा भूविषयक विविध विषयांचा अभ्यास, संस्थेतील विविध संशोधन कार्यक्रमांचा उपयोग औद्योगिक क्षेत्रातील सुधारणांसाठी उपयोग करणे.
* पृथ्वीची अंतर्रचना अभ्यासण्यासाठी तसेच भूगर्भातील नसíगक उर्जास्रोतांचा शोध घेण्यासाठी भू-भौतिक पद्धतींचा अवलंब करणे.
* आंतरराष्ट्रीय भू-भौतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे.
* भू-शास्त्रीय विषयांच्या अभ्यासासाठी देश-विदेशातील शैक्षणिक तसेच व्यावसायिक संस्थांशी समन्वय साधणे.
गेली ५० वष्रे जमिनीखालील उर्जास्रोतांना वाढती मागणी आहे (उदा. पाणी, खनिजे, धातू आणि जैव इंधन वगरे) परंतु, या ऊर्जास्रोतांच्या अर्निबध वापरामुळे निसर्गाची अपरिमित हानी झाली आहे. हा पर्यावरणावरील दुष्परिणाम रोखण्यासाठी संस्थेने पर्यावरणस्नेही पद्धतींचे संशोधन सुरू केले. संस्थेने निसर्ग संतुलनाचा, शास्त्रीय मूल्यांचा उद्देश समोर ठेवून खालील उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवली. उदा. खडकाळ जमिनीतून जलसाठय़ाचे शोधनाच्या पद्धतींचे संशोधन, भूजल साठय़ातील भूजन्य तसेच मानवनिर्मित प्रदूषणाचा प्रादुर्भाव रोखणे. नैसर्गिक जलस्रोतांचा शेती, उद्योगधंदे आणि दैनंदिन उपयोगासाठी प्रभावी वापर करणे इत्यादी.
* नैसर्गिक वायू, पेट्रोल, कोळसा यांच्या शोधातून तसेच आण्विक ऊर्जास्रोत, भू-औष्णिक ऊर्जा निर्मिती यातून देशाच्या ऊर्जापुरवठय़ाची काळजी घेण्यासंबंधीही संस्था प्रयत्नशील आहे.
* भूकंपप्रवण क्षेत्रांचा शोध तसेच सुनामी लाटांच्या सूचना मिळण्याबाबत योजना निर्मिती करण्याचे कामही संस्था करते.     
geetazsoni@yahoo.co.in