नेदरलॅण्ड्समधील सुप्रसिद्ध अ‍ॅमस्टरडॅम विद्यापीठाकडून ‘अ‍ॅमस्टरडॅम गुणवत्ता शिष्यवृत्ती’ या नावाने कायद्याच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठीच्या अर्जप्रक्रियेविषयी..
नेदरलॅण्ड्समधील प्रसिद्ध अ‍ॅमस्टरडॅम विद्यापीठाकडून (University of Amsterdam) ‘अ‍ॅमस्टरडॅम गुणवत्ता शिष्यवृत्ती’ या नावाने कायद्याच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. २०१४-१५ साली सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षांसाठी अ‍ॅमस्टरडॅम विद्यापीठाच्या लॉ स्कूलमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून या शिष्यवृत्तीसाठी १ एप्रिल २०१४ पूर्वी अर्ज मागवण्यात
आले आहेत.
शिष्यवृत्तीबद्दल – ‘अ‍ॅमस्टरडॅम लॉ स्कूल’मध्ये युरोपीय आíथक क्षेत्राबाहेरच्या म्हणजेच युरोपबाहेरच्या कायदा क्षेत्रातील सर्वोत्तम जागतिक गुणवत्तेला आकर्षति करण्याचे स्वप्न तिथल्या प्राध्यापकवर्गाने समोर ठेवले व त्यातून ‘अ‍ॅमस्टरडॅम गुणवत्ता शिष्यवृत्ती’ (Amsterdam Merit Scholarship- AMS) हा उपक्रम सुरू झाला. ए.एम.एस.ची ही शिष्यवृत्ती ‘अ‍ॅमस्टरडॅम लॉ स्कूल’मध्ये कायद्याच्या कोणत्याही पदव्युत्तर अभ्यासक्रमास (एल.एल.एम.) प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठीच लागू आहे. या शिष्यवृत्तीअंतर्गत अर्जदाराला विद्यापीठाकडून शिष्यवृत्तीचा मिळणारा एकूण वार्षकि भत्ता सहा हजार युरो ते १२ हजार युरो एवढा असून निवड झालेल्या अर्जदाराला तो मासिक भत्त्याच्या स्वरूपात म्हणजे साधारणत: प्रति महिना एक हजार युरो एवढा देण्यात येईल. शिष्यवृत्तीची ही रक्कम मात्र विद्यार्थ्यांला त्याची शिकवणी शुल्क भरण्यासाठी वापरता येणार नाही. शिष्यवृत्तीचा एकूण कालावधी दोन वर्षांचा आहे. मात्र, शिष्यवृत्तीधारकाचे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष जर गुणवत्तापूर्ण असेल तरच त्याची शिष्यवृत्ती दुसऱ्या वर्षांसाठी सुरू राहील.
आवश्यक अर्हता – ही शिष्यवृत्ती युरोपबाहेरच्या म्हणजेच विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार युरोपीय आíथक क्षेत्राबाहेरील हुशार व शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असलेल्या सर्व अर्जदारांना खुली आहे. अर्जदाराकडे कायद्याची पदवी (एल.एल.बी.) असावी. अर्जदाराचा पदवीचा जीपीए (Grade Point Average) किमान ७.५/१० असावा. तसेच अर्जदाराला अ‍ॅमस्टरडॅम विद्यापीठाच्या ‘अ‍ॅमस्टरडॅम लॉ स्कूल’मध्ये कायद्याच्या कोणत्याही पदव्युत्तर अभ्यासक्रमास (एल.एल.एम.) प्रवेश मिळालेला असावा. अर्जदाराच्या पदवी व अ‍ॅमस्टरडॅम विद्यापीठात तो घेणार असलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या कालावधीत पाच वर्षांपेक्षा अधिक अंतर असू नये. ज्या विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदवी (एल.एल.एम.) मिळवलेली आहे किंवा पदव्युत्तर पदवीसाठी त्यांना अगोदरच इतर कोणतीही शिष्यवृत्ती मिळालेली आहे, असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत. अर्जदाराचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच अर्जदार टोफेल अथवा आयईएलटीएस या इंग्रजी भाषेच्या दोन्हीपकी एका परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया – अ‍ॅमस्टरडॅम विद्यापीठाच्या अर्जप्रक्रियेमध्ये अर्जदाराने शिष्यवृत्तीसाठी त्याचा अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून विद्यापीठाच्या वेबसाइटवर जमा करावा. पूर्ण केलेल्या अर्जाची िपट्र घेऊन अर्जदाराने त्याबरोबर त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीबद्दल विस्तृतपणे माहिती देणारा त्याचा सी.व्ही., अर्जदाराला या शिष्यवृत्तीला का अर्ज करावासा वाटतो हे तीनशे शब्दांमध्ये सांगणारे ‘एएमएस मोटिव्हेशन लेटर’, त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापक किंवा तज्ज्ञांची शिफारसपत्रे, एसओपी, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्सच्या अधिकृत विद्यापीठीय प्रती आणि टोफेल किंवा आयईएलटीएस यापकी एका परीक्षेचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे जोडून आंतरराष्ट्रीय कुरियरने ‘संचालक, अ‍ॅमस्टरडॅम लॉ स्कूल’ यांना पाठवावीत. कागदपत्रे पाठवण्याचा पत्ता विद्यापीठाच्या वेबसाइटवर दिलेला आहे.
निवड प्रक्रिया – शिष्यवृत्तीच्या निवडीची संपूर्ण प्रक्रिया गुणवत्तेवर आधारित असून अर्जदारांना त्यांच्या निवडीबद्दल १ जुल २०१४ पूर्वी कळवले जाईल.
अंतिम मुदत –  या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत १ एप्रिल २०१४ आहे.
महत्त्वाचा दुवा – http://www.uva.nl/en
itsprathamesh@gmail.com