सेंट्रल ऑर्डनन्स डेपो, जबलपूर येथे फायरमनच्या ८ जागा
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २७ नोव्हेंबर २०१५ च्या अंकातील सेंट्रल ऑर्डनन्स डेपोची जाहिरात पहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज जनरल मॅनेजर, सेंट्रल ऑर्डनन्स डेपो, पोस्ट बॉक्स नंबर- २०, जबलपूर, मध्य प्रदेश- ४८२००१  या पत्त्यावर ११ डिसेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

आयुध निर्माणी, मुरादनगर येथे कुशल कामगारांच्या ११६ जागा
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या
२१ ते २७ नोव्हेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली आयुध निर्माणी, मुरादनगरची जाहिरात पाहावी अथवा आयुध निर्माणीच्याhttp://ofm.gov.in RECRUITMENT या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ११ डिसेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावेत.

ईडीसीआयएल (इंडिया) लि. मध्ये प्रशिक्षणार्थी अभियंत्यांच्या २० जागा-
उमेदवारांनी सिव्हिल अथवा इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमधील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या
१४ ते २० नोव्हेंबर २०१५ च्या अंकातील ईडीसीआयएल (इंडिया) लि. ची जाहिरात पाहावी अथवा कंपनीच्या http://www.edcilindia.co.in kcareerl  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ११ डिसेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावेत.

ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली येथे वरिष्ठ कारकुनांच्या ११ जागा-
अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनची जाहिरात पाहावी अथवा काऊन्सिलच्या http://www.aicte-india.org>bulltin> job  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज व्हाइस चेअरमन, ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, सातवा मजला, चंद्रलोक बिल्डिंग, जनपथ, कॅनॉट प्लेस, नवी दिल्ली- ११०००१ या पत्त्यावर ११ डिसेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

सेंट्रल काऊन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसीन- नवी दिल्ली येथे रिसर्च ऑफिसर (युनानीच्या) ११ जागा
उमेदवार युनानीमधील पदव्युत्तर पात्रताधारक असावेत व त्यांचे पंजीकरण झालेले असावे. वयोमर्यादा ४० वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या
१४ ते २० नोव्हेंबर २०१५ च्या अंकातील सेंट्रल काऊन्सिल फॉर युनानी रिसर्चची जाहिरात पाहावी अथवा काऊन्सिलच्या http://www.ccrum.net या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, सेंट्रल काऊंसिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसीन, ६१-६५ इन्स्टिटय़ूशनल एरिया, डी ब्लॉकसमोर, जनकपुरी, नवी दिल्ली ११००५८ या पत्त्यावर
१३ डिसेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रॉनिक अ‍ॅण्ड इन्फरमेशन टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली येथे सीनिअर टेक्निकल असिस्टंटच्या ३ जागा
वयोमर्यादा ४० वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २४ ते ३० ऑक्टोबर २०१५ च्या अंकातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्फरमेशन टेक्नॉलॉजीची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या ६६६. ल्ल्री’्र३.ॠ५.्रल्ल या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो मजकूर व तपशिलासह असणारे अर्ज अ‍ॅडिशनल डायरेक्टर (पी अ‍ॅण्ड ए), नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्फरमेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स निकेतन, ६, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली- ११०००३ या पत्त्यावर १४ डिसेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

नेहरू युवा केंद्र संघटनेअंतर्गत जिल्हा युवा समन्वयकाच्या ५० जागा
अधिक तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १५ ते २१ ऑगस्ट २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली नेहरू युवा संघटनेची जाहिरात पाहावी अथवा संघटनेच्या ६६६.ल्ल८‘२.१ॠ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले तपशीलवार अर्ज डायरेक्टर जनरल, नेहरू युवा केंद्र संघटना, कोर- ४, दुसरा मजला, स्कोप मिनार, ट्विन टॉवर कॉम्प्लेक्स, लक्ष्मी नगर, नवी दिल्ली- ११००९२ या पत्त्यावर
१४ डिसेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

पूर्व रेल्वेमध्ये खेळाडूंसाठी १६ जागा
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. त्यांनी विविध क्रीडा प्रकारात विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी आणि ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत.
वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २७ नोव्हेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली पूर्व रेल्वेची जाहिरात पहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज चीफ पर्सोनेल ऑफिसर, ईस्टर्न रेल्वे हेडक्वार्टर्स, ईस्टर्न रेल्वे स्पोर्टस असोसिएशन, नेताजी सुभाष रोड, फेर्ली प्लेस, कोलकाता- ७००००१ या पत्त्यावर १६ डिसेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

भारतीय नौदलात बारावी उत्तीर्णासाठी संधी
उमेदवारांनी १०+२ या शैक्षणिक पद्धतीमध्ये बारावीची परीक्षा गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र, जीवशास्त्र, संगणक, विज्ञान यांसारख्या विषयांसह उत्तीर्ण केलेली असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा २० वर्षे.
अधिक तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २७ नोव्हेंबर
२०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय नौदलाची जाहिरात पाहावी
अथवा नौदलाच्या http://www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १३ डिसेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावेत.