महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०१५ (एमएएचएटीईटी- २०१५)

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेच्या दूरध्वनी क्र. ०२०- २६१२३०६६ वर संपर्क साधावा अथवा परिषदेच्या  www.mscepune.in  किंवा http://www.mohatd.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ४ नोव्हेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावेत.

संरक्षण मंत्रालयात दिल्ली येथे वाहनचालकांच्या २९ जागा

उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. त्यांच्याकडे अवजड वाहनचालकाचा परवाना असावा. वयोमर्यादा २५ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १९ ते २५ सप्टेंबर २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली संरक्षण मंत्रालयाची जाहिरात पाहावी.

विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज- कमांडंट, ५०५ आर्मी बेस वर्कशॉप ईएमई, दिल्ली (कॅन्ट), दिल्ली- ११००१० या पत्त्यावर ५ नोव्हेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन- इंडिया, अहमदाबाद येथे फेलोशिपच्या २५ संधी

उमेदवारांनी वैद्यकशास्त्र, लाइफ सायन्सेस, प्रॉडक्ट अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल डिझाइन, व्यवसाय व्यवस्थापन, माध्यम व जन-संवाद यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी किमान प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांना संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान एक वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा ३५ वर्षे.

अधिक माहितीसाठी नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनच्या  www.nif.org.in/join या संकेतस्थळाला भेट द्यावी.

तपशीलवार अर्ज दि एक्झिक्युटिव्ह व्हाइस चेअरमन, नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन- इंडिया, सॅटेलाइट कॉम्प्लेक्स, प्रेमचंद नगर, वस्त्रपूर, अहमदाबाद- ३८००१५ या पत्त्यावर ६ नोव्हेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

संरक्षण मंत्रालयांतर्गत ‘डीआरडीओ’मध्ये कनिष्ठ संशोधकांसाठी ११ जागा

अर्जदार कृषी, वनस्पतीशास्त्र, बायो टेक्नॉलॉजी, फार्माकोलॉजी यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पात्रताधारक असावेत. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा. वयोमर्यादा २८ वर्षे.

अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १७ ते २३ सप्टेंबर २०१५च्या अंकातील ‘डीआरडीओ’ची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज डायरेक्टर- डिफेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ बायो एनर्जी रिसर्च, पोस्ट ऑफिस अर्जुननगर, हल्दानी -२६३१३९ या पत्त्यावर ७ नोव्हेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये सहायक प्रशिक्षणार्थीच्या २० जागा

उमेदवार किमान आठवी उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा ४० वर्षे.

अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १७ ते २३ ऑक्टोबर २०१५च्या अंकातील नॅशनल मिनरल डेव्हलमेंट कॉर्पोरेशनची जाहिरात पाहावी.

संपूर्णपणे भरलेले अर्ज असिस्टंट जनरल मॅनेजर (पर्सोनेल), आर अ‍ॅण्ड पी, बेलाडीला आयर्न ओर माइन, बछेली कॉम्प्लेक्स, पोस्ट ऑफिस जि. दक्षिण बस्तर, दंतेवाडा- ४९४५५३,   छत्तीसगड या पत्त्यावर

७ नोव्हेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

आयुध निर्माणी, कानपूर येथे स्टोअरकीपरच्या ८ जागा

उमेदवार बारावी उत्तीर्ण असावेत. त्यांना संगणकाचे ज्ञान असावे. वयोमर्यादा २७ वर्षे.

अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १७ ते २३ ऑक्टोबर २०१५च्या अंकातील आयुध निर्माण, कानपूरची जाहिरात पाहावी अथवा http://www.fieldgunindia.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ७ नोव्हेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावा.

दिल्ली न्यायालयीन सेवा निवड परीक्षा- २०१५ अंतर्गत १०० जागा

अर्जदार कायदा विषयातील पदवीधर असावेत. त्यांना वकील म्हणून काम करण्याचा अनुभव असावा. वयोमर्यादा ३२ वर्षे.

अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १७ ते २३ ऑक्टोबर २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली दिल्ली न्यायालयीन सेवा निवड परीक्षेची जाहिरात पाहावी अथवा दिल्ली उच्च न्यायालयाच्या http://www.delhihighcourt.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.

विहित नमुन्यातील अर्ज जॉइंट रजिस्ट्रार (व्हिजिलन्स), हायकोर्ट ऑफ दिल्ली, शेरशहा रोड, नवी दिल्ली- ११०५०३ या पत्त्यावर ७ नोव्हेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

उत्तर-पूर्व रेल्वेमध्ये खेळाडूंसाठी २९ जागा

अर्जदारांनी शालान्त परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. विविध क्रीडा प्रकारांत विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे.

अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १० ते १६ ऑक्टोबर २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली उत्तर पूर्व रेल्वेची जाहिरात पाहावी.

विहित नमुन्यातील अर्ज असिस्टंट पर्सोनेल ऑफिसर (रिक्रूटमेंट) नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे, हेडक्वॉर्टर- मलीगाव, गुवाहाटी- ७८१०११ या पत्त्यावर ९ नोव्हेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

इंडो-तिबेटन सीमा पोलीस दलात असिस्टंट सब-इन्स्पेक्टरच्या (लॅब टेक्निशियन) ४ जागा

उमेदवार बारावी उत्तीर्ण आणि मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमधील पदविकाधारक असावेत. ते शारीरिकदृष्टय़ा पात्र असावेत. त्यांना संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान एक वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा २८ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १० ते १६ ऑक्टोबर २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली इंडो-तिबेटन सीमा पोलीस दलाची जाहिरात पाहावी.

विहित नमुन्यातील अर्ज डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल (मेडिकल) कम्पोझिट हॉस्पिटल, आटीबीपीएफ- एमएचए, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, सीमा नगर, चंदिगढ- १६०००३ या पत्त्यावर ९ नोव्हेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

कर्मचारी राज्य विमा योजनेत पदविकाधारक अभियंत्यांच्या १५४ जागा

अर्जदार सिव्हिल अथवा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील पदविकाधारक असावेत. वयोमर्यादा ३० वर्षे.

अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १० ते १६ ऑक्टोबर २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी राज्य विमा योजनेची जाहिरात पाहावी अथवा ईएसआयसीच्याwww.esic.nic.in  अथवा http://www.esic.nic.in/recruitment या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १० नोव्हेंबर २०१५पर्यंत अर्ज करावेत.

कर्मचारी राज्य विमा योजनेत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ४५० जागा

उमेदवार एमबीबीएस अथवा तत्सम पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा ३० वर्षे.

अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १० ते १६ ऑक्टोबर २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी राज्य विमा योजनेची जाहिरात पाहावी अथवा ईएमआयसीच्या http://www.esic.nic.in  अथवा http://www.esic.nic.in/recruitmet या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर १० नोव्हेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावेत.