07 March 2021

News Flash

नवी संधी

सीएई-ऑक्सफर्ड एव्हिएशन अकादमी, गोंदिया येथे वैमानिक अभ्यासक्रमाची संधी अर्जदारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा भौतिकशास्त्र, गणित व इंग्रजी या विषयांसह उत्तीर्ण केलेली असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत.

| September 7, 2015 12:07 am

सीएई-ऑक्सफर्ड एव्हिएशन अकादमी, गोंदिया येथे वैमानिक अभ्यासक्रमाची संधी अर्जदारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा भौतिकशास्त्र, गणित व इंग्रजी या विषयांसह उत्तीर्ण केलेली असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा ३२ वर्षे.
अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी सीएई-ऑक्सफर्ड एव्हिएशन अकादमी- गोंदियाच्या www.caeoaa.com/gondia या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ९ सप्टेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावेत. स्टील अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया-भिलाई येथे ऑपरेटर कम टेक्निशियनच्या २८३ जागा वयोमर्यादा ४० वर्षे. अधिक माहितीसाठी स्टील अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया भिलाई प्लान्टच्या ६६६.२ं्र३.ू.्रल्ल या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा ‘सेल’ची  ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २९ ऑगस्ट २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ९ सप्टेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावेत. संरक्षण मंत्रालयाच्या दर्जा नियंत्रण विभागात सीनिअर सायंटिफिक ऑफिसरच्या ५ जागा उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन्समधील पदवी अथवा भौतिकशास्त्र अथवा इलेक्ट्रॉनिक्समधील पदव्युत्तर पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. जर्मन भाषेचे ज्ञान असणाऱ्यांना प्राधान्य मिळेल. वयोमर्यादा ३५ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २२ ते २८ ऑगस्ट २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या www.ncaor.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने १० सप्टेंबर २०१५ पर्यंत
अर्ज करावेत.
इंडो-तिबेटन सीमा पोलीस दलात हेडकॉन्स्टेबलच्या १२६ जागा उमेदवार बारावी उत्तीर्ण व इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनीट व हिंदी टंकलेखनची ३५ शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक असावेत. संगणकाचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १४ ऑगस्ट २०१५ च्या अंकातील इंडो-तिबेटन सीमा-पोलीस दलाची जाहिरात पाहावी. अर्ज दि इन्स्पेक्टर जनरल, नॉर्दन फ्रंटिअर हेडक्वार्टर, आयटीबीपी, पोस्ट-सीमाद्वार, जि. देहराडून, उत्तराखंड- २४८००१ या पत्त्यावर १० सप्टेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.
नॅशनल सेंटर फॉर अंटाक्र्टिक अँड ओशन रिसर्च, गोवा येथील संशोधनपर फेलोशिप उमेदवारांनी मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, मरिन बायोलॉजी यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली नॅशनल सेंटर फॉर अंटाक्र्टिक अँड ओशन रिसर्च, गोवाची जाहिरात पाहावी अथवा सेंटरच्या www.bccl.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.उमेदवारांनी अर्ज व कागदपत्रांसह अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इन्चार्ज, नॅशनल सेंटर फॉर अंटाक्र्टिकअँड ओशन रिसर्च, वास्को-द-गामा, गोवा ४०३८०४ या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी ११ सप्टेंबर २०१५ पर्यंत उपस्थित राहावे.

नौदलाच्या तांत्रिक विभागात संधी
अर्जदारांनी कुठल्याही अभियांत्रिकी विषयातील पदवी अथवा बीएस्सी-एमएस्सी (आयटी) बीसीए-एमसीए चांगल्या शैक्षणिक आलेखासह प्राप्त केलेली  असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा २४ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २२ ते २६ ऑगस्ट २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली नौदलाची जाहिरात पाहावी. अथवा नौदलाच्या ६६६.्न्रल्ल्रल्ल्िरंल्लल्लं५८.ॠ५.्रल्ल या संकेतस्थळाला भेट द्यावी. तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज साध्या टपालाने पोस्ट बॉक्स नं. ०४, चाणक्यपुरी पोस्ट ऑफिस, नवी दिल्ली- ११००२१ या पत्त्यावर १२ सप्टेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.
फिजिकल रिसर्च लेबॉरेटरी, अहमदाबाद येथे सायंटिफिक असिस्टंटच्या १८ जागा
उमेदवारांनी बीएस्सी पदवी रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र हे विषय घेऊन व किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा ३५ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २२ ते २८ ऑगस्ट २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली फिजिकल रिसर्च लॅबॉरेटरी, अहमदाबादची जाहिरात पाहावी अथवा लेबॉरेटरीजच्या ६६६.स्र्१्र.१ी२.्रल्ल या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने १२ सप्टेंबर २०१५ पर्यंत

अर्ज करावेत.
 भारत कुकिंग कोल लिमिटेड, धनबाद येथे
स्टाफ नर्स-प्रशिक्षणार्थीच्या ९१ जागाउमेदवार बारावी उत्तीर्ण व नर्सिगमधील पात्रताधारक असायला हव्यात. वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहितीसाठी  ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २२ ते २८ ऑगस्ट २०१५ च्या अंकातील भारत कुकिंग कोलची जाहिरात पाहावी. अथवा कंपनीच्या www.bccl.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १४ सप्टेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावेत.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, मुंबई येथे क्राफ्ट्समन-इलेक्ट्रिकलच्या ३ जागा
उमेदवारांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील पदविका प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी. रिफायनरीविषयक कामाचा किमान एक वर्षांचा अनुभव असावा. सविस्तर तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, मुंबईची जाहिरात पाहावी अथवा कॉर्पोरेशनच्याwww.bpclcareers.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २९ ऑगस्ट २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली बीपीसीएलची जाहिरात पाहावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १४ सप्टेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावा.   ल्ल ल्ल

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2015 12:07 am

Web Title: new opportunity
Next Stories
1 भविष्यातील कल आणि संधी
2 उत्सव.. मृतात्म्यांशी संपर्काचा
3 अतृप्त पसारा  
Just Now!
X