नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अॅण्ड रिसोर्सेस, नवी दिल्ली येथे सहाय्यकांच्या ४ जागा
वयोमर्यादा २८ वर्षे. अधिक माहितीसाठी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अॅण्ड रिसोर्सेसच्या
niscair.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ११ ऑगस्ट २०१५ पर्यंत अर्ज करावेत.

एनटीपीसीमध्ये फायनान्स एक्झिक्युटिव्हच्या १२ जागा
उमेदवार सीए/ आयसीडब्लूए पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा ४२ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २५ ते ३१ जुलै २०१५ च्या अंकातील एनटीपीसीची जाहिरात पाहावी अथवा एनटीपीसीच्या http://www.ntpc.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १२ ऑगस्ट २०१५ पर्यंत अर्ज करावा.

डायरेक्टोरेट ऑफ लाइट हाऊसेस अॅण्ड लाइटशिप्स, चेन्नई येथे फिल्ड असिस्टंटच्या १४ जागा
अर्जदारांनी इलेक्ट्रॉनिक्स वा इलेक्ट्रॉनिक अॅण्ड कम्युनिकेशनमधील पदविका उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ४० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २५ ते ३१ जुलै २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली
जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील भरलेले अर्ज डायरेक्टोरेट ऑफ लाइट हाऊसेस अॅण्ड लाइटशिप्स, दीप भवन, ५/२०, जफ्फर सायरंग स्ट्रीट, चेन्नई- ६००००१ या पत्त्यावर १४ ऑगस्ट २०१५ पर्यंत पाठवावेत.

वायुसेनेत टेलिफोन ऑपरेटरच्या
११ जागा
उमेदवारांनी इंग्रजी विषयासह शालान्त परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. त्यांना संबंधित कामाचा किमान ६ महिन्यांचा अनुभव असावा. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाच्या नमुन्यासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २५ ते ३१ जुलै २०१५ च्या अंकातील वायुसेनेची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज एअर ऑफिसर कमांडिंग, एअर फोर्स स्टेशन, सोहना रोड, गुडगाव १२२००१, हरियाणा या पत्त्यावर १४ ऑगस्ट २०१५ पर्यंत पाठवावेत.

कंबाइंड डिफेन्स सव्र्हिसेस एक्झामिनेशन (२) २०१५ अंतर्गत सैन्य दलात अधिकारीपदाच्या
४६३ जागा
अर्जदार अभियांत्रिकीसह कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत.
वयोमर्यादा २४ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २५ ते ३१ जुलै २०१५ च्या अंकातील केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in या साइटला
भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर १४ ऑगस्ट २०१५ पर्यंत अर्ज करावेत.

ऑर्डनन्स डेपो- तळेगाव दाभाडे येथे कनिष्ठ कारकुनांच्या ६ जागा
अर्जदार बारावी उत्तीर्ण असावेत. त्यांनी इंग्रजी टंकलेखनाची २५ शब्द प्रतिमिनिट तर हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २५ ते ३१ जुलै २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली ऑर्डनन्स डेपो, तळेगाव दाभाडे (जि. पुणे)ची
जाहिरात पाहावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज कमांडंट, ऑर्डनन्स डेपो, तळेगाव दाभाडे, पुणे-४१०५०६ या पत्त्यावर १४ ऑगस्ट २०१५ पर्यंत पाठवावेत.

फूड ऑर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर (अकाऊंटस्) च्या ११ जागा
उमेदवार सीए, आयसीडब्लूए अथवा कंपनी सेक्रेटरी यासारखे पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ११ ते १७ जुलै २०१५ च्या अंकातील फूड कॉर्पोरेशनची जाहिरात पाहावी. अथवा कॉर्पोरेशनच्या http://www.fcijobpartal.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १४ ऑगस्ट २०१५ पर्यंत अर्ज करावेत.

पश्चिम रेल्वेमध्ये खेळाडूंसाठी
४३ जागा
अर्जदार पदवीधर असावेत. त्यांनी अॅथलेटिक्स, क्रिकेट, कबड्डी, खो खो, व्हॉलिबॉल यांसारख्या क्रीडा प्रकारात विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २३ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १८ ते २४ जुलै २०१५ च्या अंकातील पश्चिम रेल्वेची क्रीडाविषयक जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील अर्ज सीनिअर स्पोर्टस् ऑफिसर, वेस्टर्न रेल्वे स्पोर्टस् असोसिएशन, हेडक्वार्टर ऑफिस, चर्चगेट, मुंबई- ४०००२० या पत्त्यावर
१७ ऑगस्ट २०१५ पर्यंत पाठवावेत.