अनेकांना सामाजिक कामांची आवड असते, मात्र त्याकरता आवश्यक ठरणाऱ्या योग्य प्रशिक्षणाच्या आणि मार्गदर्शनाच्या अभावामुळे ते त्यांना शक्य होत नाही. आज सामाजिक कामे ही केवळ फावल्या वेळात करण्याची गोष्ट राहिली नसून हे आता करिअरचे स्वतंत्र क्षेत्र
बनले आहे.
प्रसारमाध्यमांमुळे आपल्यापैकी सर्वानाच विविध सामाजिक समस्यांची जाणीव होते. लंगिक शोषण, अत्याचार, लहान मुलांच्या हक्कांची पायमल्ली यांसारख्या बातम्या आपण वृत्तपत्रांत वाचतो, त्याविषयी हळहळतो आणि विसरूनही जातो. पण जर सामाजिक कामांमध्ये उतरण्याची इच्छा असल्यास आज समाजकार्य विषयाचे रीतसर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्याद्वारे विविध सरकारी तसेच स्वयंसेवी संस्थांमध्ये समाजकार्याच्या पेशात प्रवेश करता येतो. अशा अभ्यासक्रमांमुळे आपल्याला समाजाच्या विविध स्तरांतील समस्यांची जाणीव होते.
सामाजिक समस्यांची कारणे व परिणामांचा अभ्यास करता येतो.
उच्चशिक्षणात वेगवेगळ्या क्षेत्रांत करिअर करत असताना समाजकार्याची आवड जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच नोकरी-व्यवसाय करत असलेल्या व्यक्तींसाठी मुंबईतील निर्मला निकेतन महाविद्यालयाच्या, गोरेगाव येथील विस्तार केंद्राच्या वतीने पुढील अल्पावधीचे समाजकार्य अभ्यासक्रम जानेवारी २०१६ पासून राबवण्यात येत आहेत:
१. पॅरा प्रोफेशनल ट्रेिनग इन सोशलवर्क.
२. सर्टििफकेट कोर्स इन एनजीओ मॅनेजमेंट.
३. सर्टििफकेट कोर्स फॉर सीनियर सिटिझन्स इन सोशल वर्क.
प्रवेशप्रक्रिया आणि अर्जाच्या माहितीसाठी खालील पत्त्यावर संपर्क साधावा :
निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशलवर्क, विस्तार केंद्र, सेंट पायस कॉलेज कॅम्पस, वीरवानि रोड, गेट क्र. २, गोरेगाव पूर्व, मुंबई- ४०००६३. दूरध्वनी क्रमांक: २९२७१४३३/ २९२७०९८१/ ९९३०९९१९५३.