न्यूझीलंड सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून म्हणजेच ‘एज्युकेशन न्यूझीलंड’तर्फे कोणत्याही विषयातील आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी संशोधन करता यावे यासाठी न्यूझीलंड इंटरनॅशनल डॉक्टरल रीसर्च स्कॉलरशिप्स- NZIDRS हा पीएच.डी. कार्यक्रम राबवला जातो. या कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी १५ जुल २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.
शिष्यवृत्तीविषयी..
जागतिक स्तरावरील विविध क्षेत्रांतील गुणवान व्यक्तींद्वारे न्यूझीलंडच्या अर्थव्यवस्थेवर  विविध घटकांच्या सकारात्मक परिणामांचा व  प्रभावाचा अभ्यास करून त्याद्वारे न्यूझीलंडची अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यापार व उद्योगांच्या विकासाला चालना देणे, हा या शिष्यवृत्तीचा हेतू आहे. ही शिष्यवृत्ती  न्यूझीलंड शासनाच्या ‘एज्युकेशन न्यूझीलंड’द्वारे सर्व विद्याशाखांमधील आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी राबवली जाते. या शिष्यवृत्तीत शिकवणी शुल्काचा समावेश आहे.  या शिष्यवृत्तीअंतर्गत एकूण वार्षकि भत्ता २५ हजार न्यूझीलंड डॉलर किंवा प्रतिमहिना दोन हजार डॉलर एवढा मिळेल. शिष्यवृत्तीचा एकूण कालावधी तीन वर्षांचा असेल. शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थ्यांच्या तीन वर्षांच्या वैद्यकीय विमासुरक्षेचाही समावेश असेल. या शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी न्यूझीलंडमधील िलकन विद्यापीठ, मॅसे, ऑकलंड, एयूटी, कंटरबरी, ओटागो, वैकाटो आणि व्हिक्टोरिया विद्यापीठ या आठ विद्यापीठांपकी कोणत्याही एका विद्यापीठामध्ये प्रवेश घेऊ शकतो.

आवश्यक अर्हता
ही शिष्यवृत्ती न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया व फिजी या तीन देशांमधील विद्यार्थ्यांव्यतिरिक्त सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. अर्जदाराच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये त्याचा जीपीए ३.६ /४ किंवा A/ A+ असावा. न्यूझीलंडमध्ये पूर्णवेळ पीएच.डी. करण्याची त्याची तयारी असावी तसेच न्यूझीलंडमध्ये थेट पीएच.डी. प्रवेशासाठी आवश्यक असणारे निकष पूर्ण करावेत. म्हणजेच त्याच्याकडे पदव्युत्तर पदवी असावी आणि त्याने टोफेल अथवा  IELTS या इंग्रजी भाषेच्या दोन्हींपकी कुठल्याही एका परीक्षेत उत्तीर्ण असावे. याव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांची पदवी स्तरावरील शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी. त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व असावे.

अर्ज प्रक्रिया
या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज NZIDRS च्या वेबसाइटवरून डाऊनलोड करून घ्यावा. अर्जामध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे लिहून अर्ज आंतरराष्ट्रीय टपालाने किंवा कुरियर सेवेने संबंधित विद्यापीठाच्या प्रवेश कार्यालयाला (Office of admission) पाठवावा. त्या अर्जासोबत अर्जदाराला इतर आवश्यक कागदपत्रे म्हणजे त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीबद्दल विस्तृतपणे माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी. (Statement of Purpose), आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती, त्याचा सी.व्ही., त्याच्या शैक्षणिक किंवा संशोधन पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापकांचे अथवा प्रकल्प मार्गदर्शकांचे (Project Guide ) ई-मेल आयडी पाठवावेत. संबंधित विद्यापीठ नंतर त्या प्राध्यापकांकडून शिफारसपत्रे
मागवून घेईल.

निवड प्रक्रिया
NZIDRS शिष्यवृत्तीच्या निवडीची संपूर्ण प्रक्रिया गुणवत्तेवर व त्याच्या संशोधन प्रकल्प अहवालावर (Proposed research plan) आधारित आहे. या अहवालामध्ये न्यूझीलंडच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या विविध घटकांच्या सकारात्मक परिणामांचा प्रभाव असावा तसेच त्याचा दर्जा निश्चितच आंतरराष्ट्रीय शोधनिबंधाच्या स्तराचा असावा.

अंतिम मुदत
या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ जुल २०१५ आहे.
महत्त्वाचा संदर्भ
http://enz.govt.nz
itsprathamesh@gmail.com