web-knowledge1बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करताना अनेकदा विविध देशांच्या प्रतिनिधींना भेटावे लागते, त्यांच्याशी चर्चा करावी लागते. अशा वेळेस संभाषण हे जरी इंग्रजीतून होत असले तरी अनेकदा त्या त्या भाषेतील काही महत्त्वाचे शब्द माहीत असण्याची आवश्यकता भासते. अशा वेळेस काही महत्त्वाच्या अ‍ॅप्सची मदत तुम्हाला घेता येईल. भाषांतर करणारी खाली नमूद केलेली अ‍ॅप्स भाषांतरं तंतोतंत किंवा अचूक करत नाहीत. याचं कारण यात भाषांतरं ही प्रोग्रॅिमगद्वारे केलेली असतात. त्यामुळे या अ‍ॅप्सचा वापर केवळ तो शब्द किंवा वाक्य समजावून घेण्याकरता करावा. तंतोतंत व योग्य भाषांतर हवं असल्यास व्यावसायिक भाषांतरकाराची किंवा दुभाषकाची मदत घ्यावी. भाषांतराची अ‍ॅप्स पुढीलप्रमाणे आहेत :

Google Translate
भाषांतरांच्या अ‍ॅप्समध्ये Google Translate हे अ‍ॅप लोकप्रिय आहे आणि बरेच जण त्याचा वापरही करताना दिसतात. यामध्ये तुम्हाला ९० भाषा भाषांतरित करता येतात. तुम्ही तुमच्या आवाजात शब्द म्हणून दाखवला तरी त्याचं भाषांतर करता येतं किंवा कॅमेऱ्यात काढलेल्या फोटोतील मजकुराचंही भाषांतर करता येतं किंवा हस्तलिखित मजकुराचंही असंच भाषांतर करता येतं. म्हणजे उदा. तुम्ही काही कामानिमित्त किंवा फिरायला रशियात गेला असाल आणि तिथे रस्त्यात एखादी पाटी असेल ज्याचा अर्थ तुम्हाला माहीत करून घ्यायचा असेल, तर फोटो काढून त्यातला मजकुर गुगल ट्रान्सलेट तुम्हाला भाषांतरित करून देतो. हे अ‍ॅप तुम्हाला ऑफलाइन म्हणजेच इंटरनेट कनेक्शन नसतानाही वापरता येतं आणि तुम्ही केलेल्या मजकुराचं भाषांतरही तुमच्या मोबाइल किंवा टॅबमध्ये सेव्ह करून ठेवू शकता.
यात असलेल्या महत्त्वाच्या भाषा- आफ्रिकन्स, अरेबिक, बंगाली, कॅटॅलन, बल्गेरियन, चायनीज, झेक, डॅनिश, डच, इंग्रजी, स्पॅनिश, फिलिपिनो, फ्रेंच, फिनिश, जर्मन, ग्रीक, हैतियन, िहदी, हंगेरीयन, लॅटिन, लिथुवेनियन, नेपाळी, माओरी, मल्याळम, पíशयन, पोलीश, पोर्तुगीज, पंजाबी, रशियन, सर्बयिन, तामिळ, तेलुगू, उर्दू, थाई, व्हिएतनामियन,  स्वीडिश इत्यादी.

Free Translator
या अ‍ॅपमध्ये साधारण ५० भाषांमधले शब्द भाषांतरित करण्याची सुविधा आहे. यात दोन मोकळ्या जागा दिलेल्या असतात, जिथे आपल्याला एका जागेत ज्या शब्दाचे भाषांतर हवे आहे तो शब्द टाइप करायचा असतो आणि दुसरीकडे आपोआपच शब्द दिसतो. यात आपण भाषेवर टॅप करूनही भाषांच्या जोडय़ा बदलू शकतो. उदा. मला फ्रेंच भाषेतला Mont म्हणजे माँ हा शब्द भाषांतरित करून हवा असेल, तर मला प्रथम फ्रेंच टू इंग्रजी अशी जोडी घ्यावी लागेल. नंतर मी फ्रेंचच्या चौकटीत mont असं टाइप करून मधल्या लाल बटणावर टॅप केलं की, इंग्रजीतला अर्थ म्हणजे word असा शब्द तिथे दिसेल. यातली खासियत अशी की, इथे भाषांतरित झालेला शब्द तुम्ही कॉपी करून त्याच डिव्हाइसवर  ई-मेल, एसएमएस किंवा व्हॉट्सअ‍ॅप-फेसबुक अशा कोणत्याही ठिकाणी पेस्ट करू शकता. यामध्ये असलेल्या मायक्रोफोनच्या आयकॉनवर क्लिक करून तुम्ही ‘व्हॉइस रेकग्निशन’चा पर्याय निवडूनही शब्दांचे अर्थ शोधू शकता. या अ‍ॅपमध्ये अरेबिक, लॅटिन, फिनिश, पोलिश, थाई, पोर्तुगीज, रशियन, स्वीडिश, सर्बयिन, फ्रेंच, जर्मन इत्यादी भाषा आहेत.

All Language Translator
या अ‍ॅपमध्ये ८० पेक्षा जास्त भाषांचं भाषांतर करता येतं. यामध्ये म्हणी-वाक्प्रचार यांचेही अर्थ योग्य प्रकारे विशद करून सांगितले जातात. वर सांगितलेल्या अ‍ॅपप्रमाणेच या अ‍ॅपमध्येही ‘टेक्स्ट टू स्पीच’ आणि ‘व्हॉइस रेकग्निशन’चे पर्याय देण्यात आलेले आहेत. ‘टेक्स्ट टू स्पीच’ या पर्यायाचा वापर करून तुम्ही भाषांतर ऐकू शकता. शिवाय तुम्ही भाषांतरित केलेला मजकूर शेअर करू शकता आणि भाषांतर स्टोअरदेखील करून ठेवू शकता.

प्रणव सखदेव, sakhadeopranav@gmail.com