दक्षिण-पूर्व रेल्वेमध्ये महिला खेळाडूंसाठी खालीलप्रमाणे संधी उपलब्ध आहेत-
जागांची संख्या : एकूण उपलब्ध जागांची संख्या- १२.
आवश्यक पात्रता : अर्जदार महिला कुठल्याही विषयातील पदवीधर असायला हव्यात व त्यांनी बॅडमिंटन, हॉकी, कबड्डी, भारोत्तोलन, नेमबाजी, टेबल-टेनिस, व्हॉलीबॉल यांसारख्या विषयात राज्य वा राष्ट्रीय स्तरावर विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेली असावी.
वयोमर्यादा : अर्जदार महिलांचे वय २५ वर्षांहून अधिक नसावे.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना क्रीडाकौशल्य चाचणी व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
वेतनश्रेणी व फायदे : निवड झालेल्या महिलांना ५२००-२०२०० + २८०० या वेतनश्रेणीत नेमण्यात येईल. या वेतनश्रेणीतील मूळ वेतनाशिवाय त्यांना रेल्वेच्या नियमांनुसार इतर भत्ते व फायदसुद्धा देय असतील.
अर्जासह पाठवायचे शुल्क : अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून १०० रु.चा एफए अ‍ॅण्ड सीएओ-एसई रेल्वे, गार्डन रीच यांच्या नावे असणारा व कोलकाता येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट व पोस्टल ऑर्डर पाठवावा.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी संपर्क : अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ सप्टेंबर-४ ऑक्टोबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली दक्षिण-पूर्व रेल्वेची जाहिरात पाहावी अथवा दपू रेल्वेच्या http://www.ser.indianrailways.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज असिस्टंट पर्सोनेल ऑफिसर (रिक्रूटमेंट), साऊथ ईस्टर्न रेल्वे, ११, गार्डन रीच रोड, कोलकाता-७०० ०४३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २८ ऑक्टोबर २०१३.
ज्या महिला खेळाडूंना रेल्वेमध्ये आपले करिअर करायचे असेल त्यांनी या रोजगार संधींचा अवश्य फायदा घ्यावा.