पारंपरिक कृषी व्यवसाय कात टाकत असून या क्षेत्रात नवीन कार्यक्षेत्रे आणि त्यानिमित्ताने नवनव्या संधी उपलब्ध होत आहेत. म्हणूनच की काय, यंदा कृषी अभ्यासक्रमांकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत राज्यात मोठी वाढ झाल्याचेही दिसून येते. कृषीक्षेत्रातील नोकरी- व्यवसायाच्या संधींची ही ओळख-

कृषिउद्योग, शेती व्यवसाय हे आपल्या जीवनशैलीचे अविभाज्य घटक आहेत. मानवी उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर जेव्हा मानव भटकंतीचे आयुष्य जगत होता, तेव्हा अपघाताने मानवाला बीज अंकुरणाची क्रिया ज्ञात झाली, परंतु बऱ्याच प्रयत्नांनंतर सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी आपल्याला परिचित असलेल्या शेती पद्धतीचा उदय झाला. २५०० वर्षांपूर्वी भारतीय शेतकऱ्यांनी मसाल्याच्या पदार्थाची, उसाची लागवड सुरू केली. १९६० सालापर्यंत भारत अन्नधान्याची आयात करीत असे, पण १९६५ आणि १९६६ मध्ये देशात आलेल्या दुष्काळानंतर सरकारने शेतीविषयक धोरणात योग्य ते बदल करून, देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले आणि आज भारत अन्नधान्याच्या उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर, तर फळे आणि भाजीपाला उत्पादनाच्या बाबतीत जगभरात अग्रणी आहे. आपल्या देशात फुलांचे उत्पादनही मोठय़ा प्रमाणावर केले जाते. भारतातील आजच्या शेतीची वाटचाल जागतिकीकरणाकडे सुरू आहे. याच धर्तीवर भारतीय शेती उद्योगाचाही जागतिक अर्थव्यवस्थेत वाढता सहभाग असावा, यावर हे धोरण जोर धरीत आहे. भारताकडे शेती उत्पादनांच्या निर्यातीची अमाप क्षमता आहे. उदा. मशरुम्स (भू छत्र्या), फुले, मसाल्याचे पदार्थ, धान्य, तेलबिया आणि भाजीपाला. सरकारने शेती उत्पादनांच्या निर्यातीसाठी दिलेल्या पाठिंब्यामुळे मोठय़ा उद्योगसमूहांनी विदेशातील अग्रेसर कंपन्यांशी टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर (तंत्रज्ञानाचे अंतरण-करार ), मार्केटिंग टाय-अप (विपणनाचे करार) असे करार केले आहेत. देशातील फुलांच्या व्यापाराने निर्यात बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केले आहे. गुलाब, कान्रेशन, ग्लाडिओली, मोगरा आणि इतर उष्ण कटिबंधीय फुले आणि रोपे देशातून निर्यात होतात.
फळे आणि भाजीपाला यामध्येही भारताला निर्यात उद्योग वाढवण्यासाठी भरपूर वाव आहे. शेती आणि फळबागायतींचे व्यापारीकरण झाल्याने या क्षेत्रातही नोकरीच्या तसेच स्वत:चा उद्योग सुरू करण्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. सरकारी किंवा खासगी आस्थापनांतून फक्त ठराविक वेतन आपल्या हाती पडते तर अशा व्यवसायातून घसघशीत लाभही होऊ शकतो.
मोठमोठी हॉटेल्स, हेल्थ फाम्र्स, रिसॉर्ट येथे लँडस्केपर्स आणि हॉर्टिकल्चरिस्ट तेथील जागा सुशोभित करण्यासाठी मुद्दामहून नियुक्त केले जातात. फुलांचे आणि फुलझाडांचे विक्रेते यांचा व्यवसाय देशातील महानगरांमधून चांगलाच फायदेशीर होताना दिसतो. उपनगरांमधील फुलबागायतदार हे या उद्योगासाठी माल पुरवण्याचे काम करतात.
कृषिउद्योगातील नोकरीच्या संधी
निरनिराळी शेतकी विद्यापीठे, शेतकीच्या द्वीपदवीधरांची निरनिराळ्या विषयांसाठी नेमणूक करतात. ते वेगवेगळे विषय खालीलप्रमाणे- प्लान्ट पॅथोलॉजिस्ट, ब्रीडर, अ‍ॅग्रो मीटरोलॉजिस्ट, इकॉनॉमिक बॉटनिस्ट, रिसर्च इंजिनीअर, अ‍ॅग्रोनॉमिस्ट, सायंटिस्ट, असोसिएट प्रोफेसर वगरे.
याव्यतिरिक्त असिस्टंट सायन्टिस्ट, असिस्टंट प्रोफेसर, डिस्ट्रिक्ट एक्स्टेन्शन स्पेशालिस्ट, असिस्टंट पॅथोलॉजिस्ट, असिस्टन्ट बॅक्टेरिओलॉजिस्ट, असिस्टंट इकॉनॉमिक बॉटनिस्ट, असिस्टंट सॉइल केमिस्ट, असिस्टंट फ्रुट ब्रीडर, असिस्टंट सीड रिसर्च ऑफिसर, ज्युनिअर एन्टोमोलॉजिस्ट, असिस्टंट ब्रीडर, ज्युनिअर ब्रीडर, ज्युनिअर अ‍ॅग्रोनॉमिस्ट, असिस्टंट व्हेजिटेबल बॉटनिस्ट, सीड प्रॉडक्शन असिस्टंट, असिस्टंट रिसर्च सायंटिस्ट, असिस्टंट प्लान्ट फिजिओलॉजिस्ट.
वरील सर्व पदांसाठी संबंधित विषयातील पीएच.डी./मास्टर्स डिग्री आवश्यक असते. मात्र काही पदांसाठी अनुभवही आवश्यक असतो. तसेच शैक्षणिक पदांसाठी ‘नेट’ची पात्रता आवश्यक असते. वरिष्ठ पदांसाठी मात्र संबंधित विषयातील पीएच.डी. डिग्री अनिवार्य आहे.
इंडिअन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च विद्यार्थी या संस्थेतून संशोधनात करिअर करू शकतात, आणि शेती संशोधक बनू शकतात. या पदांसाठी एआरएस/नेट परीक्षा पास होणे आवश्यक आहे. आता संस्थेकडून एआरएस/नेट परीक्षेच्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे. आता ही परीक्षा पूर्वपरीक्षा व त्यात उत्तीर्ण झाल्यास मुख्य परीक्षा आणि मुख्य परीक्षेतील गुणांवर मुलाखतीसाठीची पात्रता ठरेल, अशा प्रकारे घेण्यात येईल.
या संस्थेत शेतकी विषयातील पदवीधरांना, द्विपदवीधरांना तंत्रज्ञानविषयक नोकऱ्या मिळू शकतात.
राज्याच्या कृषी खात्यात अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून नोकरी मिळू शकते. यासाठीची नेमणूक लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे केली जाते.
खासगी उद्योगक्षेत्रात रिसर्च सायंटिस्ट म्हणूनही संधी मिळू शकते. यासाठी पीएच.डी. पदवीधारक असणे गरजेचे आहे.
शेती विषयातून पदवीधर झाल्यानंतर उमेदवार आर.बी.आय, एस.बी.आय, ब्रीिडग फाम्र्स, कुक्कुटपालन, विमा कंपनी, राष्ट्रीयीकृत बँकमधून या क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांची फिल्ड ऑफिसर, ग्राम विकास अधिकारी म्हणून नेमणूक होऊ शकते.
या क्षेत्रातील आणखी एक नोकरीची संधी म्हणजे बियाणे कंपनीत बियाणे अधिकारी तसेच संशोधक म्हणून जबाबदारी स्वीकारता येईल. तसेच फार्म मॅनेजमेंट, लँड अप्रेजल, ग्रेिडग, पॅकेजिंग, लेबिलग या क्षेत्रात खासगी किंवा सरकारी खात्यात, किंवा याच संदर्भातील विपणन, विक्री, वाहतूक, स्टोअरेज आणि वेअरहाऊसिंग याही ठिकाणी नोकरीच्या संधी मिळू शकतात.
इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिटय़ूट फॉर सेमी एरिड ट्रॉपिक्स येथे शेतीविषयक संशोधन कार्य चालते. दूतावासातून अ‍ॅग्रीकल्चरल स्पेशालिस्ट म्हणून नोकरी मिळू शकते.
या उद्योगात वैज्ञानिक, अभियंते, तंत्रज्ञ, विपणन क्षेत्र, उत्पादन क्षेत्र, हे काम मुख्यत्वे करून उत्पादन, अन्नप्रक्रिया, धान्य- बी बियाणांवरील प्रक्रिया, कापड उद्योग, खतकारखाने, कीटकनाशके, पशुखाद्यनिर्मिती, बांधकाम या सर्व क्षेत्रांत पुरेसे ज्ञान असलेल्या व्यक्तींची गरज असते.
शेतकी अभियंता- अभियांत्रिकीच्या इतर शाखांपेक्षा, या विद्याशाखेतील पदवीधरांना नोकरीच्या संधी अधिक उपलब्ध होतात. या अंतर्गत शेती करण्याच्या पद्धतीत सुधारणा, शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री, वीजनिर्मिती, जमीन आणि पाणी यांचे रक्षण, खेडय़ांचे विद्युतीकरण वगरे.
शेतीचे नियोजन – थंड हवेच्या ठिकाणचे चहाचे मळे किंवा जमीन यांची सुधारणा.
सेवा क्षेत्र –  शेतीसाठी वेळेवर आणि वाजवी किमतीत बी-बियाणांचा, रसायनांचा, खतांचा  पुरवठा, ग्राहकांना मिळणाऱ्या खाद्यवस्तू योग्य दर्जाच्या आहेत की नाही हे तपासण्यासाठी प्रशिक्षित व्यक्ती, शेतकी तंत्रज्ञ, कृषी सल्लागार, कृषी सांख्यिकी, पशुचिकित्सक आदी संधी सेवा क्षेत्रातही उपलब्ध आहेत.
केंद्र, राज्य आणि तालुका पातळीवर शेतकी शिक्षण घेतलेल्या बेरोजगारांना नोकरी देण्यासाठी सरकारी संस्था कार्यरत असतात. त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या  संस्थेत सल्लागार म्हणून नोकरीची संधी मिळू शकते.
अनेक महामंडळे, नॅशनल सीड कॉर्पोरेशन, स्टेट फार्म कॉर्पोरेशन, वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन, फूड कॉर्पोरेशन येथेही कृषी शिक्षण घेतलेल्या व्यक्ती नियुक्त केल्या जातात.
पारंपरिक कृषी क्षेत्र कात टाकत असून या क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होत असल्याने मोठय़ा संख्येने विद्यार्थी कृषी अभ्यासक्रमांकडे वळताना दिसतात, हे सुचिन्हच म्हणावे लागेल. ल्ल

कृषीक्षेत्रातील सुधारणा
वैज्ञानिक सुधारणांच्या सहाय्याने  सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्याला शेतीची कामे कमीतकमी श्रमात करून जास्तीतजास्त  फायदा मिळवता येणे शक्य बनले आहे. सुधारित शेती ही लाभदायक असल्याची जाणीव सर्वदूर पोहोचणे गरजेचे आहे. चेनसॉज, ट्रीमर्स, संगणकाने नियंत्रित होणारी यंत्रे, जी.पी.एस. बेस्ड कामावर देखरेख करणाऱ्या यंत्रणा यांमुळे शेतीकामातील मानवी कष्टांची गरज खूप कमी झाली आहे. शेती तंत्रज्ञान-  नॅनोटेक्नोलॉजी आणि जेनेटिक इंजिनीअरिंगमुळे अनेक संकरित रोपांचे उत्पादन शक्य झाले.
आरोग्याची जपणूक करण्यासाठी अलीकडे ऑरगॅनिक भाजीपाला आणि फळे, योग्य तीच खते, कीटकनाशके वापरून पिकवलेली उत्पादने, अयोनायिझग रेडिएशनशिवाय प्रक्रिया झालेली खाद्य उत्पादने यांची मागणी वाढली आहे.
जेनोमिक्स- आनुवंशिकतेत बदल करून वाढवलेल्या रोपांमध्ये प्रतिकारशक्ती जास्त असते, पोषणमूल्येही भरपूर प्रमाणात अढळतात.
प्राण्यांच्या संकरित जाती-  विज्ञानातील शोध आणि तंत्रज्ञानातील सुधारणा यातून संकरित गायी, म्हशी, शेळी यांची पदास करणे शक्य झाले, ‘क्रॉस ब्रीिडग’ पद्धतीद्वारे उत्तम जननक्षमतेच्या म्हशींच्या जाती निर्माण झाल्या.

 

अनुवाद – गीता सोनी