देशांतर्गत कार्यरत असणाऱ्या चैल (हिमाचल प्रदेश), अजमेर (राजस्थान), बेळगाव (कर्नाटक) व घौलपूर (राजस्थान) येथील सैनिक शाळांमध्ये सहाव्या आणि नवव्या इयत्तेत प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी  अर्हताप्राप्त विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक पात्रता
अर्जदार विद्यार्थी खालीलप्रमाणे पात्रताधारक असावेत-
सहाव्या इयत्तेतील प्रवेश- औपचारिक शैक्षणिक पात्रतेची अट नसली तरी अर्जदार विद्यार्थ्यांचे वय १० ते ११ वर्षांच्या दरम्यान असावे.
नवव्या इयत्तेतील प्रवेश- अर्जदार विद्यार्थी आठवीची परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत अथवा त्यांनी आठवीची परीक्षा दिलेली असावी. त्यांचे वय १३ ते १४ वर्षांच्या दरम्यान असावे.
प्रवेश पद्धती
अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही परीक्षा वर नमूद केलेल्या राष्ट्रीय शाळा केंद्रांवर २० डिसेंबर २०१५ रोजी घेण्यात येईल. त्यामध्ये इंग्रजी, हिंदी, सामाजिक विज्ञान, गणित व विज्ञान या विषयांचा समावेश असेल. लेखी निवड परीक्षेत विशिष्ट गुणांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सैनिक शाळेतील संबंधित इयत्तेत प्रवेश देण्यात येईल.
अर्ज व माहितीपत्रक
अभ्यासक्रम आणि प्रवेश अर्ज घरपोच मिळविण्यासाठी सर्वसाधारण गटाच्या विद्यार्थ्यांनी ५५० रुपयांचा (राखीव गटातील विद्यार्थ्यांनी ३०० रुपयांचा) ‘राष्ट्रीय मिलिटरी स्कूल’ च्या नावे असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह संबंधित राष्ट्रीय सैनिक शाळांमध्ये पाठवावा.
अधिक माहिती
प्रवेश पद्धतीच्या संदर्भात अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली राष्ट्रीय सैनिक शाळेची जाहिरात पाहावी अथवा सैनिक शाळांच्या खालील दूरध्वनी केंद्रांवर संपर्क साधावा- राष्ट्रीय सैनिक शाळा, चैल- दूरध्वनी क्र. ०१७९२- २४८३२६, अजमेर- ०१४५- २६२४१०५, बेळगाव- ०८३१- २४०६९१२, बंगळुरू- ०८०- २५५५४९६२, धौलपूर- ०५६४२- २२०७४९.
अर्ज पाठविण्याची मुदत
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज संबंधित राष्ट्रीय सैनिक शाळेत  १५ ऑक्टोबर २०१५  पर्यंत पाठवावेत.