News Flash

राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसरची संधी

इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (कइढर), मुंबईने २१ राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स/मॅनेजमेन्ट ट्रेनीज या पदांसाठी २२ जुलैपासून पासून भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या परीक्षेसाठी

| August 12, 2013 12:04 pm

इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS), मुंबईने २१ राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स/मॅनेजमेन्ट ट्रेनीज या पदांसाठी २२ जुलैपासून पासून भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या परीक्षेसाठी (CWE) १२ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करायची आहे, तसेच ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची लेखी परीक्षा १९, २०, २६, २७ नोव्हेंबर २०१३ रोजी होईल. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी www.ibps.in   या वेबसाइटचा उपयोग करावा.  
परीक्षेचे नाव – कॉमन रिटर्न एक्झामिनेशन  cwe) फॉर रिक्रूटमेन्ट ऑफ प्रोबेशनरी ऑफिसर्स/मॅनेजमेन्ट ट्रेनीज, आयबीपीएस.
 वेबसाइट –   www.ibps.in
ऑनलाइन नोंदणी १२ ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत.
ऑनलाइन शुल्क १२ ऑगस्टपर्यंत भरावे.
ऑफलाइन फी १७ ऑगस्टपर्यंत भरावी.
ऑनलाइन परीक्षेची तारीख-  १९, २०, २६, २७ नोव्हेंबर २०१३
मुलाखत जानेवारी २०१४ च्या तिसऱ्या आठवडय़ात होईल.
वयोमर्यादा – १ जुलै २०१३ रोजी कमीत कमी वय २० वर्षे व जास्तीत जास्त वय ३० वर्षे असावे. उच्चतम वयोमर्यादेत सवलत पुढीलप्रमाणे : एससी/एसटी- ५ वर्षे, ओबीसी- ३ वर्षे, अपंग- १० वर्षे, माजी सनिक- ५ वर्षे .
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
परीक्षा फी – जनरलसाठी परीक्षा फी रु. ६०० व एससी/एसटी/अपंगासाठी परीक्षा फी रु. १०० आहे.
लेखी परीक्षेसाठी केंद्रे –
ऑब्जेक्टिव्ह ऑनलाइन परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यात  (स्टेट कोड ३० ) केंद्रे पुढीलप्रमाणे आहेत – पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, भुसावळ, बुलढाणा, जळगाव, नांदेड, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, वर्धा, वारणानगर इ.
ऑनलाइन लेखी परीक्षेचे स्वरूप –
एकूण पाच विषय, प्रश्न २००, एकूण गुण २००, वेळ मर्यादा दोन तास राहील.
या परीक्षेचे विषय पुढीलप्रमाणे- रिजनिंग, इंग्लिश, क्वॉन्टिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूट, जनरल अवेअरनेस, संगणक ज्ञान.
 परीक्षेत निगेटिव्ह माíकंग पद्धती आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तराचे ०.२५ गुण वजा केले जातील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 12:04 pm

Web Title: opportunities in nationalised bank for probationary officer
Next Stories
1 धर्म आणि विज्ञान यांच्या पेचात सापडलेले ब्लेझ पास्कल
2 गिर्यारोहण- छंदाकडून करिअरकडे
3 पं. भीमसेन जोशी शिष्यवृत्ती
Just Now!
X