विविध क्षेत्रांत करिअर घडवण्याची संधी जीवशास्त्र विषयाच्या उच्च शिक्षणामुळे उपलब्ध होते. जीवशास्त्राचे उच्च शिक्षण आणि करिअर संधींची एक ओळख –

डॉक्टर व्हायचे असेल तरच जीवशास्त्र विषय घ्यावा, अन्यथा त्याचे काहीही महत्त्व नाही, असा सर्वसामान्य समज आहे. केवळ डॉक्टरांची संख्या वाढवणे महत्त्वाचे नसून नस्रेस, नìसग असिस्टंट, हॉस्पिटल मॅनेजमेंट, मेडिकल टेक्निशियन्स, औषधी वनस्पतींची लागवड करणारे, औषधी निर्माते, औषधी विक्रेते, पॅथॉलाजी, ब्लड बँक, विविध रोगांचे निदान करणारी यंत्रणा, हॉस्पिटलशी संबंधित उपकरणांचे, केमिकल्सचे संशोधन करणारे, त्यांची प्रत्यक्ष निर्मिती करणारे व सर्वसामान्यांपर्यंत ते पोहचविणारे, प्राणिसंग्रहालये, वन, अभयारण्ये येथे कार्यरत व्यक्ती या सर्व घटकांचा या पृथ्वीतलावर सजीवांच्या सुखी जीवनासाठी महत्त्वाचा सहभाग आहे. तसेच या सर्व घटकांचा परस्पर संबंध आहे. म्हणून या सर्व क्षेत्रांचा विद्यार्थ्यांनी व पालकांनी विषय व त्यासोबत करिअर निवडताना सकारात्मक विचार केला पाहिजे.
विद्यार्थ्यांपेक्षा पालकांचा गरसमज व दृष्टिकोन हा खालील गरसमजामुळे वेगळा बनलेला आहे. अभियांत्रिकीच्या क्षेत्रात चांगल्या नोकऱ्या, पसा व प्रतिष्ठा मिळते. त्यामुळे जीवशास्त्र या विषयाचा अभ्यास करण्याची गरजच नाही. भूगोल विषयाला प्रात्यक्षिके नसल्याने वेळ वाचतो. जीवशास्त्राऐवजी भूगोल हा विषय घेतल्यास, पी.सी.एम ग्रूपच्या अभ्यासासाठी जास्त वेळ मिळू शकतो. त्यामुळे जीवशास्त्र हा विषय घेण्यास ते मुला-मुलींना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांना परावृत्त करतात. त्यामुळे जीवशास्त्र विषयाची आवश्यकता असलेले अभ्यासक्रम, पदव्या, विविध कार्यक्षेत्रामध्ये, भविष्यात ते करिअर करू शकत नाहीत आणि त्यापासून विद्यार्थी वंचित राहतात.
वैद्यकीय क्षेत्रात नोकरीच्या संधी खूप आहेत, हे क्लिनिक व हॉस्पिटलमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी पाहिल्यावर कळते. अनेक मोठय़ा मोठय़ा व अत्याधुनिक हॉस्पिटलमध्ये, महाविद्यालयांमध्ये, वैद्यकशास्त्राशी संबंधित अनेक क्षेत्रांत उदा. पॅरामेडिकल, पॅथॉलॉजी, फार्माकोलॉजी, मेडिकल टेक्नॉलॉजी, रेडिऑलॉजी, नॅचरोपॅथी, आफ्थॅलमॉलॉजी, ऑडिओलॉजी अँड स्पीच थेरपी (मूक-बधिर, अपंग) वगरे क्षेत्रांत देशात व परदेशात चांगल्या हुद्दय़ाच्या, प्रतिष्ठेच्या व वेतनाच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. याच्याशी संबंधित कंपन्यांत, नर्सरीत, सरकारी व खासगी कार्यालयात विविध प्रकारचे व्यवस्थापन, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ, वैज्ञानिक, तज्ज्ञ, उत्पादक, साहाय्यक व इतर मनुष्यबळाची मोठय़ा प्रमाणात मागणी व गरज आहे.
देशाला अभियंत्याची जशी गरज आहे, तशीच गरज चित्रकारांचीही आहे, तेवढीच गरज वनस्पती तज्ज्ञांचीही आहे. तेवढीच गरज चोख हिशोब ठेवणाऱ्या अकाउंटण्टची व वैद्यकीय विषयाशी निगडित क्षेत्रातील व्यक्तींची आहे.
० विविध व असंख्य प्रकारचे कारखाने, खासगी कार्यालये, पालिका, सरकारी दवाखाने, सैन्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून फार मोठय़ा संख्येत विद्यार्थ्यांची आवश्यकता आहे.
० विविध अवयवांच्या कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रियांसाठी तज्ज्ञ व्यक्तींची आवश्यकता आहे.
० डेअरी (दूध प्रक्रिया), कुक्कूटपालन, शेळी-मेंढीपालन, पशुपालन, रेशीम उद्योग, मध निर्मिती, मत्स्य उद्योग (फिशरी), व्हेटर्नरी शाखा , हॉर्टिकल्चर, साखर कारखाने अशा विविध क्षेत्रांत वेगवेगळ्या पदांवर नोकऱ्या मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत.
० संगणकावर अ‍ॅनिमेशन करणाऱ्या तज्ज्ञांचा जीवशास्त्र हा विषय इ. अकरावी, बारावी तसेच पदवीला असेल तर तो चांगल्या प्रकारे शरीरातील रक्ताभिसरण व वेगवेगळ्या अवयवांची व त्यांच्या कार्याची अचूक फिल्म बनवू शकेल. कारण यातील मूळ व मूलभूत बाबी त्याला माहिती असतात.
जीवशास्त्र विषयाशी संबंधित बायोकेमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, बायोफिजिक्स, बायोस्टॅटिस्टिक्स, बायो-मेडिकल इंजिनीअिरग, बायोइन्फॉम्रेटिक्स, बायो-इलेक्ट्रॉनिक्स या लाइफ सायन्सेसच्या महत्त्वाच्या शाखा आहेत. बायोटेक्नॉलॉजी (जैवतंत्रज्ञान) मध्ये मरिन, मेडिकल, इंडस्ट्रियल, अ‍ॅॅनिमल, प्लान्ट अशा उपशाखा आहेत. तर जेनेटिक्समध्ये ह्य़ुमन, अ‍ॅनिमल, जेनेटिक इंजिनीअरिंग, पॉप्युलेशन जेनेटिक्स अशा विविध उपशाखा आहेत.
    जीवशास्त्रात करिअर करून किंवा उच्च शिक्षण घेऊन फिजीशियन, डेंटिस्ट, फार्मासिस्ट, थेरपिस्ट, वैद्यक तंत्रज्ञ, प्रशासक, व्यवस्थापक, संशोधक, महाविद्यालयीन प्राध्यापक यासारख्या पदावर काम करता येते. विविध संस्थेत खरेदी, विपणन, व्यापार, उत्पादन, संशोधन, प्रशासकीय जबाबदाऱ्या
अशा विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे आणि घेतलेल्या विविध पदवी, पदविका, पदव्युत्तर शिक्षणानुसार वेगवेगळ्या पदांवर भरपूर संधी उपलब्ध आहेत.
एन.आय.व्ही तसेच नीरी (NEERI) नागपूर वगरे ठिकाणी औषधी वनस्पतीवर संशोधन करणाऱ्या तसेच औषधे निर्माण करणाऱ्या, पेस्टीसाइड फवारणी व इतर सेवा देणाऱ्या खासगी, निमशासकीय, शासकीय संस्था तसेच संशोधन प्रकल्प राबविणारी विद्यापीठे आहेत.
आय.टी. पेक्षा बी.टी. व शेतीशी निगडित क्षेत्रात अनेक संधी असल्याने व शासनाच्या विविध योजना, सवलती मिळत असल्याने विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. अकरावी-बारावीला जीवशास्त्र विषय घेतला तरच यापुढील शिक्षण व संबंधित विषयात उच्च शिक्षण घेता येईल. गणित, भूगोल, जीवशास्त्र हे विषय ऐच्छिक आहेत. बारावीला फिजिक्स, गणित या सक्तीच्या विषयासह रसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जीवशास्त्र यापकी एका विषयात एकत्रितरीत्या किमान ४५ टक्के गुण मिळविण्याची अट आहे. रसायनशास्त्रात कमी गुण मिळाल्यास जीवशास्त्र विषयाचा फार मोठा फायदा असल्याने अभियांत्रिकीसाठी पात्र ठरू शकतात. केवळ गरसमजुतीने किंवा वरील क्षेत्रांची माहिती नसल्याने जर जीवशास्त्र विषय घेतला नाही तर मात्र वरील असंख्य व महत्त्वाच्या बाबींपासून विद्यार्थी वंचित राहू शकतो.
पुण्यातील जीवशास्त्रज्ञ डॉ. अभय जेरे यांच्या www.abhayjere.com या संकेतस्थळावरून संशोधन संस्था, शिष्यवृत्तीबाबत भरपूर माहिती घेता येईल. इंटरनेटचा वापर न करणाऱ्या विद्यार्थी व पालकांनी मात्र महाविद्यालयातील जीवशास्त्र विषय सबंधित विभागाशी, प्राध्यापक, संशोधक, उद्योजकांशी प्रत्यक्ष संपर्क करावा.
 निसर्गाचा समतोल साधण्यासाठी, प्रदूषण टाळण्यासाठी, जन-जागृतीनिर्माण करण्यासाठी, निसर्गाचे व नसíगक संपत्तीचे संवर्धन व वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी अनेक उपयुक्त अभ्यासक्रम आहेत ज्याचा अभ्यास करणे ही काळाची गरज आहे.                        

विविध कार्यक्षेत्रे
फार्मास्युटिकल्स, बायोलॉजिकल टेिस्टग लेबोरेटरीज, कॉस्मेटिक्स कन्सर्स, व्हेटर्नरी, इंडियन काऊन्सिल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च (ICAR ), काऊन्सिल ऑफ सायंटिफीक अ‍ॅण्ड इंडस्ट्रिअल रिसर्च, झुऑलॉजीकल पार्कस्, फूड प्रोसेसिंग कंपनीज, वैद्यक उद्योग, मेडिकल कॉर्पोरेशन्स, पेपर इंडस्ट्रीज, पशुपालन, हॉर्टिकल्चर, सेंटर फॉर द एन ए िफगरिपट्रिंग अ‍ॅण्ड डायग्नॉस्टिक्स, हैद्राबाद. इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनीअिरग अ‍ॅण्ड बायोटेक, दिल्ली. सेंटर फॉर सेल्युलर अ‍ॅण्ड मॉलीक्युलर बायलॉजी, हैद्राबाद. सेंटर फॉर बायोकेमिकल टेक्नॉलॉजी, न्यू दिल्ली. बोटॅनिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया, झुऑलॉजीकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया. पुणे येथील नावाजलेल्या एन सी एल, एन सी सी एस, आघारकर रिसर्च इन्स्टिटय़ूट.