19 September 2020

News Flash

कृषी व सहकार मंत्रालयात संधी

केंद्र सरकारच्या कृषी व सहकार मंत्रालयात साहाय्यक भू-संवर्धन अधिकारी म्हणून खालील संधी उपलब्ध आहेत

| December 22, 2014 01:15 am

केंद्र सरकारच्या कृषी व सहकार मंत्रालयात साहाय्यक भू-संवर्धन अधिकारी म्हणून खालील संधी उपलब्ध आहेत-

शैक्षणिक पात्रता व अनुभव : उमेदवारांनी कृषी, कृषी- अ‍ॅग्रॉनॉमी, कृषी- रसायनशास्त्र,भू-विज्ञान, कृषी विस्तार, कृषी- अर्थशास्त्र, जीवशास्त्र, कृषी- जीवशास्त्र, वन व्यवस्थापन वा कृषी अभियांत्रिकी यासारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांना संबंधित क्षेत्रात काम करण्याचा कमीतकमी पाच वर्षांचा अनुभव असावा.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
वेतनश्रेणी व लाभ : निवड झालेल्या उमेदवारांना कृषी व सहकार मंत्रालयात साहाय्यक भू-संवर्धन अधिकारी म्हणून दरमहा रु. ६,५००-१०,५०० या वेतनश्रेणीत नेमण्यात येईल.
या वेतनश्रेणीतील मूळ वेतनाशिवाय त्यांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार इतर भत्ते व लाभही
देय असतील.
अधिक माहितीसाठी संपर्क : यासंदर्भात अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या
१५ ते २१ नोव्हेंबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय कृषी व सहकार मंत्रालयाची जाहिरात पाहावी. अथवा मंत्रालयाच्या www.agricoop.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : संपूर्णपणे भरलेले अर्ज अंडर सेक्रेटरी (पर्सोनेल- २), कृषी मंत्रालय, कृषी- सहकार विभाग, रूम नं. ३७, एफ विंग, तळमजला, कृषी भवन, नवी दिल्ली- ११० ११४ या पत्त्यावर १४ जानेवारी २०१५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2014 1:15 am

Web Title: opportunity in ministry of agriculture and co operation
Next Stories
1 वन-व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका
2 तयारी एमपीएससीची: मुलाखतीची तयारी
3 भारताचे स्वातंत्र्योत्तर दृढीकरण
Just Now!
X