अभ्यासप्रमुख, आयआयजेटी-एज्युकेशन
व्यावसायिक वित्तीय सल्लागार (सर्टिफाइड फायनान्शियल प्लानर अर्थात सीएफपी) प्रमाणपत्र मिळवणे हे आर्थिक नियोजनाच्या विश्वातील चावी मिळवण्यासारखे नसेल कदाचित. परंतु, मालमत्ता व्यवस्थापनाचे वस्तूकरण करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने नफ्याचे प्रमाण कमी होत आहे. प्रत्येकाला हे व्यासपीठ उपलब्ध असताना तुम्ही स्वतचे वेगळेपण कसे प्रस्थापित कराल?
नियोजनामुळे सगळेच बदलून जाते. तुमच्याकडे बघण्याचा इतरांचा दृष्टिकोन बदलतो. सीएफपी हे नवा बाँड किंवा सणसणीत स्टॉक टीप यासाठी कॉल करणारे, ‘फंड फॅमिली’त दाखल होणार असलेल्या उत्तम व्यापारविषयक वाटाघाटींचा लाभ करून देण्यासाठी प्रयत्न करणारे यापेक्षाही वेगळे असतात. ‘सीएफपी’ ही अशी व्यक्ती असते, जी आपल्या ग्राहकाची मालमत्ता आता आणि भविष्यातही सुरक्षित आहे, याची खात्री करण्यासाठी ग्राहकासोबत त्याच्या वकिलाकडे जाते. ते वैविध्यपूर्ण प्रकारचा आर्थिक पोर्टफोलिओ तयार करण्यासाठीच केवळ मदत करत नाहीत, तर त्यांना मृत्युपत्र प्रमाणपत्र टाळण्यासाठी, संपत्ती करासाठी मदत करतात आणि मादकद्रव्यांची सवय असलेले त्यांचे उधळपट्टी करणारे अपत्य वारशाने मिळालेली संपत्ती उधळून टाकणार नाही, याचीही काळजी घेतात.
भारतातील ‘एचएनआय’ची संख्या २००९ साली ८४ हजार होती, ती गतवर्षांपर्यंत जवळपास दुप्पट- म्हणजेच एक लाख १५ हजारांपेक्षा वाढली आहे. मात्र, ‘सीएफपी’च्या संख्येत त्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत नाही. भारतातील ‘सीएफपी’ प्रमाणित व्यावसायिकांची संख्या १,५०० आहे आणि सीएफपी परीक्षा उत्तीर्ण झालेले, पण प्रमाणित न झालेले असे आणखी १,५०० आहेत. ‘सीएफपी’साठी असलेल्या संधी स्पष्टच आहेत. ‘एचएनआय’ म्हणजे वार्षकि पाच कोटींहून अधिक गुंतवणूक क्षमता असलेल्या व्यक्ती. ‘एचएनआय’ साधारणत: स्थावर मालमत्ता, शेअर बाजार, म्युच्युअल फंड, विमा, सोने, मुदतठेवी आदींमध्ये गुंतवणूक करतात. ग्राहकांचा संतुलित पोर्टफोलिओ तयार करण्यास मदत करण्यासाठी व्यावसायिक वित्तीय सल्लागार या प्रत्येक प्रकारामध्ये कुशल झालेला असतो. ‘सीएफपी’ सुस्पष्ट बोलणारा, पारदर्शक असावा लागतो. त्याने गुंतवणुकीचे लक्ष्य निश्चित करायचे असते आणि आपल्या आवडीनिवडींपेक्षा ग्राहकांच्या आवडीनिवडींचा विचार आधी करायचा असतो.
सोप्या भाषेत सांगायचे तर, माझी दरवर्षी बचत करण्याची क्षमता एक लाख रुपये असेल तर मी विमा सल्लागार किंवा म्युच्युअल फंड सल्लागार यांची सेवा घेईन, पण माझी गुंतवणूक क्षमता पाच कोटीहून अधिक असेल तर मी ‘सीएफपी’ला प्राधान्य देईन. म्हणजेच काय तर तुम्हाला आरोग्य तपासणी करायचे असेल तर तुम्ही डॉक्टरकडे जाता, पण तुम्हाला शस्त्रक्रिया करायची असेल तर तुम्ही शल्यविशारदाकडे जाता. ‘सीएफपी’ हा आर्थिक नियोजनातील शल्यविशारद असतो.
भारत वाढीचा दर आठ टक्के राखू शकेल आणि देशांतर्गत बचत ३२ टक्के असेल, अशी अपेक्षा बाळगली तर भविष्यात लोकांचा शेअर बाजारामधील सहभाग अधिक वाढणार आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आर्थिक लक्ष्य व नियोजन असणे आवश्यक ठरणार आहे.
मला आठवते की, माझ्या वडिलांनी त्यांच्या काळात बचतीचा काही भाग मुदत ठेवींमध्ये गुंतवला. ना जोखीम, ना उत्पन्न अशा प्रकारचे हे सर्वसाधारण, पारंपरिक नियोजन होते. पण आज भारत हा युवावर्गाचा देश असल्याने आणि तरुणांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्याने व परिणामांपासून दूर राहण्याची वृत्ती असल्याने त्यांचे पसे अनेक पटींनी वाढवतील, असे बचतीचे पर्याय त्यांना हवे असतात. आर्थिक नियोजनाच्या बाबतीत विश्वासाचे साधन म्हणून ‘सीएफपी’ प्रमाणपत्र प्रस्थापित होण्यासाठी हे चांगले चिन्ह आहे. हा बदल साध्य करण्यासाठी ‘एफपीएसबी इंडिया’ने आपल्या ईपींसोबत अधिक सक्रिय होण्याची गरज आहे.
काही काळापूर्वी ‘एचएनआय’ना आपल्या ‘फायनान्शियल पोर्टफोलिओ’ची निर्मिती करण्यासाठी केवळ ‘सीएफपी’ हवे असल्याने ‘एफपीएसबी’च्या सदस्यांनी अगोदरच नियुक्तीमध्ये ‘सीएफपी’ना प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. ‘सीएफपी’ना असलेले मोल आता वाढले आहे.
सीएफपी म्हणजे काय?
‘फायनान्शियल स्टँडर्ड बोर्ड ऑफ इंडिया’कडून दिले जाणारे ‘सीएफपी’ हे सर्वोच्च प्रमाणपत्र आहे. ‘सर्टफिाइड फायनान्शिअल प्लॅनर सर्टििफकेशन’ हा शिक्षण, परीक्षण, अनुभव व नीतिमूल्ये यांची कठोर प्रमाणके पूर्ण केलेल्या व्यक्तींना देण्यात आलेले उत्कृष्टतेचे बिरुद असते. ही प्रतिष्ठित व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारण्यात आलेली व जागतिक वित्तीय समुदायाने सन्मानित केलेली आर्थिक नियोजनातील पात्रता आहे. ‘सीएफपी’ प्रमाणपत्र जगभरात विश्वास जिंकते व संधी निर्माण करते. हे प्रमाणपत्र जगातील २३ देशांत वैध ठरते.
प्रमाणपत्रासाठी नोंदणी कशी करायची?
व्यावसायिक, पदवीधर व इच्छुकांनी हे प्रमामपत्र नियमित क्लासेस व ‘एफपीएसबी इंडिया’कडे नोंदणीकृत अधिकृत शिक्षण देणाऱ्यांकडून पूर्ण करावे. ऑनलाइन सत्रे व खासगी शिकवण्या यामुळे या शिक्षणाला उत्कृष्टतेचा स्पर्श देणे खूप कठीण होते.
सीएफपी प्रमाणपत्राकडे नेणारा मार्ग :
सीएफपी प्रमाणपत्राकडे नेणारे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे नियमित मार्ग आणि दुसरा म्हणजे आव्हानात्मक मार्ग. तपशील, पात्रतेचे निकष व नोंदणी रक्कम याची माहिती http://www.fpsbindia.org  इथे मिळेल.
मोडय़ुलनुसार तपशील
‘सीएफपी’मध्ये सहा मोडय़ुल आहेत. पहिले मोडय़ुल वेव्हर आहे. उरलेल्या पाच मोडय़ुलसाठी एनएसई अधिकृत परीक्षा केंद्रावर लेखी परीक्षा द्याव्या लागतात. सर्व मोडय़ुल पूर्ण केल्यावर आणि सर्व पात्रता निकष पूर्ण केल्यावर उमेदवारांना ‘सीएफपी’ प्रमाणपत्र मिळते.
दुसऱ्या मोडय़ुलपासून प्रत्येक मोडय़ुल पूर्ण केल्यावर उमेदवारांना एनएसई व एफपीएसबीकडून असोसिएट सर्टिफिकेशन प्लॅनिंग मिळते.
विविध मोडय़ुल्स पुढीलप्रमाणे आहेत :
– वित्तीय नियोजनाची ओळख
– जोखीमीचे विश्लेषण आणि विम्याचे नियोजन
– विमा सल्लागार आणि निवृत्तीनंतरचे नियोजन
– गुंतवणुकीचे नियोजन
– कर नियोजन आणि स्थावर मालमत्तेचे नियोजन
– वित्तीय नियोजन
सध्या आयसीआयसीआय बँक येथे रिलेशनशीप मॅनेजर म्हणून काम करत असलेले प्रणव चंद्रा एमबीए आहेत आणि ते सध्या सीएफपीचा अभ्यासक्रम पूर्ण करीत आहेत. यासंदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, ग्राहकांच्या उद्दिष्टांचे नियोजन करण्यासाठी आणि अधिक समावेशक नियोजन करण्यासाठी ‘सीएफपी’ची मदत होते.
‘मनी कम्पास’ या फायनान्शियल प्लॅिनग फर्मच्या संस्थापक असलेल्या सीएफपीसीएम नीती त्रिवेदी यांनीही यास दुजोरा दिला की, सीएफपी प्रमाणपत्रामुळे आत्मविश्वास वाढतो आणि ग्राहकांसोबत काम करत असताना मोठी मदत होते. त्रिवेदी यांनी उद्योजकतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयसीआयसीआय बँक व इन्फोसिसची नोकरी सोडली.
भारताच्या वाढीच्या वाटचालीचा विचार करता सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी)चा दर आठ टक्क्यांहून अधिक राहील आणि ‘एचएनआय’ची संख्या वार्षकि ५० टक्के वाढण्याची शक्यता आहे. यामुळे अधिकाधिक जणांना ‘सीएफपी’ प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहन मिळत असून ते मिळवणे ही आज एक गरज बनली आहे.