14 October 2019

News Flash

विधी शाखा: ‘स्पेशलायझेशन्स’चे पर्याय

विधी शाखेतील स्पेशलायझेशनचे वेगवेगळे पर्याय बघून या क्षेत्रात किती वेगवेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत, हे लक्षात येते.

| August 10, 2015 01:02 am

विधी शाखेतील स्पेशलायझेशनचे वेगवेगळे पर्याय बघून या क्षेत्रात किती वेगवेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत, हे लक्षात येते. मात्र, स्पेशलायझेशनची निवड करताना स्वत:चा कल समजून घेणे आवश्यक असते. त्यापैकी कोणतीही शाखा निवडल्यानंतर त्या क्षेत्राची संपूर्ण माहिती करून घेणे, आपले ज्ञान अद्ययावत ठेवणे आणि केवळ परीक्षेपुरता अभ्यास मर्यादित न ठेवता विषय मुळापासून समजून घेत अभ्यास करणे असा दृष्टिकोन ठेवणे त्या क्षेत्रात यशस्वी होण्याकरता अत्यावश्यक असते.

स्पेशलायझेशनची क्षेत्रे
सिव्हिल/ क्रिमिनल लॉ, कॉन्स्टिटय़ुशनल लॉ, अॅडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ, ह्य़ुमन राइट्स लॉ, फॅमिली लॉ, टॅक्सेशन लॉ, कॉर्पोरेट लॉ, बिझनेस लॉ, इंटरनॅशनल लॉ, लेबर लॉ, रिअल इस्टेट लॉ, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी/ पेटन्ट लॉ.

पदव्युत्तर पदविका
कायदा विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम एक वर्षांचा असून वेगवेगळ्या संस्था तसेच विद्यापीठांत नियमित पद्धतीने अथवा दूरस्थ शिक्षणपद्धतीद्वारे पदविका अभ्यासक्रम खालील विषयांत करता येतात-
पी. जी. डिप्लोमा इन क्रिमिनल लॉ, पी. जी. डिप्लोमा इन सिक्युरिटीज लॉ, पी. जी. डिप्लोमा इन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी अॅण्ड पेटन्ट लॉ, पी. जी. डिप्लोमा इन सायबर लॉ, पी. जी. डिप्लोमा इन मीडिया लॉ, पी. जी. डिप्लोमा इन ह्य़ुमन राइट्स लॉ, पी. जी. डिप्लोमा इन मेडिको लीगल अॅण्ड एथिक्स, पी. जी. डिप्लोमा इन टॅक्सेस लॉ, पी. जी. डिप्लोमा इन लेबर लॉज अॅण्ड लेबर वेल्फेअर, पी. जी. डिप्लोमा इन एन्व्हायर्न्मेंट लॉ, पी. जी. डिप्लोमा इन चाइल्ड राइट्स लॉ, पी. जी. डिप्लोमा इन डिझास्टर मॅनेजमेन्ट लॉ, पी. जी. डिप्लोमा इन अल्टरनेट डिस्प्युट रीझोल्युशन लॉ, पी. जी. डिप्लोमा इन अॅडमिन लॉ अॅण्ड पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन, पी. जी. डिप्लोमा इन कॉम्पिटिशन पॉलिसी अॅण्ड लॉ, पी. जी. डिप्लोमा इन टुरिझम अॅण्ड एन्व्हायर्न्मेंट लॉ, पी. जी. डिप्लोमा इन बिझनेस लॉ, पी. जी. डिप्लोमा इन न्यूक्लिअर लॉ, पी. जी. डिप्लोमा इन अर्बन एन्व्हायर्न्मेंट मॅनेजमेंट लॉ, मास्टर ऑफ बिझनेस लॉ.

करिअर संधी
कायदा विषयातील पदवीधर आपले करिअर नागरी, गुन्हेगारी, कामगार, कंपनीविषयक कायदे, करविषयक प्रकरणे, आंतरराष्ट्रीय व्यवहार, ग्राहक हक्कसंबंधांविषयीचे कायदे, को-ऑप. सोसायटी, ट्रस्ट कायदे, वन व पर्यावरणविषयक कायदे, कौटुंबिक कायदे, वैद्यक कायदे यांत करू शकतात तसेच खालील क्षेत्रांमध्येही त्यांना वकील अथवा सल्लागार म्हणून काम करता येईल-
भूदल/ नौदल/ हवाई दलात कायदा अधिकारी, पोलीस सेवेत सल्लागार, सरकारी सेवेतील कायदा अधिकारी, स्वयंसेवी संस्थांमध्ये मानवी हक्कांवर काम करणारे अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, पर्यावरणतज्ज्ञ, क्रिमिनोलॉजिस्ट, लेखक, बँकर, पेटन्ट अॅटर्नी, सायबर लॉ, आर्बिटेटर, कायदाविषयक सेवा, सामाजिक कार्यकर्ता, कायदाविषयक वार्ताकन करणारे वार्ताहर, कायदा व्यवस्थापक, अॅडव्होकेट.

मुंबई विद्यापीठाचे कायद्यासंबंधित
पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम
मुंबई विद्यापीठातर्फे तीन नवीन अभ्यासक्रमांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार कोणत्याही विषयात पदवी संपादन केलेल्या विद्यार्थ्यांला पी. जी. डिप्लोमा इन सायबर लॉ अॅण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पी. जी. डिप्लोमा इन अल्टरनेटिव्ह डिस्प्युट रिझॉल्युशन आणि पी. जी. डिप्लोमा इन सिक्युरिटी लॉ हे अभ्यासक्रम ऑगस्ट २०१५ पासून सुरू होणार आहेत. त्याचबरोबर याआधीपासूनच सुरू असलेला पी. जी. डिप्लोमा इन इन्टेलेक्युअल प्रॉपर्टी राइट्स हा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाच्या कायदा विभागातील फोर्ट कॅम्पसमध्ये सुरू आहे.

First Published on August 10, 2015 1:02 am

Web Title: options in specializations
टॅग Human Rights