राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दिल्या जाणाऱ्या भारतरत्न पं. भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विशेष शिष्यवृत्तीसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक युवा उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
शिष्यवृत्तींची संख्या व तपशील : या योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तींची संख्या १२ असून त्यामध्ये शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेणाऱ्या सहा गायकांना आणि शास्त्रीय वादनाचे शिक्षण घेणाऱ्या सहा वादकांना शिष्यवृत्ती दिल्या जातात.
आवश्यक पात्रता: अर्जदार खालीलप्रमाणे पात्रताधारक असायला हवेत-
*     मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी अथवा गुरूंकडून शिक्षण घेतले असल्यास अशा शिक्षणाच्या कालावधीसह गुरूंचे शिफारसपत्र.
*     जे उच्च शिक्षण घ्यायचे आहे, त्यासंबंधीची माहिती, कालावधी व इतर तपशील.
*    कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नाचा तपशील. त्यासंबंधीचे प्रमाणपत्र.
*     आपल्या कलागुणांचा समावेश असणारी सीडी.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना तज्ज्ञ समितीतर्फे निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता व आर्थिक परिस्थितीच्या आधारे त्यांची शिष्यवृत्तीसाठी अंतिम निवड करण्यात येईल.
शिष्यवृत्तीची रक्कम व कालावधी: निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या अभ्यासक्रमाच्या दोन वर्षे कालावधीसाठी दरमहा ५००० रु.ची शिष्यवृत्ती देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशील : योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाची जाहिरात पहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील, कागदपत्र आणि सीडीसह असणारे अर्ज महाराष्ट्र शासन-सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय-विस्तार भवन, पहिला मजला, म. गांधी मार्ग, मुंबई ४०००३२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०१३.
संगीत-वाद्यवादन क्षेत्रात विशेष शिष्यवृत्तीसह पदव्युत्तर अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना लाभदायक    ठरू शकते.

Violation of Right to Information by Regional Psychiatric Hospital in Nagpur
नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयाकडून माहिती अधिकाराचा भंग, सामाजिक कार्यकर्ते म्हणतात…
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
Sudhir Mungantiwar
मंत्री सुधीर मुनगंटीवारांकडे केवळ ९० हजार रुपये रोख, बंगल्याची किंमत ५ कोटी ६० लाख, चारचाकी वाहन नाही…
Complaint to the Election Commission against Mahavitaran under jurisdiction of Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीसांच्या अखत्यारीत येणाऱ्या महावितरणविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार, जाणून घ्या कारण…