नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर, गुरगाव येथे न्यूरोसायन्स विषयातील एमएस्सी व पीएचडी या संशोधनपर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांना २०१८ या सत्रात प्रवेश देण्यासाठी खालीलप्रमाणे प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. एमएस्सी अभ्यासक्रम- अर्जदार जीवशास्त्र विषयातील पदवीधर असावेत. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा व त्यांनी जॉइंट ग्रॅज्युएट एन्ट्रन्स एक्झामिनेशन फॉर बायोलॉजी अ‍ॅण्ड इंटरडिसिप्लिनरी सायन्सेस ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.

विशेष सूचना- निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एमएस्सी अभ्यासक्रमानंतर त्याच विषयात संशोधनपर पीएचडी करण्याची मुभा असेल. संशोधनपर पीएचडी- अर्जदार जीवशास्त्र वा तत्सम विषयातील एमएस्सी असावेत. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा व त्यांनी खालीलपैकी कुठलीही एक प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.

  • जॉइंट ग्रॅज्युएट एन्ट्रन्स एक्झामिनेशन फॉर बायोलॉजी अ‍ॅण्ड इंटरडिसिप्लिनरी लाइफ सायन्सेस.
  • ग्रॅज्युएट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (गेट २०१७ अथवा गेट २०१८)
  • जॉइंट एन्ट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट (जेट २०१८)
  • ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) ही सीएसआयआर, युजीसी, डीबीटी अथवा आयसीएमआर द्वारा घेण्यात आलेली प्रवेश पात्रता परीक्षा.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क-

वरील अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १४ ते २० ऑक्टोबर २०१७ च्या अंकातील नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटरची जाहिरात पाहावी अथवा सेंटरच्या  http://www.nbrc.ac.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख व पत्ता-

संपूर्णपणे भरलेले प्रवेश अर्ज नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर, मनेसर १२२०५१ (जि. गुरगाव) हरियाणा या पत्त्यावर ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.