News Flash

महिलांसाठीचे पदव्युत्तर अभ्यासक्रम

भारतरत्न महर्षी कर्वे यानी १९१६ साली स्थापन केलेल्या एसएनडीटी महिला विद्यापीठास ९७ वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे. महिलांनी शिक्षण घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधावा, याचबरोबर

| August 12, 2013 12:07 pm

भारतरत्न महर्षी कर्वे यानी १९१६ साली स्थापन केलेल्या एसएनडीटी महिला विद्यापीठास ९७ वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे. महिलांनी शिक्षण घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधावा, याचबरोबर आíथक स्वातंत्र्यही भोगावे हा विचार अधोरेखित झाला आहे. या विद्यापीठाचे अनेक अभ्यासक्रम असे आहेत की, महिलांना त्यामुळे आíथक स्वातंत्र्य उपभोगता येते, तरीही त्यासाठी दुसऱ्याची नोकरी करण्याची गरज नसते. अशा काही अभ्यासक्रमांची माहिती आपण करून घेऊ. या सर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्याची अंतिम तारीख १४ ऑगस्ट आहे.
एमएस्सी इन न्यूट्रिशन अ‍ॅण्ड हेल्थ कम्युनिकेशन
(पोषण आणि स्वास्थ्य संप्रेषण )
हा एक नवीन आणि एकमेव असा स्त्रियांसाठी खास तयार केलेला अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमातून संप्रेषण (communication) या मुख्य विषयाचे ज्ञान तर मिळेलच, पण हे संप्रेषण, पोषण आणि स्वास्थ्य या क्षेत्रात माहिती लोकांपर्यंत कशी पोहोचवावी त्यासाठीची प्रसिद्धीपत्रके कशी तयार करावीत, याबद्दलही आहे. दृक् श्राव्य, पत्रके, फ्लायर्स कशी तयार करावीत याबद्दलची कौशल्ये यात विकसित केली जातील.
हा अभ्यासक्रम केल्यानंतर आपण स्वतचा व्यवसाय सुरू करू शकता किंवा या प्रसिद्धीपत्रके घरूनच तयार करून देऊ शकता. आपल्या घरात आपला स्टुडिओ असणे किती सुखाचे. आज प्रसारमाध्यमे इतक्या लोकानुवर्ती आहेत अणि स्वस्त आहेत की त्यासाठी मोठी गुंतवणूक करण्याचीही गरज नाही. अधिक माहितीसाठी http://cmcsndt.wordpress.com/ या वेबसाइटला आजच भेट द्या
एम. ए (एज्युकेशनल टेक्नोलॉजी)
आज शिक्षणक्षेत्र, संगणक, इंटरनेट, सोशल मीडिया अशा विषयांत रस असलेल्या पदवीधर मुलींसाठी यूजीसी मान्यताप्राप्त एम. ए (एज्युकेशनल टेक्नोलॉजी) हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. संगणकाचा शिक्षणात वापर, सोशल मीडियातील प्रयोग, ई-लìनग या विषयांमध्ये अभ्यास व पुढे काम करण्याची इच्छा असल्यास एज्युकेशनल टेक्नोलॉजीमध्ये एम. ए. करणे हा उत्तम पर्याय आहे.
आज अशा अध्यापन- नियोजकांची इंटरनेट इन एजुकेशन, सोशल मीडिया इन, ऑन-लाइन एज्युकेशन या क्षेत्रांमध्ये पारंगत असणाऱ्या इन्स्ट्रक्शनल डिझायनर्स आणि एज्युकेशनल टेक्नॉलॉजिस्टची अनेक संस्थांमध्ये नितांत गरज आहे. ई-लर्निग इंडस्ट्रीज, व्होकेशनल कोर्सेस शिकवणाऱ्या संस्था, ई-कंटेन्ट तयार करण्याचे प्रकल्प हाती घेतलेल्या संस्था इन्स्ट्रक्शनल डिझायनर्सच्या सतत शोधात असतात. त्यांना आता एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाने सुरू केलेला हा अभ्यासक्रम पूर्ण करून एमए केलेल्या विद्याíथनींचा खूपच उपयोग होणार आहे.
या पदवीधर विद्याíथनी आपला स्वतचा व्यवसाय सुरू करू शकतात, तसेच घरून काम करू शकतात. म्हणजेच केवळ भारतातीलच नव्हे, तर इतर देशांतही आपली सेवा देऊ शकतात.
( कोणत्याही शाखेतून ५० टक्के किंवा अधिक गुण मिळवून पदवी घेतलेल्या मुलींना या एम् ए इन एज्युकेशनल टेक्नोलॉजीसाठी प्रवेश घेता येणार आहे. तुम्ही या अभ्यासक्रमाच्या अधिक माहितीसाठी ०२२-२६६०२८३१, ३२५२५५१५ या क्रमांकावर संपर्क साधू शकता, अभ्यासक्रमाचे सविस्तर माहितीपत्रक मिळवू शकता. तुम्ही detsndt.ac.in
  या संकेतस्थळास नक्की भेट द्या.)
मास्टर इन व्हिज्युअल आर्टस्
या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमातून स्त्रिया आपल्या अंगभूत सर्जनशीलतेचा विकास साध्य करू शकतात. व्हिज्युअल आर्ट या क्षेत्रातील क्रिएटिव्ह पेंटिंग, म्युरल आणि पोट्र्रेट (व्यक्तिचित्रण) या तीन विषयात पारंगतता साध्य करता येईल. (भेट द्याhttp://drawingpaintingmumbai.sndt.ac.in/

पदवीनंतर स्वतच्या स्टुडियोत काम करून अनेक सुंदर चित्रांची म्युरलची निर्मिती करता येईल. इतरांनाही कला शिकवता येईल. आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवून लोकांपर्यंत पोहोचता येईल.
वरील सर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी sndt.digitaluniversity.ac या संकेत-स्थळावरून प्रवेशअर्ज ऑनलाइन भरायची सोय उपलब्ध आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 12:07 pm

Web Title: post graduate courses for womens
Next Stories
1 किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना
2 स्टाफ सिलेक्शनची लिपिक भरती
3 ‘अर्थ’पूर्ण करिअर
Just Now!
X