समृद्धी हा विश्वाचा नैसर्गिक नियम आहे. या नियमाचा पुरावा निर्णायक असतो. आपल्याला तो प्रत्येक व्यक्तीत आढळून येतो. निसर्ग सगळीकडे मुक्त हस्ते देणारा आणि समृद्धीने अमर्याद आहे. त्याने निर्माण केलेल्या कोणत्याही गोष्टीत काटकसर आढळून येत नाही. सर्वत्र विपुलतेचा, सढळतेचा प्रत्यय येतो. शिवाय र्निमिती आणि पुनर्निमिती प्रचंड आणि अखंडपणे सुरू असलेली प्रक्रिया हेच सुचवते की, निसर्गाने मानवासाठी किती उदार मनाने आवश्यक गोष्टींचा पुरवठा केला आहे. ही विपुलता प्रत्येकासाठी आहे, हे स्पष्टच आहे; तरीही या समृद्धीत ेसहभागी होण्यात माणसे अपयशी ठरतात, हेही तितकेच स्पष्ट आहे. सर्व वस्तूंच्या सर्वव्यापी स्वरूपाची जाणीव त्यांना झालेली नाही.
सर्व प्रकारच्या संपत्तीचा उगम शक्तीतून होतो. अधिकार किंवा शक्ती प्राप्त झाल्यावरच आपल्या मालमत्तेला महत्त्व येते. त्याचा शक्तीवर परिणाम झाल्यावरच घटना या महत्त्वाच्या ठरतात. थोडक्यात, सर्व गोष्टी शक्तीच्या विशिष्ट स्वरूपाचे आणि श्रेणींचे प्रतिनिधित्व करतात.
विद्युतप्रवाहावर द्रव्यांमधील रासायनिक आकर्षणावर आणि गुरूत्वाकर्षणावर परिणाम करणाऱ्या कार्यकारणभावामुळे प्राप्त झालेले ज्ञान मानवाला आपल्या योजना आखण्याचे आणि त्या योजना निर्भयपणे कार्यान्वित करण्याचे धाडस प्राप्त करून देते. या नियमांना नैसर्गिक नियम म्हणतात, कारण हे नियम भौतिक जगावर अधिसत्ता गाजवतात. परंतु, सामथ्र्य हे फक्त भौतिक शक्तीपुरते मर्यादित नसते, तर त्याव्यतिरिक्त मानसिक, नैतिक तसेच आध्यात्मिक सामथ्र्यही असते.
यशस्वितेचे नियम (द मास्टर की सिस्टीम), चार्ल्स एफ. हॅनेल, अनुवाद – डॉ. शकुंतला कोलारकर, साकेत प्रकाशन, पृष्ठे २८०, मूल्य २४५ रु.