महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व, मुख्य परीक्षा व मुलाखतीसह संपूर्ण मार्गदर्शन प्रदीप देवरेलिखित ‘राज्यसेवा परीक्षा प्लॅनर’ या पुस्तकात देण्यात आले आहे. या पुस्तकातील स्वतंत्र प्रकरणांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग, राज्य सेवा परीक्षांचा बदललेला आराखडा, पूर्वपरीक्षा विभाग : पूर्वपरीक्षेत यशस्वी होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स, सामान्य अध्ययन (पेपर – १), सामान्य अध्ययन (पेपर – २), निगेटिव्ह मार्किंगचे तंत्र व वेळेचे नियोजन, मुख्य परीक्षा विभाग : नव्या अभ्यासक्रमाला सामोरे जाण्यासंदर्भात टिप्स, राज्य सेवा मुख्य परीक्षा : मराठी, इंग्रजी, सामान्य अध्ययन पेपर – १, इतिहास, भूगोल, कृषी, सामान्य अध्ययन पेपर – २, सामान्य अध्ययन पेपर – ३, सामान्य अध्ययन पेपर – ४ या विषयांची तयारी कशी करता येईल, याचे सविस्तर मार्गदर्शन दिले आहे. तसेच निगेटिव्ह मार्किंग आणि वेळेचे नियोजन तसेच राज्यसेवा परीक्षा : मुलाखत तंत्राची माहितीही दिली आहे. या पुस्तकात प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम, अद्ययावत घडामोडी, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, गुणांकन, नवीन परीक्षा पद्धती, अभ्यासाची रणनीती आणि पेपर सोडविण्याचे तंत्र इत्यादी माहिती सविस्तरपणे देण्यात आली आहे.
राज्य सेवा परीक्षा प्लॅनर (पूर्व, मुख्य परीक्षा व मुलाखतींसह संपूर्ण परामर्श) – प्रदीप देवरे, अथर्व पब्लिकेशन्स, मूल्य – २५० रु.