रोहिणी शहा

प्राथमिक, माध्यमिक स्तरावर विज्ञान शिकताना असो की करिअर घडवताना गुण मिळवण्याची तयारी, विज्ञान हा असा विषय आहे ज्यामध्ये ‘विश्लेषण’ करण्याला पर्याय नाही. स्पर्धा परीक्षेसाठी केल्या जाणाऱ्या अभ्यासात ‘काय’ आधी ‘कसा’  हे ठरविणे महत्त्वाचे असते. अभ्यास कसा करायचा हे विश्लेषणाशिवाय ठरत नाही. अभ्यासक्रमात सामान्य विज्ञान इतकाच उल्लेख आहे. तयारी करताना मात्र पारंपरिक विज्ञानातील जीव-भौतिक-रसायनशास्त्रापैकी कोणत्या घटकावर किती आणि कसे प्रश्न विचारले जातात हे प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातूनच स्पष्ट होते. अशा विश्लेषणाशिवाय अभ्यासाची दिशा स्पष्ट होत नाही.

विज्ञान या विषयाचे स्वरूपच असे आहे, की त्यातील प्रत्येक गोष्टीमागे एक तर्क असतो, कारणमीमांसा असते. ती समजण्यासाठी विश्लेषण करावे लागते. त्यातून दोन गोष्टींमधील संबंध समजले की ते लक्षातही व्यवस्थित राहतात. हेच प्रश्नांच्या व अभ्यासक्रमाच्या विश्लेषणासही लागू होते. त्यातून कोणत्या घटकावर किती भर द्यायचा, कोणत्या घटकाच्या कोणत्या मुद्दय़ांना महत्त्व द्यायचे किंवा नाही द्यायचे हे लक्षात येते. राज्यसेवा पूर्वपरीक्षेमधील मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि त्या अनुषंगाने तयारी करताना विचारात घ्यायचे मुद्दे याबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

मागील पाच वर्षांमध्ये या घटकावर विचारण्यात आलेल्या मुद्देनिहाय प्रश्नसंख्या पुढील कोष्टकामध्ये देण्यात आली आहे.

या प्रश्नांतील योग्य उत्तराचा पर्याय ठळक करण्यात आलेल आहे.

प्रश्न. इलेक्ट्रॉनिक दळणवळण पद्धतीमध्ये (डिजिटल) अंकात्मक संदेश ..

अ. सलग संदेश संच पुरवीत नाहीत.

ब. स्वतंत्र (विलग) पायऱ्यांमध्ये सादर केले जातात.

क  बायनरी (द्विमान) संख्यापद्धतीचा उपयोग करतात.

ड. दशमान आणि द्विमान (बायनरी) या दोन्ही संख्यापद्धतींचा उपयोग करतात.

पर्यायी उत्तरे

) फक्त अ आणि ब  ) फक्त ब आणि क ) अ, ब आणि क  ) वरील सर्व.

प्रश्न. लांबीचे नवीन एकक असे निवडले की, ज्यानुसार निर्वात पोकळीत प्रकाशाची गती एक एकक येते. जर सूर्यप्रकाश, सूर्यापासूनचे पृथ्वीचे अंतर ८ मिनिटे २० सेकंदांत कापत असेल तर, लांबीच्या नव्या एककात सूर्य व पृथ्वी यांच्यामधील अंतर किती?

१) ८२० एकक   २) ५०० एकक ३) १५०० एकक    ४) २४६० एकक

प्रश्न. खालीलपैकी कोणती संप्रेरके पिटुटरी ग्रंथीची आहेत?

अ)  टी. एस. एच.      ब)  एस.टी.एच

क) एच सी. जी. ड)  ए. डी. एच

पर्यायी उत्तरे

) अ आणि ब ) ब आणि क  ) अ, ब आणि ड ) अ, ब आणि क

प्रश्न. कोणत्या वनस्पतीमध्ये एच. एस. के अथवा उ4 या प्रकारचे प्रकाश संश्लेषण होते?

१) ऊस २) भुईमूग  ३) सूर्यफूल  ४) बटाटा

प्रश्न. व्हिटामिन बी १२ चे खालीलपैकी स्रोत कोणते आहेत?

१) मांस, मासे, यकृत, व लहान आतडय़ामधील जिवाणू

२) मशरूम, धान्य व काजू

३) भाकरी, भात, ब्रोकोली व सोयाबीन

४) वरीलपैकी सर्व

प्रश्न. खालीलपैकी कोणत्या थिअरीज किंवा सिद्धांत जीवन उत्क्रांतीशी संबंधित आहेत?

अ. नैसर्गिक निवडीचा सिद्धांत

ब. उत्परिवर्तन उत्क्रांतीचा सिद्धांत

क. वारसा वर्ग गुणधर्म सिद्धांत

ड. वियोग सिद्धांत

पर्यायी उत्तरे

१) अ, ब आणि ड २) अ, ब आणि क ३) अ, क आणि ड ४) वरील सर्व

प्रश्न. खाली दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

अ. HF आणि H2O ही ध्रुवीय संयुगे आहेत.

ब. CH4 आणि CO2 ही ध्रुवीय संयुगे नाहीत.

क. CO2  आणि SO2  ही ध्रुवीय संयुगे नाहीत.

पर्यायी उत्तरे

१) अ आणि ब २) ब आणि क  ३) अ आणि क  ४) अ, ब आणि क

प्रश्न. ज्या सामूल्य (pH) ला प्रथिन कलिलांवर असलेला भार विरुद्ध होतो, त्याला —- असे म्हणतात.

१) गोठण बिंदू  २) उर्णन बिंदू ३) उदासीन सामू (pH) बिंदू ४) समविद्युत बिंदू

वरील विश्लेषणाच्या आधारे पुढील मुद्दे लक्षात येतात.

* दरवर्षी वनस्पती व प्राणिशास्त्र आणि आरोग्य व पोषण हे जीवशास्त्राचे घटक मिळून किमान ८ प्रश्न विचारलेले दिसतात. तुलनेने रसायनशास्त्र व भौतिकशास्त्राचे कमी म्हणजे ४ ते ६ प्रश्न विचारलेले आहेत.

* घटकाची प्रश्नसंख्या २० वर स्थिर असली तरी उपघटकांची प्रश्न संख्या निश्चित नाही. तरी वनस्पती व प्राणिशास्त्र, आरोग्य व पोषण हे सर्वाधिक महत्त्वाचे घटक आहेत हे लक्षात ठेवायला हवे.

* सन २०१९ वगळता बहुविधानी प्रश्नांचे प्रमाण कमी आहे. बहुविधानी प्रश्नांचे पर्यायही फार कसोटी लागतील असे नाहीत. सर्वसाधारण तयारी असली तरी हे प्रश्न सोडविता येतील अशा काठीण्य पातळीचे आहेत.

* सरळसोट, एका शब्दा / संकल्पनेचे पर्याय असलेले प्रश्न मात्र तुलनेने जास्त कठीण आहेत. मुद्दय़ाची नेमकी माहिती असणे अशा प्रश्नांसाठी आवश्यक आहे.

* सन २०१९ वगळता भौतिकशास्त्रामध्ये दरवर्षी गणिते / समीकरणे विचारलेली आहेत. तर रसायनशास्त्रातील अभिक्रिया विचारण्याचे प्रमाण नगण्य आहे.

* प्रश्नांचे मराठी भाषांतर वाचण्यापेक्षा इंग्रजी प्रश्न वाचल्यास लवकर समजतो. काही ठिकाणी प्रश्नांचे मराठी भाषांतर चुकीचे झालेले दिसते. त्यामुळे विज्ञानाचा अभ्यास व प्रश्नपत्रिका सोडविताना इंग्रजीला पर्याय नाही हे गृहीत धरायला हवे. या घटकाची तयारी कशी करावी हे पुढील लेखांमध्ये पाहू.