नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना आणखीन एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे. यावेळी भारतीय सैन्याच्या (Indian Army Recruitment) ASC सेंटरमध्ये १० वी उत्तीर्ण उमेदवारांच्या तब्बल ४०० जागांसाठी मोठी पदभरती सुरू करण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान कोण कोणत्या पदांसाठी भरती सुरू केली आहे. तसेच या पद भरतीकरिता उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे? जाणून घेऊयात.

‘या’ रिक्त पदांसाठी भरती

सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (Civilian Motor Driver)

सफाई कर्मचारी (Cleaner)

कुक (Cook)

सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर (Civilian Catering Instructor)

कामगार (Labor)

सफाईवाला (MTS)

या पदांसाठी ही भरती असणार आहे. यावेळी इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. तसेच joinindianarmy.nic.in या लिंकद्वारे तुम्ही अर्ज भरू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ सप्टेंबर २०२१ असणार आहे.

शैक्षणिक पात्रता

भारतीय सैन्यामध्ये सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (Civilian Motor Driver)या पदाकरिता उमेदवार १०वी उत्तीर्ण आणि सर्व प्रकारच्या वाहनांचे लायसन्स असणे आवश्यक आहे.

भारतीय सैन्यामध्ये सफाईकर्मी (Cleaner) या पदासाठी उमेदवार १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

भारतीय सैन्याच्या ASC सेंटरमध्ये कुक (Cook) या पदाकरिता उमेदवार १०वी उत्तीर्ण आणि उमेदवाराला भारतीय खाद्यपदार्थ बनवता येणं आवश्यक असून एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर (Civilian Catering Instructor) करिता उमेदवार हा १०वी उत्तीर्ण असून कॅटरिंगमध्ये डिप्लोमा केलेले असावे.

कामगार (Labor) या पदाकरिता उमेदवार १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

सफाईकर्मी (MTS) या पदाकरिता उमेदवारांना देखील १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी या पत्त्यांवर अर्ज पाठवावा

उमेदवारांनी त्यांचा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने पीठासीन अधिकारी, सिव्हिलियन डायरेक्ट रिक्रूटमेंट बोर्ड, CHQ, ASC सेंटर (दक्षिण)-2 ATC, Agram Post, Bangalore-07 या पत्त्यांवर पाठवू शकतात.