१६६० साली इंग्लंडमध्ये रॉयल सोसायटीची स्थापना झाली. रॉयल सोसायटीच्या स्थापनेमागे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स, ख्रिस्तोफर लेन आणि रॉबर्ट बॉइल यांचा महत्त्वाचा वाटा होता. रॉयल सोसायटीचा फेलो म्हणून निवडून येणं हा वैज्ञानिक जगतात मोठा सन्मान समजला जातो. रॉयल सोसायटीच्या ऑफिसमध्ये एक जाडजूड वही आहे. ज्या शास्त्रज्ञांना फेलोशिप मिळाली आहे, त्या सगळ्या शास्त्रज्ञांच्या स्वाक्षऱ्या या वहीत आहेत. उदाहरणार्थ, या वहीच्या नवव्या पानावर न्यूटनची स्वाक्षरी पाहायला मिळते. अनेक उदयोन्मुख शास्त्रज्ञांना या वहीमध्ये आपलीही स्वाक्षरी असावी, असं वाटतं.
रॉयल सोसायटीच्या संस्थापक सदस्यांमध्ये रॉबर्ट हूक या शास्त्रज्ञाचंही नाव होतं. त्या काळी रॉयल सोसायटीला आलेलं एखाद्या ‘क्लब’चं स्वरूप बदलून शास्त्रीय विषयांवर विद्वत्तापूर्ण चर्चा करणाऱ्या गटाचं स्वरूप देण्यात रॉबर्ट हूक यांचा महत्त्वाचा वाटा होता.
हूक यांच्या पूर्वायुष्याची माहिती त्यांनी १६९६ साली लिहायला घेतलेल्या आत्मचरित्रात सापडते. पण हे आत्मचरित्र अपूर्णच राहिलं. या अपुऱ्या राहिलेल्या आत्मचरित्राचा उल्लेख रिचर्ड वॉलरने त्याच्या १७०५ सालच्या ‘पॉस्थ्यूमस वर्क्स ऑफ रॉबर्ट हूक’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत केला आहे. जॉन वॉर्डच्या ‘लाइव्ह्ज ऑफ ग्रीशम प्रोफेसर्स’ तसंच जॉन ऑब्रेच्या ‘ब्रीफ लाइव्ह्ज’मध्येसुद्धा हूक यांच्या आयुष्याचा लेखाजोगा सापडतो.
रॉबर्ट हूक हा जॉन आणि मिरेना या दाम्पत्याच्या पाच अपत्यांपकी चौथा. पाचवं भावंड त्याच्यापेक्षा सात वर्षांनी लहान. त्याचे दोन भाऊ पुढे मंत्री झाले. रॉबर्टचे वडील जॉन हूक हे ‘चर्च ऑफ इंग्लंड’चे पारंपरिक धर्मगुरू आणि स्थानिक शाळेचे प्रमुख होते. शिक्षण पूर्ण करून रॉबर्टने चर्चचं काम करावं, अशी त्यांची रॉबर्टकडून अपेक्षा होती. पण बालपणी रॉबर्ट सारखा आजारी पडायचा. या आजारपणामुळे त्याने चर्चमध्ये धर्मगुरू होण्याचा विचार सोडून दिला.
तरुणपणीं रॉबर्टला यांत्रिक कामांचे निरीक्षण करणे आणि आरेखन करणे (डिझाइिनग आणि ड्रािफ्टग) यांत रस होता. एकदा त्याने एक पितळी घडय़ाळ उघडून त्यातले भाग सुटे केले आणि त्या भागांसारखेच लाकडी भाग तयार करून घडय़ाळ बनवलं. रॉबर्टने केलेलं हे लाकडी घडय़ाळ बऱ्यापकी चाललं. या सगळ्या प्रक्रियेतून तो आरेखन शिकला. कोळसा किंवा खडूने लोखंडावर खुणा करून विविध यंत्रांचे नवीन भाग रॉबर्ट तयार करायचा. घडय़ाळातली चक्रं नियंत्रित करण्यासाठी िस्प्रग वापरता येऊ शकते, हे पुढे रॉबर्ट हूक यांनीच सर्वप्रथम दाखवून दिलं. पण तशा प्रकारची िस्प्रग मात्र त्यानंतर तब्बल १४ वर्षांनी ह्य़ुजेन नावाच्या शास्त्रज्ञाने तयार केली.
तब्येतीच्या कारणास्तव धर्मगुरू होण्याचा विचार सोडून देऊन हूक डॉ. थॉमस विलीस यांचा रसायनशास्त्रीय साहाय्यक म्हणून कामाला लागला. विलीससाहेब रॉबर्टची भरपूर प्रशंसा करत. त्यांच्याकडे असताना हूकची रॉबर्ट बॉइलशी भेट झाली. मग १६५५ ते १६६२ या काळात त्याने बॉइलचा साहाय्यक म्हणून काम केलं.
बॉइलला त्याचे वायूविषयक प्रयोग करण्यासाठी लागणारा पंप हूकने तयार करून दिला. ग्रेगरियन दूरदर्शक सर्वप्रथम बनवण्याचे श्रेय हूककडे जातं. त्याने दुर्बणिीतून मंगळ आणि गुरूची परिवलनं पाहिली होती. माध्यमाची घनता बदलल्यामुळे होणारं प्रकाशाचं वक्रीभवनही हूक यांनी शोधून काढलं होतं. उष्णतेमुळे पदार्थ प्रसरण पावतात, तसेच ‘वायू म्हणजे वस्तुकण एकमेकांपासून दूरदूर जाऊन पदार्थ अतिविरळ झाल्यामुळे मिळणारं वस्तुरूप आहे’ ही संकल्पना हूक यांनीच प्रथम मांडली.
रॉयल सोसायटीत क्युरेटर पदावर असताना हूक यांचं काम होतं, विशिष्ट पद्धतीने वेगवेगळे वैज्ञानिक प्रयोग करून दाखवणं. हे प्रयोग दाखवत असताना हळूहळू हूक यांच्यातला शास्त्रज्ञ घडत गेला. हूक यांचे बहुतेक प्रयोग हे एकतर ते रॉबर्ट बॉइल यांचा साहाय्यक असताना केलेले होते किंवा १६६२ पासून रॉयल सोसायटीच्या ‘क्युरेटर’ या पदावर असतांना केलेले होते. त्यामुळे या प्रयोगांचं स्वामित्व त्याला दिलं गेलं नसावं, असं अनेकांचं मत होतं.
हूक यांनी अनेक उपकरणं आणि त्यांच्यामागची तत्त्वं शोधली. पण त्यानंतर अनेक संशोधकांनी ही उपकरणं इतकी विकसित केली की, त्यावरचा हूक यांचा मूळ शिक्काच पुसला गेला.
न्यूटनचे समकालीन असल्यामुळे अनेक गोष्टींत हूक यांनी न्यूटनच्या बरोबरीने पण स्वतंत्रपणे संशोधन केलं. पण न्यूटनच्या प्रभावामुळे हूक यांचं संशोधन काहीसं मागं पडलं. ‘आधी शोध कुणी लावला’ या मुद्दय़ावरून हूक आणि न्यूटन यांचे कडाक्याचे वादही झाले. या सगळ्या परिस्थितीमुळे की काय, हूक यांचा स्वभाव काहीसा एककल्ली आणि तुसडा बनला.
१९६० साली त्यांनी स्थितिस्थापकत्व गुणधर्म दाखवणाऱ्या रबर, िस्प्रग यांसारख्या वस्तूंचं बळ लावल्यामुळे घडून येणारं वर्तन स्पष्ट करणारा नियम मांडला. हा नियम ‘हूकचा नियम’ म्हणून प्रसिद्ध झाला.
हूक यांना सूक्ष्मदर्शक यंत्राचंही वेड होतं. त्यांनी स्वत: संयुक्त सूक्ष्मदर्शक सर्वप्रथम तयार केला. या सूक्ष्मदर्शकातून त्यांनी जुन्या काळी औषधाच्या बाटल्या बंद करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडी बुचाच्या पातळ कापाचं निरीक्षण केलं. सूक्ष्मदर्शकाखाली त्यांना ही रचना मधमाश्यांच्या पोळ्याच्या लहान-लहान कप्प्यांसारखी आढळली. या प्रत्येक कप्प्याला त्यांनी ‘सेल’ असं संबोधलं. सजीवांच्या शरीरात असलेल्या पेशींना इंग्रजीतून ‘सेल’ म्हटलं जातं, तो शब्द अशा तऱ्हेने हूक यांनीच पहिल्यांदा वापरात आणला. १६६५ साली त्यांनी सूक्ष्मदर्शकाची माहिती आणि उपयुक्तता वर्णन करणारं ‘मायक्रोग्राफिया’ नावाचं पुस्तक लिहिलं.
इतर संशोधकांप्रमाणे हूकसुद्धा गुरुत्वाकर्षण बलावर संशोधन करत होते. गुरुत्वाकर्षण बल व्यस्त वर्ग नियमाचे पालन करते, ही संकल्पना सर्वप्रथम हूक यांनीच मांडली. पण पुढे न्यूटनने याच संकल्पनेवर अधिक संशोधन केलं आणि गुरुत्वाकर्षणाचा नियम मांडला.
सूक्ष्मदर्शक यंत्र, हवेचा दाब आणि तापमान मोजणारं यंत्र, दुर्बीण अशी वेगवेगळी यंत्रं तयार करणारा आणि या यंत्रांमागचे मूलभूत नियम मांडणारा, विज्ञानात मोठं योगदान देणारा हा शास्त्रज्ञ एका अर्थी कमनशिबी म्हणायला हवा.. वैज्ञानिक क्षेत्रातला जणू शापित यक्षच!
ल्ल
ँीेंल्ल३’ंॠ५ंल्ल‘ं१@ॠें्र’.ूे
० रॉयल सोसायटीविषयी अधिक माहिती मिळवा. ज्या भारतीयांना रॉयल सोसायटीची फेलोशिप मिळाली आहे, त्यामध्ये थोर गणिती रामानुजन यांचा समावेश आहे. ज्या इतर भारतीय शास्त्रज्ञांना रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून गौरवण्यात आले आहे त्या भारतीय शास्त्रज्ञांची माहिती संकलित करा.
० सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोध लागल्यापासून या यंत्रामध्ये कशी प्रगती झाली याचे वर्णन करणारा प्रकल्प तयार करा. वेगवेगळ्या प्रकारच्या सूक्ष्मदर्शक यंत्रांची छायाचित्रं जमवा.
० लाकडी बुचाचा तुकडा मिळवून त्याच्या कापाचे सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करा. त्याचप्रमाणे कांद्याच्या सालीवर असणाऱ्या पातळ पापुद्रय़ाचंही निरीक्षण सूक्ष्मदर्शकाखाली करा. तुम्हाला आढळलेल्या साम्य आणि भेदांची नोंद करा.
० रॉबर्ट हूक यांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या यंत्रांची रचना आणि कार्य जाणून घ्या.
० हूक आणि न्यूटन हे दोन दिग्गज शास्त्रज्ञ समकालीन. त्यामुळे अनेक विषयांवर या दोघांनीही एकाच वेळी पण स्वतंत्रपणे संशोधन केल्याचं लक्षात येतं. अशाच प्रकारे आणखी कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी एकाच वेळी पण स्वतंत्रपणे लक्षणीय संशोधन केलं आहे, याची माहिती मिळवा.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 8, 2013 8:00 am