हैदराबाद येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट अँड पंचायती राज येथील ग्रामीण विकास व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.
अभ्यासक्रमाचे स्वरूप
हा अभ्यासक्रम हा पूर्णत: निवासी स्वरूपाचा असून त्याचा कालावधी एक वर्षांचा आहे. अभ्यासक्रम ऑगस्ट २०१५ मध्ये सुरू होऊन जुलै २०१५ मध्ये संपेल.
अर्हता
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व त्यांना ग्रामीण विकासविषयक कामात प्रत्यक्ष काम करण्याची रुची असायला हवी.
निवड पद्धती
अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर २४ मे २०१५ रोजी घेण्यात येईल.
अर्जदारांनी पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांना अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येईल. अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रम कालावधीसाठी इन्स्टिटय़ूटतर्फे निवास व भोजन व्यवस्था पुरविली जाईल.
अर्जासह पाठवायचे शुल्क
अभ्यासक्रमासाठी पाठवायचे शुल्क म्हणून सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांनी २०० रु.चा (राखीव गटातील उमेदवारांनी १०० रु.चा) एनआयआरडी-पीजीडीआरएम यांच्या नावे असणारा व हैद्राबाद येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट पाठविणे आवश्यक आहे.
अधिक माहिती
अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक तपशिलासाठी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट अँड पंचायती राज, हैद्राबादच्या http://www.nird.org.in/pgdrdm  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
करिअर संधी
ग्रामीण व्यवस्थापन क्षेत्र हे प्राधान्य तत्त्वावर विकसित होणारे क्षेत्र असल्याने या विषयातील औपचारिक पात्रताधारकांना ग्रामीण विकास व्यवस्थापनविषयक कामासाठी सरकारी, सहकारी, विविध विकासविषयक प्रकल्प आणि संस्था, अशासकीय व स्वयंसेवी संस्था इ.मध्ये विशेष कामगिरी करण्यासाठी व्यापक संधी उपलब्ध होत असतात.
अर्ज पाठविण्याची मुदत
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील, कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे प्रवेश अर्ज को-ऑर्डिनेटर (अ‍ॅडमिशन्स), सेंटर फॉर पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीज (सीपीजीएस), नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड पंचायती राज, राजेंद्रनगर, हैद्राबाद ५०००३० या पत्त्यावर ९ ते २०१५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.