मलेशियामधील युनिव्हर्सटिी ऑफ नॉटिंगहॅम, मलेशिया कॅम्पस  (UNMC) मार्फत देण्यात येणाऱ्या ‘डेव्हलिपग सोल्युशन्स स्कॉलरशिप’विषयी..
मलेशियामधील युनिव्हर्सटिी ऑफ नॉटिंगहॅम मलेशिया कॅम्पस  (UNMC) कडून  ‘डेव्हलिपग सोल्युशन्स स्कॉलरशिप’ नावाने विज्ञान, तंत्रज्ञान व शिक्षण या विद्याशाखांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी विकसनशील देशांमधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते.  यू.एन.एम.सी.कडून देण्यात येणाऱ्या या वर्षीच्या या शिष्यवृत्तीसाठी पात्र अर्जदारांकडून ८ नोव्हेंबर २०१३ पूर्वी अर्ज मागवले आहेत.
 शिष्यवृत्तीबद्दल-
‘डेव्हलिपग सोल्युशन्स स्कॉलरशिप’ ही शिष्यवृत्ती फक्त विकसनशील देशांतील व तिसऱ्या जगातील राष्ट्रे (third world countries) यांमधील विद्यार्थी अर्जदारांसाठी उपलब्ध आहे. विकसनशील देशांमध्ये अजूनही अस्तित्वात असलेल्या बऱ्याचशा समस्यांबाबत या विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करून त्यांच्यामध्ये त्या समस्यांवर मात करण्यासाठी आवश्यक असलेली क्षमता निर्माण करणे आणि या माध्यमातून त्या देशाला समृद्ध करण्यात थोडातरी हातभार लावणे असा उदात्त हेतू या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून यू.एन.एम.सी.ने ठेवलेला आहे. विज्ञान, तंत्रज्ञान व शिक्षण या विद्याशाखांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी आणि शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला शिष्यवृत्तीअंतर्गत मलेशियामधील ‘युनिव्हर्सटिी ऑफ नॉटिंगहॅम मलेशिया कॅम्पस’मध्ये शिष्यवृत्तीच्या स्वरूपात टय़ुशन फीची संपूर्ण रक्कम व निवासासहित इतर खर्चासाठी अपेक्षित भत्ता मिळणार आहे. विद्यापीठाकडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्त्यांची एकूण संख्या १५ आहे.
विद्यापीठाकडून नॉटिंगहॅम मलेशिया कॅम्पसमध्ये दोनदा प्रवेश दिला जातो- सप्टेंबरमध्ये एकदा व डिसेंबर महिन्यात दुसऱ्यांदा. सध्या सप्टेंबरमधील प्रवेशासाठी अंतिम मुदत जरी संपली असली तरी अजून डिसेंबरमध्ये सुरू होणाऱ्या ‘डिसेंबर २०१३-२०१४’ या शैक्षणिक वर्षांसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी दिल्या जाणाऱ्या प्रवेश व शिष्यवृत्तीची मुदत अद्याप बाकी आहे. डिसेंबरमधील शिष्यवृत्तीसाठी विद्यापीठाला ऑनलाइन अर्ज पाठवायची अंतिम मुदत ८ नोव्हेंबर २०१३ आहे. यू.एन.एम.सी.चे विद्यार्थी किंवा सध्याचे पदव्युत्तर पदवीधर मात्र या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकत नाहीत.
आवश्यक अर्हता-
ही शिष्यवृत्ती फक्त विकसनशील देशांमधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. संबंधित शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराला यू.एन.एम.सी.मध्ये २०१३-१४ या शैक्षणिक वर्षांसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेला असावा. अर्जदार हा परदेशी म्हणजेच ‘ओव्हरसीज’ या प्रवर्गात मोडणारा असावा. त्याची शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी आणि इंग्रजीवर त्याचे प्रभुत्व असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर निवडप्रक्रियेसाठी शैक्षणिक पाश्र्वभूमीबरोबरच शिक्षणेतर गुणवत्तेलादेखील extra curricular achievements) प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे अर्जदाराला त्याच्या सी.व्ही.मध्ये त्याचे शिक्षणेतर उपक्रम, नेतृत्वगुण, त्याचा पूर्वीच्या कामाचा अनुभव इत्यादी बाबींचा उल्लेख करावा लागेल.
अर्ज प्रक्रिया :
अर्जदाराने यू.एन.एम.सी.च्या वेबसाइटवरून पी.डी.एफ. स्वरूपात दिलेला अर्ज डाऊनलोड करून घ्यावा. अर्ज नीट भरून झाल्यावर तो ई-मेल अटॅचमेंटद्वारे DevelopingSolutionMalaysia @nottingham.edu.my या ई-मेलवर पाठवावा. अर्जाच्या पडताळणीनंतर शिष्यवृत्तीसाठी गुणवत्तेच्या निकषांवर विद्यापीठाच्या पॅनेलकडून अर्जदाराची निवड केली जाईल. शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून वैयक्तिक संपर्क करून निवडीबद्दल कळवले जाईल.  
अंतिम मुदत-
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ८ नोव्हेंबर २०१३ आहे.   
महत्त्वाचे दुवे-
http://www.nottingham.edu.my/
index.aspx