नवी दिल्लीच्या स्कूल ऑफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर येथे उपलब्ध असणाऱ्या विविध विषयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
अभ्यासक्रमाचा कालावधी
या अभ्यासक्रमांचा कालावधी दोन वर्षांचा असून त्यामध्ये प्रामुख्याने आर्किटेक्चर कन्झर्वेशन, अर्बन डिझाइन, इंडस्ट्रियल डिझाइन, एन्व्हायरॉन्मेंटल प्लॅनिंग, हाऊसिंग, रिजनल प्लॅनिंग, ट्रान्सपोर्ट प्लॅनिंग, अर्बन प्लॅनिंग यांसारख्या विषयांचा समावेश आहे.
शैक्षणिक अर्हता
अर्जदारांनी प्लॅनिंग, आर्किटेक्चर, सिव्हिल इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर इंजिनीअरिंग, एन्व्हायरॉन्मेंटल इंजिनीअरिंग, लॅण्डस्केप आर्किटेक्चर यांसारख्या विषयातील पदवी परीक्षा किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. गुणांच्या टक्केवारीची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी ५० टक्क्य़ांपर्यंत शिथिलक्षम आहे.
शैक्षणिक शिष्यवृत्ती
निवड झालेल्या उमेदवारांपैकी हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणक्रमाच्या कालावधीत दरमहा १२,४०० रुपयांची शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येईल.
अर्जासह पाठवायचे शुल्क
अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून ११०० रुपयांचा ‘स्कूल ऑफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर’च्या नावे असणारा व नवी दिल्ली येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट पाठवणे आवश्यक आहे.
अधिक माहिती
अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहितीसाठी संस्थेच्या  http://www.spa.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याची मुदत
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ती कागदपत्रे आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे प्रवेश अर्ज असिस्टंट रजिस्ट्रार
(ए अ‍ॅण्ड ई), स्कूल ऑफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर, ४, ब्लॉक- बी, इंद्रप्रस्थ इस्टेट, नवी दिल्ली- ११०००२ या पत्त्यावर २९ मे २०१५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.      
निवड पद्धती
अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा २३ ते
२७ जून २०१५ रोजी घेण्यात येणार आहे. उमेदवारांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व प्रवेश पात्रता
परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्यानुसार त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.