अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पदवी प्रवेशाचे पडघम वाजू लागले आहेत.
या प्रवेश प्रक्रियेतील टप्पे, फेऱ्या आणि जागांचे वाटप यासंबंधीची उपयुक्त माहिती

अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील प्रवेश घेण्याची प्रक्रिया ही वरकरणी सरळ आणि सहज वाटत असली तरी ही प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. कारण यात विविध मुद्दय़ांचा समावेश असतो. यातील प्रत्येक टप्पा विस्ताराने समजून घेणे आवश्यक ठरते. त्याविषयी-
सीईटीद्वारे १०० टक्के प्रवेश :
० शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये-
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती, इत्यादी.
० शासन अनुदानित स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालये-
वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिटय़ूट, मुंबई. सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनीअिरग मुंबई. श्री गुरू गोंविदसिंघजी इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअिरग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, नांदेड. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअिरग, सांगली.
० विनाअनुदानित स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालये-
श्री रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजिनीअिरग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट, नागपूर. जी. एस. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअिरग, नागपूर. राजारामबापू इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, सरखाले. विश्वकर्मा इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे आणि वेगवेगळ्या विद्यापीठांमधील डिपार्टमेन्ट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये सीईटीद्वारे १०० टक्के प्रवेश दिला जातो.
सीईटीद्वारे  ६५ टक्के प्रवेश :
विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ६५ टक्के जागा या सीईटीद्वारे भरल्या जातात. उर्वरित १५ टक्के जागा JEE-MAIN परीक्षेतील गुणांवर आधारित भरल्या जातील. २० टक्के जागा या संस्था स्तरावर म्हणजेच व्यवस्थापन कोटय़ातून भरल्या जातात.
सीईटीद्वारे  ८५ टक्के प्रवेश :
अल्पसंख्याकांच्या विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ८५ टक्के जागा या सीईटीद्वारे भरल्या जातात. उर्वरित १५ टक्के JEE-MAIN परीक्षेतील गुणांवर आधारित भरल्या जातात. ५० टक्के जागा या संस्था स्तरावर भरल्या जातात. या ५० टक्के जागा संबंधित अल्पसंख्याक संवर्गासाठी राखीव असतात. म्हणजेच एखाद्या अल्पसंख्याक संस्थेत १०० विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावयाचा असेल, तर त्यातील ५० जागा या संबंधित (उदा. मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, गुजराथी, सिंधी, िहदी भाषिक) अल्पसंख्याक संवर्गासाठी राखीव असतात. उर्वरित ५० जागांपकी ८५ टक्के जागा या इतर संवर्गासाठी असतात. त्यामध्ये खुला गट, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, अपंग, मुली, इतर विद्यापीठांतील विद्यार्थी असे संवर्ग असतात.

वैशिष्टय़पूर्ण बाब :
० डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सटिी, लोणेरेमधील १०० टक्के जागा सीईटीने भरल्या जात असल्या तरी त्यातील १५ टक्के जागा कोकणातील म्हणजेच रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. उर्वरित ८५ टक्के जागा या महाराष्ट्रातील इतर भागांसाठी असतात.
० एस.एन.डी.टी. विद्यापीठातंर्गत येणाऱ्या उषा मित्तल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील १०० टक्के जागा सीईटीने भरल्या जात असल्या तरी या सर्व जागा केवळ महिलांसाठी राखीव असतात.

नियमावलीची गुंतागुंत
अभियांत्रिकी पदवी प्रवेशप्रक्रियेतील नियमावली समजून घ्यायला हवी-
० एकूण उपलब्ध जागांमध्ये खुला गट, महिला खुला गट, नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्रप्राप्त इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती प्रवर्ग, अनुसूचित जमाती प्रवर्ग, नोमॅडिक ट्राइब (एनटी), स्पेशल बॅकवर्ड क्लास, जम्मू काश्मीर स्थलांतरांसाठी राखीव जागा, ‘टय़ूशन फी व्हेवर ’योजनेअंतर्गत राखीव जागा आणि इतर विद्यापीठासांठी राखीव ३० टक्के जागा. अशा राखीव जागांच्या प्रक्रियेतून ही प्रवेश प्रक्रिया पुढे जाते.
० JEE-MAIN परीक्षेद्वारे १५ टक्के जागा भरल्या जातात. समजा- एखाद्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स शाखेमध्ये १०० जागा असतील तर त्यातील ७० टक्के जागा होम युनिव्हर्सटिी आणि उर्वरित ३० टक्के जागा इतर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. सर्व प्रवेशजागांवर ५०-५० टक्के आरक्षण असते. म्हणजेच ७० जागांपकी ३५ जागा खुल्या संवर्गासाठी आणि ३५ जागा राखीव संवर्गासाठी असतात. उर्वरित ३० जागांपकी १५ जागा खुल्या संवर्गासाठी आणि १५ जागा राखीव संवर्गासाठी असतात. ्नी-ें्रल्ल साठी १५ टक्के जागा, जम्मू -काश्मीर स्थलांतरितांसाठी एक जागा अशा जागा राखीव ठेवल्या जातात.

सामायिक प्रवेश प्रक्रिया
‘कॅप’द्वारे प्रवेशाच्या वेळी पुढीलप्रमाणे जागांचे वाटप केले जाते-
० राज्यस्तरीय जागा : विद्यार्थी होम युनिव्हर्सटिीच्या अंतर्गत येणाऱ्या कोणत्याही परिसरातील असला तरी तो राज्यातील कोणत्याही अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी पात्र ठरू शकतो.
वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिटय़ूट, मुंबई. सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनीअिरग, मुंबई. कॉलेज ऑफ इंजिनीअिरग, पुणे. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअिरग, सांगली. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती. शासकीय महाविद्यालय, औरंगाबाद. श्री गुरू गोिवदसिंघजी इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअिरग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, नांदेड या अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व प्रवेशजागा राज्यस्तरीय आहेत.

० होम युनिव्हर्सटिीच्या जागा :
विद्यार्थी ज्या विभागातून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला असेल, त्या भागातील विद्यापीठाला ‘होम युनिव्हर्सटिी’ म्हणतात. ‘होम युनिव्हर्सटिी’साठी ‘कॅप’ प्रक्रियेत ७० टक्के जागा राखीव असतात.
० इतर विद्यापीठे  : ‘कॅप’ प्रक्रियेत ३० टक्के जागा इतर विद्यापीठांतील विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवल्या जातात.
० १५ टक्के जागा : या  प्रवेशजागा jee-main च्या गुणांवर आधारित भरल्या जातात. या परीक्षेत विशिष्ट गुण प्राप्त केलेला देशातील कोणत्याही राज्यातील विद्यार्थी पात्र ठरू शकतो. या सर्व जागा खुल्या गटातील ठरतात आणि त्यात कोणतेही आरक्षण नाही.

० मॉक ड्रिल आणि प्रत्यक्ष प्रवेशफेऱ्या : सीईटीच्या गुणांवर आधारित सेंट्रल अ‍ॅडमिशन प्रोसेस (कॅप) ही तीन टप्प्यांमध्ये म्हणजेच तीन फे ऱ्यांमध्ये होते. २०१२ मध्ये ही प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू होण्याआधी मॉक ड्रिल घेण्यात आली. ही मॉक ड्रिल किंवा मॉक राऊंड अनेक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरला.
या ‘मॉक राऊंड’मध्ये विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये मिळालेल्या गुणांनुसार कोणत्या महाविद्यालयांमध्ये आणि कोणत्या विद्याशाखेमध्ये साधारणत: प्रवेश मिळू शकतो, हे दर्शविण्यात आले. प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेच्या वेळी जी कार्यपद्धती अवलंबली जाते, तीच या ‘मॉक ड्रिल’साठी अवलंबिण्यात आली होती. विविध महाविद्यालयातील १०० विद्याशाखांचे पर्याय प्रवेशासाठी उपलब्ध करून देण्यात आले. ही संपूर्ण ड्रिल विशेषत्वाने तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरद्वारे राबविली गेली. त्यामुळे विद्यार्थ्यांना सीईटी आणि AIEEE मध्ये मिळालेल्या गुणांनुसार कोणत्या महाविद्यालयात कोणती विद्याशाखा मिळू शकते, हे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रत्यक्ष ‘कॅप’मध्ये कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकेल, हेही स्पष्ट झाले. परिणामी, विद्यार्थी-पालकांनाही नििश्चतता अनुभवता आली. अनेक विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रवेशफेरीमध्ये प्रवेश घेतले. मनात ठरवलेल्या आराखडय़ानुसारच महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळल्याने पालक-विद्यार्थ्यांवरचा ताण कमी झाला. यंदासुद्धा हा मॉक राऊंड घेतला जाणार आहे. तो प्रवेशाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल.
शिक्षण विभागातील ज्येष्ठ तज्ज्ञ, प्रवेश प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करणारे काही तज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली असता, पहिल्याच प्रवेशफेरीमध्ये प्रवेश निश्चिती करायला हवी, असे मत अनेकांनी व्यक्त केले. कारण दुसऱ्या प्रवेशफेरीमध्ये जाण्याचा निर्णय फलदायी ठरेलच, याची खात्री नसते. किंबहुना दुसऱ्या प्रवेशफेरीच्या पर्यायाचा विचार काळजीपूर्वक केला नाही तर प्रवेशाचे त्रांगडे होण्याचा संभव असतो. दुसऱ्या प्रवेशफेरीमध्ये दर्जेदार महाविद्यालयात कमी गुणांमध्ये प्रवेश मिळाल्याची उदाहरणे अपवादात्मक असू शकतात.
अशा अपवादात्मक उदाहरणांचा दाखला देऊन काही पालक-विद्यार्थी जर दुसऱ्या प्रवेशफेरीचा सल्ला देऊ लागले तर प्रवेशेच्छु विद्यार्थ्यांनी सावध व्हावे आणि ‘मॉक  राऊंड’मध्ये मिळत असलेल्या महाविद्यालयात आणि विद्याशाखेत पहिल्या प्रवेशफेरीत प्रवेश मिळत असल्यास तो निश्चित करावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
यंदाही तिसरी- समुपदेशन फेरी औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडेल. पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश न मिळालेल्या किंवा प्रवेश न घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना या फेरीमध्ये सहभागी होता येते. या ठिकाणी उपस्थित विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये त्यांना मिळालेल्या गुणांनुसार सर्वादेखत जाहीर घोषणा करून प्रत्यक्ष बोलावले जाते. त्यावेळी उपलब्ध महाविद्यालयांतील उपलब्ध शाखेत प्रवेश दिला जातो. प्रवेश शुल्कापकी विशिष्ट रक्कम त्याच वेळी भरून हा प्रवेश निश्चित करावा लागतो. अन्यथा हा प्रवेश रद्द समजला जातो आणि विद्यार्थ्यांला प्रवेश प्रक्रियेतूनच बाद व्हावे लागते. ही प्रवेशफेरी केवळ महाराष्ट्रातीलच विद्यार्थ्यांसाठी असते.
या प्रवेशफेरीचे वैशिष्टय़ आणि अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे, या प्रवेशफेरीसाठी उपलब्ध सर्व जागा या खुल्या गटातीलच समजल्या जाऊन सीईटी परीक्षेत विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले यावरच प्रवेश दिला जातो. या प्रवेशफेरीत कोणतेही आरक्षण नसते. यास आंतर गुणांकन असे संबोधले जाते. खएए टअकठ च्या गुणांवर आधारित उपलब्ध असलेल्या अखिल भारतीय स्तरावरील जागा पहिल्या दोन्ही प्रवेशफेरीच्या वेळेस पूर्णपणे भरल्या गेल्या नाहीत तर त्यासुद्धा खुल्या गटातील धरल्या जातात आणि त्यावर केवळ महाराष्ट्रातीलच विद्यार्थ्यांना या प्रवेशफेरीमध्ये प्रवेश दिला जातो.