मी बीबीए करत आहे. मला ुमन रिसोर्समध्ये एमबीए करायचे आहे. पदवीनंतर मला कोणता अभ्यासक्रम शिकता येईल?

वैभव वाघमारे

तू विचारलेल्या प्रश्नातच तू एमबीए करायचे आहे, असे स्पष्ट केले आहे. तुला एमबीए करायचे असल्यास तुला कॉमन अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट किंवा मॅनेजमेंट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट / कॉमन  मॅनेजमेंट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट / झेवियर अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट / राज्य सरकारमार्फत घेण्यात येणारी सामायिक प्रवेश चाचणी द्यावी लागेल. याद्वारे  एमबीएच्या उत्तम महाविलयायात प्रवेश घेऊन ह्य़ुमन रिसोर्स या विषयामध्ये स्पेशलायझेशन करता येईल.

मी अ‍ॅग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजीमध्ये बी.एस्सी. केले आहे. मला कृषी क्षेत्रात फारसा रस नाही. पण मला संशोधन क्षेत्र आवडते. मला कुठला अभ्यासक्रम करता येईल?

स्नेहाली वानखेडे

सध्याच्या शैक्षणिक व्यवस्थेत संशोधन अभ्यासक्रम करण्यासाठी पदव्युत्तर पदवी आवश्यक असते. तू सध्या ज्या विषयात पदवी घेतली आहेस त्यात तुला रस नाही असे लिहिले आहेस. त्यामुळे तुला नेमकी आवड कोणत्या विषयात आहे, ही बाब स्पष्ट होणे आवश्यक आहे. त्यानंतर त्या विषयात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम करून संशोधन अभ्यासक्रमात प्रवेश मिळवावा लागेल. मात्र, प्राप्त केलेली पदवी घेण्यासाठी तुझी महत्त्वाची वष्रे खर्ची पडली आहेत. ही बाब लक्षात घेता याच विषयात पदव्युत्तर पदवी व त्यानंतर संशोधन करणे उचित ठरेल किंवा एमबीए करून पुढे त्यात संशोधन करता येईल.

मी मायक्रोबायोलॉजीमध्ये बी.एस्सी. केले आहे. मी राज्य वनसेवेसाठी अर्ज करू शकतो का?

शुभम् पारसवार

वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, गणित, भूशास्त्र, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यानविद्या, कृषी, कृषी अभियांत्रिकी, पशुसंवर्धन व पशुवैद्यकशास्त्र यापकी कोणत्याही एका विषयातील पदवी प्राप्त असणे ही या परीक्षेसाठी शैक्षणिक अर्हता आहे.  तुझ्याकडे ही अर्हता नसल्याने तू या परीक्षेला बसू शकत नाहीस.

मला सायबर फॉरेन्सिक शिकण्यात रस आहे. त्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे? हा अभ्यासक्रम कोणत्या महाविद्यालयातून शिकता येईल?

सानिका जोशी

हा अभ्यासक्रम करण्यासाठी कोणत्याही विषयातील पदवी ही अर्हता ग्रा धरली जाते. हा अभ्यासक्रम पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका, प्रगत पदविका, प्रमाणपत्र अशा स्वरूपात करता येतो. पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी अर्हता-  कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण. काही संस्था- १) फॉरेन्सिक सायन्स एज्युकेशन ऑनलाइन, संपर्क- www.ifs.edu.in , २) इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स, गुजरात फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सटिी/अभ्यासक्रम- सायबर क्राइम इन्व्हेस्टिगेटर, कॉम्प्युटर फॉरेन्सिक एक्स्पर्ट, सेलफोन फॉरेन्सिक प्रोफेशनल, सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट, संपर्क-  www.gfsu.edu.in ३) एशियन स्कूल ऑफ सायबर लॉ- सायबर क्राइम इन्व्हेस्टिगेटर, संपर्क- www.asianlaws.org ४) महात्मा गांधी युनिव्हर्सटिी- स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड अ‍ॅप्लाइड सायन्सेस कोट्टायम, अभ्यासक्रम- बी.एस्सी. इन सायबर फॉरेन्सिक,अर्हता- गणित, संगणकशास्त्र, भौतिक आणि रसायनशास्त्र या विषयासह विज्ञान शाखेतील बारावी उत्तीर्ण, संपर्क- mgu.ac.in ५) नागपूर विद्यापीठ- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिजिटल अ‍ॅण्ड सायबर फॉरेन्सिक्स अ‍ॅण्ड रिलेटेड लॉ, अर्हता- संगणकशास्त्र विषयासह बी.एस्सी. किंवा बी.कॉम. किंवा एलएलबी, बीसीए, बीई- कॉम्युटर सायन्स

किंवा इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी, संपर्क- www.nagpuruniversity.org ६) कॉलेज ऑफ इंजिनीअिरग, कल्लप्पारा, केरळ, अभ्यासक्रम-  एम.टेक. इन कॉम्युटर सायन्सेस वुइथ स्पेशलायझेशन इन फॉरेन्सिक सायन्स अ‍ॅण्ड इन्फम्रेशन सेक्युरिटी, अर्हता-  बीई/बीटेक-  कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन, संपर्क- www.cek.ac.in ७)सेंटर ऑफ एक्सलन्स इन डिजिटल फॉरेन्सिक्स चेन्नई, अभ्यासक्रम- एमएस्सी इन सायबर फॉरेन्सिक्स अ‍ॅण्ड इन्फम्रेशन सेक्युरिटी, अर्हता- संगणकशास्त्र विषयासह बी.एस्सी.

संपर्क-  www.coedf.org

मी बायोटेक्नॉलॉजीच्या तिसऱ्या वर्षांला आहे. मला या क्षेत्रात कुठल्या संधी आहेत?

कल्याणी अस्वार

तुला पुढील क्षेत्रात संधी मिळू शकते-  जैव प्रक्रिया उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग, पर्यावरण नियंत्रण, घन कचरा व्यवस्थापन, शासकीय व सार्वजनिक क्षेत्रातील प्रयोगशाळा, औषध निर्मिती प्रयोगशाळा, रसायने क्षेत्र अशा विविध क्षेत्रांमध्ये करिअरची संधी मिळू शकते.

मी बीकॉमच्या पहिल्या वर्षांला आहे. बीकॉमनंतर  एमबीए  किंवा  सीएबाबत माझ्या मनात गोंधळ आहे. या शिक्षणानंतर कुठल्या संधी मिळू शकतील?

दगडू गुंडारे

तुझ्या प्रश्नावरून तुझ्या मनात खूप गोंधळ आहे, ही बाब दिसून येते. मात्र हा गोंधळ त्वरित काढून टाकणे वा दूर सारणे आवश्यक आहे. अन्यथा संपूर्ण अभ्यासावर परिणाम होऊ शकतो. तू सध्या बीकॉम उत्तम रीतीने होण्यासाठी प्रयत्न करायला हवा. त्यानंतर एमबीए करता येऊ शकेल. त्यासाठी वेगवेगळ्या चाळणी/स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतील. तसेच सीएसाठी तुला प्रयत्न करावा लागेल. आत्मविश्वासाने सर्व संकल्पना नीट समजून घेणे, संवाद व लेखनकौशल्य वाढवणे, संगणकीय ज्ञान प्राप्त करून त्यात गती मिळवणे, सामान्य अध्ययन अथवा ज्ञानातील रुची वाढवणे आदी बाबी शिकल्याचाही उपयोग होऊ शकतो.

मी सध्या नववीत शिकत असून मला इस्रो किंवा नासामध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करायचे आहे. ते माझे ध्येय आहे. त्यासाठी मला काय करावे लागेल?

अमेय पांडव

तू उच्च ध्येय ठेवले आहेस त्याबद्दल अभिनंदन. मात्र, त्याकरता तू आधी उत्तम रीतीने दहावी आणि बारावी या विज्ञान शाखेच्या परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यानंतर दर्जेदार अभियांत्रिकी अथवा विज्ञान शाखेच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवावा लागेल. तुला नॅशनल टॅलेन्ट  सर्च परीक्षा, सायन्स ऑलिम्पियाड या परीक्षांमध्ये सहभागी होता येईल. मात्र त्यासाठी आतापासून संपूर्ण अभ्यास समजून उमजून करणे गरजेचे आहे. सगळ्या संकल्पना स्पष्ट होणेसुद्धा आवश्यक आहे. केवळ परीक्षेत चांगले गुण मिळण्यावर समाधान मानू नये.

मी सध्या तंत्र निकेतनमधील मेकॅनिकल इंजिनीअिरग  पदविकेच्या दुसऱ्या वर्षांला आहे. आता मला नोकरी करावीशी वाटते. तर मला चांगल्या वेतनाची नोकरी कुठे मिळू शकेल?

प्रज्वल स्वामी

उत्तम वेतनाची नोकरी मिळण्याचे स्वप्न बाळगणे चांगले असले तरी सध्याच्या तुझ्या शैक्षणिक अर्हतेवर तशी संधी नाही. तुला आधी चांगल्या रीतीने पदविका उत्तीर्ण होणे गरजचे आहे. त्यानंतर तुला संधी शोधावी लागेल. उत्तम गुणांनी पदविका प्राप्त केल्यास तुला अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. चांगल्या संस्थेत प्रवेश मिळाल्यास कॅम्पस निवड प्रक्रियेमध्ये तुला एखाद्या नामांकित कंपनीत नोकरी मिळू शकते. मात्र, त्यासाठीसुद्धा तुला अभियांत्रिकी पदवीचा अभ्यास उत्तम रीतीने करणे गरजेचे आहे. कॅम्पस निवड प्रक्रियेमध्ये संवादकौशल्य, विषयाचे तांत्रिक ज्ञान, व्यक्तिमत्त्वाचा विकास आदी बाबी बघितल्या जातात.

मी एमबीए- एच. आर.  केले असून नागपूरला नोकरी करत आहे. मला पुढील कुठले अशंकालीन अथवा पूर्ण वेळेचे अभ्यासक्रम करता येतील, याविषयी माहिती द्यावी.

प्रियंका पुसदेकर

तू सध्या चांगल्या पदावर कार्यरत आहेस, शिवाय उच्च दर्जाचे शिक्षणही घेतले आहेस. त्यामुळे पुन्हा कशासाठी तुला अंशकालीन अथवा पूर्णकालीन अभ्यासक्रम करायचे आहेत ही बाब स्वयंस्पष्ट होणे आवश्यक आहे. कारण एमबीए करण्यासाठी तू तुझा वेळ व इतर संसाधने खर्ची घातली आहेस. याच क्षेत्रात अधिक चांगल्या संधी अनुभवानंतर मिळू शकतात. तथापि, तुला पुढे शिकायचे असल्यास इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजेमेंट यासारख्या संस्थांमध्ये फेलो प्रोग्रॅम किंवा एक्झिक्युटिव्ह एमबीएसारखे अभ्यासक्रम करता येतील. त्यासाठी कॅट प्रवेशपरीक्षा द्यावी लागेल.

मी बारावीची परीक्षा दिलेली नाही. मात्र यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पूर्वतयारी परीक्षा उत्तीर्ण होऊन माझे बीए पूर्ण केले आहे. मला राज्यसेवा परीक्षा देता येईल का?

दयानंद िशदे

तुला राज्यसेवा परीक्षाच नव्हे तर केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी नागरी सेवा परीक्षाही देता येईल. अधिकृत मुक्त विद्यापीठांचे अभ्यासक्रम हे नियमित स्वरूपाच्या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांच्या समकक्ष समजले जातात.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)