News Flash

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा

स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच केंद्रीय कर्मचारी निवड आयोग होय. केंद्रीय मंत्रालयातील विविध खात्यांमध्ये असणाऱ्या अराजपत्रित (गट ब आणि गट क) पदांच्या भरतीसाठी या आयोगामार्फत दरवर्षी

| February 25, 2013 01:11 am

सीजीएल (CGL) म्हणजे काय?
पूर्वी एस. एस. सी. मार्फत विविध पदांच्या भरतीसाठी वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जात असत. परंतु दिवसेंदिवस पदांच्या वाढत्या संख्येमुळे वाढणारा परीक्षांचा पर्यायाने निकालांचा कालावधी व त्यामुळे होणारी आयोग व परीक्षार्थीची गैरसोय लक्षात घेऊन परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले. सध्या एस. एस. सी. मार्फत निरीक्षक, उपनिरीक्षक, लेखापरीक्षक, तसेच केंद्रीय मंत्रालयाच्या विविध खात्यांमधील साहाय्यक या व अशा २९ पदांसाठी एकत्रितरीत्या एकच परीक्षा घेतली जाते, जिला ‘एकत्रित पदवी स्तर’ किंवा combined Graduate Level (CGL) Exam  (परीक्षा) म्हणतात. ही परीक्षा देशातील सर्वात मोठी परीक्षा असून केंद्रातील महत्त्वाच्या खात्यांमध्ये सुमारे १०-१२ हजार पदे या एकाच परीक्षेमार्फत भरण्यात येतात. परीक्षेचे बदललेले स्वरूप, परीक्षेची नियमियता, परीक्षेची जलद प्रक्रिया, वाढलेली पदसंख्या तसेच महत्त्वाची पदे यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासून देशभरातील पदवीधारकांसाठी ही परीक्षा एक आकर्षण बनली आहे.
पात्रता –
१)    उमेदवार भारतीय नागरिक असावा.
२)    मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवीप्राप्त असावा.
३)    वय १८ ते २७ वर्ष (राखीव उमेदवारांसाठी नियमानुसार वयोमर्यादेत सूट)
वेळापत्रक –
२०१३ साठी फॉर्म भरण्याची मुदत १९ जाने. – १५ फेब्रुवारी.
परीक्षास्तर-१ दिनांक- १४ एप्रिल-२१ एप्रिल
परीक्षास्तर-२ – २० आणि २१ जुलै २०१३
परीक्षेचे  स्वरूप –
सी.जी.एल. (CGL) परीक्षा तीन स्तरांमध्ये घेतली जाते.
१) परीक्षास्तर-१ (Tier-I)
२) परीक्षास्तर-२ (Tier-II)
३) मुलाखत
या परीक्षेला प्रथमच सामोऱ्या जाणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षेच्या स्वरूपाबद्दल माहिती –
१) परीक्षास्तर १ : वेळ – २ तास, गुण – २००
या स्तरावर निगेटिव्ह माìकग असून प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा होतात. २०११ आणि २०१२ मधील निकालानुसार ७०-७५ गुण मिळालेले विद्यार्थी पहिला स्तर उत्तीर्ण झाले आहेत. या स्तरावर बँक किंवा इतर स्पर्धा परीक्षांसारखे विभागीय उत्तीर्ण (sectional cutoff) होण्याची आवश्यकता नाही, मात्र अंतिम निकालामध्ये स्तर-१ (Tier-I) मध्ये संपादन केलेले गुण ग्राह्य़ धरण्यात येतात.
२) परीक्षास्तर-२ : वेळ – प्रत्येक पेपरसाठी २ तास,  गुण – ४००
या स्तरावर पेपर १ व पेपर ३ साठी निगेटिव्ह माìकग प्रत्येक प्रश्नासाठी ०.५० व पेपर २ साठी ०.२५ गुणांची असेल.
महत्त्वाची टीप- या स्तरामधील पेपर-३ हा फक्त statistical-Investigator-II
(सांख्यिकीय तपासणीस- II ) या पदासाठी देणे आवश्यक आहे.

३) परीक्षास्तर ३ : गुण – १००
१)    या स्तरावर ज्या पदांसाठी मुलाखत आवश्यक आहे अशा पदांकरिता पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाते.
२)    तसेच मुलाखतीनंतर उमेदवाराची संगणक कौशल्य चाचणी (CPT) घेतली जाते, सदर चाचणीसाठी कोणतेही गुण नाहीत. परंतु उत्तीर्ण होणे आवश्यक.
३)    केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या विविध खात्यांमध्ये कर साहाय्यक या पदासाठी डेटा एन्ट्रीची कौशल्य चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
४)    अराजपत्रित (गट-क) मधील पदांसाठी मुलाखत नसते. सदर पदांसाठी अंतिम निकाल जाहीर करताना फक्त स्तर-१ व स्तर-२ मध्ये उमेदवाराने मिळविलेले गुण लक्षात घेतले जातात.
५)    अराजपत्रित (गट-ब) मधील पदांसाठी मुलाखत घेतली जाते व अंतिम निकाल जाहीर करताना स्तर-१, स्तर-२ आणि मुलाखतीमध्ये उमेदवाराने मिळविलेले गुण लक्षात घेऊन अंतिम यादी जाहीर केली जाते.
संदर्भ साहित्य-
सदर परीक्षेसाठी बाजारात बरीचशी पुस्तके उपलब्ध आहेत.
१) इंग्रजी माध्यम –
1) Quantitative Aptitude, verbal-Non-verbal Reasoning and English by Agrawal. .
2) SSC – CGL – Guidebook – Arihant publication..
२) मराठी माध्यम –
१) अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी-पंढरीनाथ राणे.
२) सामान्य ज्ञान – नवनीत प्रकाशन-२०१३. ३)English- Language- Agrawal..

यूपीएससी, एमपीएससी, बँक तसेच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एस. एस. सी.- सी. जी. एल. परीक्षा एक मोठी संधी आहे. अभ्यासक्रम व्यवस्थित पाहून प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यास केंद्रीय प्रशासनामध्ये मराठी टक्का निश्चितच वाढेल. परीक्षेसाठी शुभेच्छा!
महत्त्वाचे-
१)     सदर परीक्षेसाठी अर्ज भरताना विविध २९ पदांसाठी प्राधान्यक्रम द्यावा लागतो. प्रत्येक विद्यार्थ्यांने हा क्रम काळजीपूर्वक भरावा. हा प्राधान्यक्रम भरताना प्रत्येक पदाच्या थोडक्यात माहितीसाठी पुढील वेबसाइटची मदत घ्यावी- www.forums.bankingawareness.com. (detail description of all post ssc-CGL)
२)     तसेच विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना भविष्यात पोिस्टगसाठी प्राधान्यक्रम भरताना काळजीपूर्वक भरावा.
३)     अर्ज भरताना किंवा भरतेवेळी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
महत्त्वाच्या वेबसाइट-  www.ssconline.nic.in  www.examrace.com  www.freejobalert.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2013 1:11 am

Web Title: staff selection commission examination
Next Stories
1 फील गुड : प्रतिकूल परिस्थितीचा सामना
2 स्पर्धापरीक्षेच्या रिंगणात : एमपीएससी: पेपर-१ भारतीय राज्यपद्धती
3 देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या : जागतिक बँकेची आर्थिक पदव्युत्तर शिष्यवृत्ती
Just Now!
X