16 October 2019

News Flash

सिलिकॉन व्हॅलीतील शिक्षण केंद्र स्टॅनफर्ड विद्यापीठ, अमेरिका

क्षेत्रफळाच्या बाबतीत साधारणपणे ८१८० एकर एवढा मोठा परिसर लाभलेले स्टॅनफर्ड विद्यापीठ हे अमेरिकेतील एकमेव विद्यापीठ आहे.

|| प्रथमेश आडविलकर

विद्यापीठाची ओळख-क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सटिी रँकिंगनुसार जगातले दुसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ असलेल्या स्टॅनफर्ड विद्यापीठाची अधिकृत स्थापना १८९१ मध्ये झाली. जेन व लेलँड स्टॅनफर्ड या दाम्पत्याने आपल्या एकुलत्या पुत्राच्या लेलँड स्टॅनफर्ड ज्युनिअरच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मरणार्थ १८८५मध्ये या विद्यापीठाची स्थापना केली आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत या विद्यापीठास सढळ हाताने देणगी दिली. म्हणूनच या विद्यापीठाचे खरे नाव ‘लेलँड स्टॅनफर्ड ज्युनिअर युनिव्हर्सटिी’ असे आहे. मात्र हे विद्यापीठ ‘स्टॅनफर्ड युनिव्हर्सटिी’ या नावानेच सर्वत्र प्रसिद्ध आहे. अमेरिकेतील कॅलिफोíनया या राज्यात हे विद्यापीठ आहे. त्याचे ब्रीदवाक्य जर्मन भाषेमध्ये असून त्याचे इंग्रजी भाषांतर ‘ब्लोज विंड ऑफ फ्रीडम’ असा आहे. एकूणच ते तत्कालीन राजकीय, सांस्कृतिक, आíथक व सामाजिक परिस्थितीस पूरक आहे. सुरुवातीपासूनच स्टॅनफर्ड विद्यापीठ मुक्त विचारांचे, सह-शैक्षणिक आणि विद्यार्थ्यांना आíथकदृष्टय़ा सहजी परवडणारे असे होते. त्यामुळेच विद्यापीठाने अगदी तेव्हापासूनच पारंपरिक उदार कला ते अभियांत्रिकी-तंत्रज्ञान अशा विविधांगी बाबींतील विद्यादानाचे कार्य केले.

क्षेत्रफळाच्या बाबतीत साधारणपणे ८१८० एकर एवढा मोठा परिसर लाभलेले स्टॅनफर्ड विद्यापीठ हे अमेरिकेतील एकमेव विद्यापीठ आहे. विद्यापीठाच्या या कॅम्पसमध्ये एकूण अठरा आंतरविद्याशाखीय संशोधन संस्था आणि सात प्रमुख शैक्षणिक-संशोधन विभाग पसरलेले आहेत. आजघडीला स्टॅनफर्डमध्ये २२१९ तज्ज्ञ प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून १६,४२४ पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत.

अभ्यासक्रम – स्टॅनफर्ड विद्यापीठ अभ्यासक्रमासाठी चारमाही व्यवस्थेचे (क्वार्टर सिस्टम) पालन करते. विद्यापीठातील पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधीचे आहेत. पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी विज्ञान व कला शाखेतील बहुतांश विषयांवर आपले लक्ष केंद्रित करतात.

स्टॅनफर्डमधील शैक्षणिक विभाग हे सात वेगवेगळ्या स्कूल्सच्या माध्यमातून विभागलेले आहेत. संस्थेतील ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझिनेस, स्कूल ऑफ अर्थ, एनर्जी अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंटल सायन्सेस, ग्रॅज्युएट स्कूल ऑफ एज्युकेशन, स्कूल ऑफ इंजिनीअिरग, स्कूल ऑफ ह्यूमॅनिटीज अ‍ॅण्ड सायन्सेस, लॉ स्कूल, स्कूल ऑफ मेडिसिन या सात स्कूल्सच्या अंतर्गत एकूण ७७ पदवी व पदव्युत्तर विभाग चालतात. या सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी. वा संशोधन पातळीवरील शेकडो अभ्यासक्रमांचे प्रमाणपत्र, ऑनलाइन व ऑफलाइन पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. विद्यापीठामार्फत चालणाऱ्या या सर्व अभ्यासक्रमांना ‘वेस्टर्न असोसिएशन ऑफ स्कूल्स अ‍ॅण्ड कॉलेजेस’ या संस्थेची मान्यता मिळालेली आहे. विद्यापीठातील ऑफलाइन अभ्यासक्रम हे ऑटम, फॉल आणि स्प्रिंग या तीन सत्रांमध्ये चालतात. ऑनलाइन अभ्यासक्रम मात्र वर्षभर उपलब्ध असतात.

विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी त्या त्या पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे. विद्यापीठामध्ये स्कूल ऑफ अर्थ, एनर्जी अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंटल सायन्सेस अंतर्गत अर्थ सिस्टम सायन्सेस, अर्थ, एनर्जी अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंटल सायन्सेस, एनर्जी रिसोस्रेस इंजिनीअिरग, जिओफिजिक्स आणि जिओलॉजिकल सायन्सेस इत्यादी विभाग येतात.

तर स्कूल ऑफ इंजिनीअिरगअंतर्गत मटेरियल्स सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअिरग, एअरोनॉटिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोनॉटिक्स, बायोइंजिनीअिरग, केमिकल इंजिनीअिरग, सिव्हिल अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअिरग, मॅनेजमेंट सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअिरग, इलेक्ट्रिकल इंजिनीअिरग, कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल इंजिनीअिरग हे विभाग येतात. याशिवाय स्कूल ऑफ ह्यूमॅनिटीज अ‍ॅण्ड सायन्सेसअंतर्गत, अँथ्रॅपॉलॉजी, इकोनॉमिक्स, हिस्टरी, लिंग्विस्टिक्स, फिलोसॉफी, पॉलिटिकल सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथेमॅटिक्स, म्युझिक, इंग्लिश, सायकोलॉजी इत्यादी विभाग तर स्कूल ऑफ मेडिसिनअंतर्गत अ‍ॅनेस्थेशिया, जेनेटिक्स, सर्जरी, हेल्थ रिसर्च, बायोइंजिनीअिरग, न्युरोलॉजी, न्युरोबायोलॉजी इत्यादी विभाग आहेत.

सुविधा – स्टॅनफर्ड विद्यापीठाने परदेशातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क, निवास व भोजन सुविधा विविध निकषांद्वारे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. विद्यापीठाच्या दाव्यानुसार प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपकी जवळपास ८० टक्के विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून आíथक साहाय्य उपलब्ध करून दिले जाते. तसेच विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार विद्यापीठाच्या आवारात विवाहित व अविवाहित विद्यार्थ्यांना निवासाची सुविधा बहाल करण्यात येते. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासाठी असलेली अर्जप्रक्रिया व इतर बाबींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. विद्यापीठाचे एकच मुख्य आणि अद्ययावत ग्रंथालय आहे. २०१४ च्या संदर्भानुसार या ग्रंथालयात ९३ लाख पुस्तके असून त्यातील तीन लाख पुस्तके ही अतिशय दुर्मीळ आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना हेल्थ इन्शुरन्स व वैद्यकीय सुविधा काही अटींवर विद्यापीठाकडून दिल्या जातात. स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये जगप्रसिद्ध कँटर सेंटर फॉर व्हिज्युअल आर्ट्स हे वस्तुसंग्रहालय आहे.

वैशिष्टय़ – स्टॅनफर्ड विद्यापीठ सॅन फ्रान्सिस्कोपासून पस्तीस मलांवर दक्षिणेकडे आणि सॅन जोसपासून वीस मल उत्तरेस असलेल्या उत्तर कॅलिफोíनयाच्या आणि याहू, गुगल, हेवलेट-पॅकार्ड या व अशा जगाच्या नकाशावर आपले नाव कोरणाऱ्या इतर अनेक तंत्रज्ञान कंपन्यांचे माहेरघर असलेल्या सिलिकॉन व्हॅलीच्या मध्यभागी आहे. विशेष म्हणजे सिलिकॉन व्हॅलीतील या व अशा अनेक कंपन्या या स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी आणि अध्यापक यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या आहेत. बऱ्याचदा अनौपचारिक चर्चामध्ये स्टॅनफर्ड विद्यापीठाला ‘बिलेनियर फॅक्टरी’ या नावाने संबोधले जाते. कारण गमतीने असे म्हटले जाते की, स्टॅनफर्ड पदवीधरांनी स्वत:च्या देशाची स्थापना केली तर तो जगातील सर्वात मोठय़ा दहा अर्थव्यवस्थांपकी एक ठरेल. स्टॅनफर्ड विद्यापीठाने अनेक संशोधक, उद्योजक, अंतराळवीर आणि राजकारणी घडवलेले आहेत. ऑक्टोबर २०१८पर्यंतच्या सांख्यिकीनुसार, आतापर्यंत संस्थेशी संबंधित एकूण ८३ विद्यार्थी वा प्राध्यापक नोबेल पारितोषिक विजेते आणि २७ टय़ुरिंग पुरस्कार विजेते आहेत. गुगलचे संस्थापक लॅरी पेज व सर्जी ब्रिन, तसेच याहू, कोस्रेरा, हेवलेट-पॅकार्ड, सिस्को, सन मायक्रोसिस्टम्स, सिलिकॉन ग्राफिक्स इत्यादी अनेक कंपन्यांचे संस्थापक हे या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत.

संकेतस्थळ  https://www.stanford.edu/

itsprathamesh@gmail.com

First Published on January 8, 2019 12:21 am

Web Title: stanford university