तुम्ही स्वत:साठी ठरविलेलं कोणतंही लक्ष्य संपादन करण्यासाठी आवश्यक असे काहीही शिकू शकता. तुम्ही जे काही मिळवू शकता, त्यावर तुमचे मन आणि कल्पनेवर जे नियम लादून घेता त्याशिवाय खरी कोणतीही मर्यादा नाही. जर तुम्ही सवरेत्कृष्ट बनविण्याचा, तुमच्या क्षेत्रातील सर्वोच्च अशा दहा टक्क्य़ांमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतलात, तर तुम्हाला तिथे पोहोचण्यापासून भूतलावरील कोणतीही गोष्ट रोखू शकणार नाही. अपवाद- तुमचा स्वत:चा.
हे सोपं असेल का?- अर्थातच नाही. प्रत्येक मौलिक गोष्ट करण्यासाठी खूप वेळ लागतो आणि खूप काम करावं लागतं, पण तुम्हाला ते तीव्रतेत हवं असेल आणि तुमची पुरेसा दीर्घकालपर्यंत काम करण्याची तयारी असेल तर ते शक्य आहे. एकदा तुम्ही तिथे पोचलात म्हणजे ते तुम्ही केलेल्या प्रत्येक प्रयत्नाच्या लायक असेल.
प्रेरक वक्ता, लेस ब्राऊन म्हणतो, तुम्ही पूर्र्वी जे कधीही मिळवले नाही असे काहीतरी मिळवण्यासाठी तुम्ही पूर्र्वी कधीही जे नव्हता ते तुम्हाला बनावंच लागेल. आयुष्यातील बहुतेक क्षेत्रांमध्ये नैसर्गिक क्षमता आणि प्रतिभेपेक्षा कठोर परिश्रम आणि झोकून देऊन केलेलं कामच उत्कृष्टता आणि महान यशाकडे घेऊन जातं.
‘गोल्स’ – ब्रायन ट्रेसी, अनुवाद- गीतांजली गीते, पृष्ठे- २५६, मूल्य- २२५ रु.