कर्मचारी निवड आयोगातर्फे केंद्र सरकारचे विविध विभाग आणि आस्थापनांमध्ये स्टेनोग्राफर म्हणून निवड करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या स्टेनोग्राफर निवड परीक्षा : २०१४ साठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रवेशजागा :  ५३४
शैक्षणिक पात्रता : बारावीची परीक्षा उत्तीर्ण. लघुलेखनाची १०० शब्द प्रतिमिनिट पात्रता उत्तीर्ण. संगणकाचे ज्ञान आवश्यक.
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय २७ वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी शिथिलक्षम आहे.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर १४ सप्टेंबर २०१४ रोजी घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, पुणे, नाशिक व अमरावती या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल.
लेखी निवड परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे  नेमणूक करण्यात येईल.
अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासह १०० रु. निर्धारित टपालघरांमध्ये उपलब्ध असणाऱ्या सेंट्रल रिक्रूटमेंट स्टॅम्पच्या स्वरूपात भरणे आवश्यक आहे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३१ मे ते ६ जून २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोगाची जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: महाराष्ट्रातील उमेदवारांनी अर्ज क्षेत्रीय निदेशक (पश्चिम क्षेत्र), कर्मचारी निवड आयोग, पहिला मजला, साऊथ विंग, प्रतिष्ठा भवन, १०१, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई-४०० ०२० या पत्त्यावर २७ जून २०१४ पर्यंत पाठवावे.     

jalgaon voter awareness marathi news, jalgaon voter id marathi news
तुमचे गाव, सोसायटीला सुवर्ण, रौप्य, कांस्य यांपैकी कोणता फलक हवा ? मतदान टक्केवारी वाढीसाठी प्रशासनाचा अनोखा उपक्रम
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
Changes in Composite Assessment Test Exam Schedule
संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षा वेळापत्रकात बदल
prepaid meter
प्रीपेड की पोस्टपेड वीज मीटर हवा ? ग्राहकांना निवड करू देण्याची जनहित याचिकेद्वारे मागणी