आदिशक्ती दुग्रेचा उत्सव म्हणजे स्त्रीच्या शक्ती आणि सामर्थ्यांला दिलेली ओळख आहे. मानवजातीच्या इतिहासात रेणुका शेतीनिपुण होती तर दुर्गा-पार्वती शस्त्रविद्यानिपुण असे उल्लेख सापडतात. त्यांच्या स्त्रीत्वानं त्यांना कुठल्याच ज्ञानशाखेपासून अडवलं नव्हतं. उलट त्या त्या काळानुसार, गरजेतून लागणाऱ्या बहुतेक शोधांच्या जननी स्त्रियाच होत्या. समाजाला उपयोगी पडणारं काहीतरी मोठं काम त्यांनी तेव्हा केलं होतं. आदिशक्तीनं दिलेल्या सर्व प्रकारच्या शक्ती, क्षमतांबद्दल, समृद्धीबद्दल कृतज्ञता म्हणून नवरात्रौत्सव साजरा केला जातो. या प्रतीकांचा उपयोग सकारात्मकतेसाठी कसा करता येईल, त्याबद्दल..
नवरात्र. नऊ दिवस आणि नऊ रात्री चालणारा आदिशक्ती दुग्रेचा उत्सव. स्त्रीच्या शक्ती आणि सामर्थ्यांला दिलेली ओळख. जाती-धर्म-लिंगभेदाच्या अभिनिवेशात न शिरता एक प्रतीक म्हणून आपण उत्सवांकडे पाहू शकलो तर त्या सणाच्या किंवा रूढीच्या गाभ्यापर्यंत पोहोचणं शक्य हेतं. कर्मकांडाचा अतिरेक बाजूला सारून त्यामागच्या मूळ हेतूपर्यंत गेल्यावर लक्षात येतं, तो गाभा म्हणजे नेहमीच एखादं चिरंतन शाश्वत मूल्य असतं.
मानवजातीचा इतिहास सांगेल की, या स्त्रिया असणार. रेणुका शेतीनिपुण होती तर दुर्गा-पार्वती शस्त्रविद्यानिपुण असे उल्लेख सापडतात. त्यांच्या स्त्रीत्वानं त्यांना कुठल्याच ज्ञानशाखेपासून अडवलं नव्हतं. उलट त्या त्या काळानुसार, गरजेतून लागणाऱ्या बहुतेक शोधांच्या जननी स्त्रियाच होत्या. त्यांच्या समूहानं कायम त्यांचं ऋणी राहावं असं समाजाला उपयोगी पडणारं काहीतरी मोठं काम त्यांनी तेव्हा तेव्हा केलं होतं म्हणून त्या पूजनीय होत्या. स्त्री-पुरुषांमधला अनसíगक फरक त्या काळात अस्तित्वात नसावा. आजच्या काळातलं पुरुषप्रधान ‘कंडिशिनग’ नसावं. कारण मातृकुलातील सगळी मातेचीच मुलं. तिच्यासाठी सगळीच सारखी. मातेकडून दोघांचाही त्यांच्या नसíगक वैशिष्टय़ांसह बिनशर्त स्वीकार असणार. त्यामुळे मुलगा-मुलगी असा फरक संधीबाबत त्या वेळी नसावा. स्त्री-पुरुष दोघांसाठी ज्ञानशाखा सारख्याच खुल्या असाव्यात.  
या देवींची वैशिष्टय़ं पाहिली तर दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी या मुख्य तीन प्रकारांमध्ये साधारणपणे सर्व देवी बसतात. दुर्गा ही दुर्जनांचा नाश करणाऱ्या शक्तीचं प्रतीक, सरस्वती ही कुणाच्या अध्यातमध्यात न पडणारी ज्ञानाची-बुद्धीची प्रतीक तर लक्ष्मी सोज्वळता, वात्सल्य आणि परिपूर्णतेचं प्रतीक. (त्या वत्सलतेमधला सेवाभाव वाढवून तिचं शेषशायी विष्णूचे- पतीचे सतत पाय चेपत बसणं नंतरच्या पितृसत्ताक आर्यानी घुसडलं असावं. असो.)  
खरं तर शक्ती, बुद्धी आणि वात्सल्य हे माणसातले मूलभूत गुणधर्म (ट्रेटस) आहेत. स्त्री-पुरुष दोघांतही म्हणजे कुठल्याही ‘व्यक्ती’च्या स्वभावात या तिन्हीचे अंश असतात आणि त्यातला एखादा ठळक असतो. त्या त्या गुणाचं विशिष्ट दिवसाच्या निमित्तानं जागरण म्हणजे त्या त्या देवीचा सण किंवा वार. रोजच्या  एकसुरी जगण्यात थोडा बदल करून चतन्य आणणं आणि संपूर्ण समूहाचं विविध गुणांशी साहचर्य जागं करणं हे सणांचे उद्देश असतात. सण सामुदायिक असले तरी सामुदायिकपणे करण्याच्या विधींसोबत प्रत्येकानं आपल्या घरात वैयक्तिकरित्याही सण साजरे करायचे असतात. म्हणजे व्यक्तीकडून समूहाकडे आणि समूहाकडून व्यक्तीकडे असा दोन्ही अंगांनी सणांमागचा साहचर्याचा विचार जातो.
वैयक्तिक किंवा समूहाच्या मानसशास्त्रात ‘साहचर्य‘ ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे सणांमागची मानसिकता समजावून घेताना प्रतिकाशी, कृतीशी, घटनेशी, आचारपद्धतीशी साहचर्य जुळणं म्हणजे काय ते आधी रोजच्या व्यवहारातल्या सोप्या उदाहरणातून समजून घेऊ या.  
परीक्षा जवळ आली की अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक अनाकलनीय भीती जागी होते. अभ्यास झाला नसेल तर काही लोक नवस बोलून देवाशी वाटाघाटी करायला सुरुवात करतात. देवाच्या दारी जाऊन आलं, परीक्षेला निघताना मोठय़ांना नमस्कार केला, कंपासपेटीत (पेनाजवळ) तुळशीचं पान ठेवलं की पेपर लिहिताना वेळेवर आठवतं असा विश्वास लहानपणी (किंवा कधी कधी मोठेपणीदेखील) अनेकांचा असतो. परीक्षेची अतिरेकी भीती कमी करायला असले उपाय थोडेफार उपयोगी पडतात. अभ्यास झालेला असेल तर फक्त भीती घालवण्यापुरती अशा गोष्टींची मदत घेण्यात काही चूकही नाही. पण मुळात हा विश्वास कुठून निर्माण होतो? तर लहानपणापासून विशिष्ट गोष्टी पाहून, ऐकून रुजतात. क्वचित एखादा अनुभव त्याच्याशी जोडला जातो, एकदोनदा घडलं की ते रुजणं पक्कं होतं आणि त्यातून निर्माण झालेल्या साहचर्यातून विश्वास वाटतो.  
अशी नकळत निर्माण झालेली साहर्चय भावनिक पातळीवरची असतात. त्यांच्यावर फार अवलंबून राहिलो तर ती आपल्या स्वविकसनाच्या प्रक्रियेमध्ये अडथळाही आणतात. पण साहचर्य ही संकल्पना समजून घेऊन  आपल्या भीती आणि ताणातून बाहेर येण्यासाठी घेतलेली त्यांची मदत सकारात्मक असते. मनोबल वाढवणारी असते. अतिरेकी भीतीवर उपाय म्हणून एखाद्या गोष्टीशी सकारात्मक साहचर्य जाणीवपूर्वक निर्माण करावं लागतं. त्यासाठी कधी कधी खालीलप्रकारे स्वयंसूचनेच्या स्वाध्यायाचा प्रयोग उपयोगी ठरू शकतो.   
 डोळे मिटून शांतपणे श्वास घ्या. डाव्या हाताचं पहिलं बोट आणि अंगठा जुळवून सुंदर अशी खूण करा आणि बोटं तशीच ठेवून कल्पना करा. डोळ्यासमोर आणा, ‘तुमची परीक्षा आहे. तुम्ही पेपरसाठी वर्गात बाकावर बसला आहात. पेपर अतिशय सोप्पा आहे. तुम्ही जे केलंय त्यावरच सगळे प्रश्न आहेत. तुम्ही अतिशय आनंदानं भराभर पेपर सोडवता आहात. आपल्याला जमणार आहे असा तुम्हाला आत्मविश्वास वाटतोय.  वेळेआधी पंधरा मिनिटं तुमचा पेपर लिहून संपलाय. तुम्ही मन एकाग्र करता. पूर्ण पेपर शांतपणे तपासता. काही सिली मिस्टेक्स सापडतात, त्या दुरुस्त करता. पेपर संपल्याची बेल होता होता परीक्षकांकडे पेपर देऊन तुम्ही बाहेर पडता. तुम्हाला मनात अतिशय छान वाटतंय. समाधान वाटतंय. ‘कसा गेला पेपर?’ असं कुणीतरी तुम्हाला विचारलं, तर बोटांनी केलेली ‘सुंदर’ अशी खूण तुम्हाला मनात दिसतेय. त्या खुणेकडे पाहून तुम्हाला आणखीनच छान वाटतंय..’
दोन बोटांच्या ‘सुंदर’ अशा अर्थाच्या खुणेसोबत आत्मविश्वास, आनंद समाधान या भावना जोडल्या जातात. असा प्रयोग अनेकदा एकाग्रतेने केल्यावर हे साहचर्य मनात पक्कं होतं. मग जेव्हा जेव्हा खूप दडपण, भीती वाटेल, छाती धडधडायला लागेल तेव्हा क्षणभर एकाग्र होऊन बोटांची तशी खूण केली की त्यासोबत तो आनंदाचा अनुभव आठवता येतो. धडधड कमी व्हायला मदत होते. हे साहचर्य वैयक्तिक पातळीवर आपली शक्ती वाढवतं. असं अनेक व्यक्तीचं साहचर्य एकाच गोष्टीशी निर्माण झालं की उत्सव, सण, देवाच्या मूर्ती, धर्मग्रंथ, धार्मिक स्थळं, आरती, प्रार्थना, नमाज अशी प्रतीकं बनतात.  
साहचर्य सकारात्मक आणि नकारात्मक अशी दोन्ही प्रकारची असू शकतात. जसं, परीक्षेची भीती ही त्यासोबत जोडल्या गेलेल्या त्रासदायक पूर्वानुभवाने वाढते. देवीच्या उत्सवातून स्वत:साठी किंवा समूहासाठी काहीच चांगलं न निघता नुसताच आवाज, गोंधळ, वर्गणी, भांडणं झाली तर नकारात्मक साहचर्यही जुळू शकतं. उदा स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलाच्या घराजवळच्या चौकात देवीचा उत्सव चालू आहे. लाऊडस्पीकरच्या ढणढण आवाजानं त्याला दहा दिवस वेडं केलं. ऐन परीक्षेआधीच्या अभ्यासाच्या दहा रात्री वाया घालवल्या किंवा एखाद्या रुग्णाची झोप दहा दिवस हराम केली तर शक्ती, दुर्गा, गुण वगरे सगळं खरं असलं तरी ‘देवीचा उत्सव’म्हटलं की त्याच्या पोटात गोळाच येणार.                           
काही लोकांना देवभोळेपणाचा, गोंधळाचा संताप येतो. यातून उत्सवच नकोत अशी वृत्ती बनते. खरं तर समूह आणि साहचर्य सकारात्मकतेनं एकत्र वापरलं तर ऊर्जा वळती करता येते.
साहचर्याची संकल्पना आणि ते निर्माण होण्याची भावनिक प्रक्रिया बुद्धीनं समजून घ्यावी लागते. मग नकारात्मक साहचर्य निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करता येतात. आजच्या काळानुसार आणि आपल्या गरजेनुसार सकारात्मकतेसाठी प्रतीकांचा जाणीवपूर्वक वापर करता येऊ शकतो. बायोडेटामध्ये स्वत:चा व्यवसाय ‘समाजसेवा’ असं लिहिणारे, समूहांवर प्रभाव पाडू शकणारे अनेक तण सामूहिक पातळीवर प्रतीकांचं नातं उत्साहाशी असेल, उन्मादाशी नसेल यासाठी जागरूक असू शकतात.
  प्रतीकांना कवटाळून बसणं किंवा ओरबाडून काढून फेकणं हे दोन्ही टोकाचे विचार झाले. प्रतीकं एवीतेवी रुजलीच आहेत तर त्याकडे डोळसपणे पाहून साहचर्याचे फायदे आपण कसे मिळवू शकतो? असा

Loksatta chaturanga Fat phobia women mentality
स्त्री ‘वि’श्व: फॅट फोबियाच्या चक्रात स्त्रिया?
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Guru Gochar 2024
गुरु कृतिका नक्षत्रात करणार प्रवेश, या राशींच्या लोकांचा होईल भाग्योदय, धन-संपत्तीत होईल चांगली वाढ
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क