19 September 2020

News Flash

उद्योजकतेचे बाळकडू!

उद्योजकता ही गुणसूत्रांमध्ये भिनलेली असावी लागते, असं मानण्याचा काळ केव्हाच हद्दपार झाला.. उद्योजकता ही शिकता येते! आत्मसात करता येते! उद्योजकतेची प्रेरणा देणारे आणि तंत्र शिकवणारे

| October 13, 2014 01:06 am

उद्योजकता ही गुणसूत्रांमध्ये भिनलेली असावी लागते, असं मानण्याचा काळ केव्हाच हद्दपार झाला.. उद्योजकता ही शिकता येते! आत्मसात करता येते! उद्योजकतेची प्रेरणा देणारे आणि तंत्र शिकवणारे हे महत्त्वाचे अभ्यासक्रम-
एखादा उद्योग, व्यवसाय, स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी काही तंत्रं आणि कौशल्यांची गरज असते. काही मूलभूत बाबी आपल्याला माहीत असणं उपयुक्त ठरतं. कारण त्यामुळे या क्षेत्रात उडी घेतल्यानंतर उद्भवणारे संभाव्य धोके आणि अडचणींची कल्पना येऊ शकते. या अडचणींवर मात कशी करता येईल याचे मार्गसुद्धा कळू शकतात.
आपल्या पंतप्रधानांनी कौशल्य विकास म्हणजेच ‘स्कील डेव्हलपमेंट’ आणि ‘मेक इन इंडिया’ यावर भर दिला आहे. देशाला महाशक्ती करण्यासाठी या दोन बाबी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. आगामी काळात या क्षेत्राला अधिकाधिक प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्योजक होण्याची महत्त्वाकांक्षा असणाऱ्या युवावर्गाने उद्योजकतेकडे वळण्याचा गांभीर्यपूर्वक विचार करायला हवा.
उद्योजकतेला प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळण्यासाठी उपयुक्त ठरू शकतील असे अभ्यासक्रम काही संस्थांनी सुरू केले आहेत. हे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या युवावर्गाला उद्योजकता आणि व्यवस्थापनविषयक मूलभूत बाबींचं ज्ञान मिळू शकतं. असे काही अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-

० पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट- बिझनेस आंत्रप्रेन्युअरशिप
आंत्रप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या संस्थेमार्फत हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. अर्हता- ५० टक्के गुणांसह कोणत्याही विद्याशाखेतील पदवीप्राप्त उमेदवारांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराने CAT, XAT.CMAT, AMTA यापकी कोणतीही एक परीक्षा देणे आवश्यक आहे. याशिवाय संस्थेमार्फत घेतली जाणारी आंत्रप्रेन्युअरशिप अॅप्टिटय़ूड टेस्ट आणि मुलाखत द्यावी लागेल.
पत्ता : आंत्रप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया अहमदाबाद, पोस्ट अॉफिस, भाट ३८२४२८,
जिल्हा – गांधीनगर, वेबसाइट : www.ediindia.org
इमेल:pgp@ediindia.org
वेबसाइट :www.ediindia.ac.in

० एमबीए इन आंत्रप्रेन्युअरशिप अॅण्ड फॅमिली बिझनेस
नरसी मोनजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेने मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन इन आंत्रप्रेन्युअरशिप अॅण्ड फॅमिली बिझनेस अभ्यासक्रम सुरू केला आहे.
फॅमिली बिझनेसमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या युवावर्गासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो. फॅमिली बिझनेस चालविण्यासाठी विशिष्ट कौशल्य व तंत्राची अवश्यकता असते. त्यादृष्टीने या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील ५० टक्के गुणांसह पदवी. या अभ्यासक्रमासाठी निवड लेखी प्रवेश परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाते.
पत्ता- नरसी मोनजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, व्ही. एल. मेहता रोड, विलेपाल्रे पश्चिम, मुंबई-  ४०००५६,
ईमेल-enquiry@nimims.edu  
वेबसाइट- www.nimims.edu

० एंटरप्राइज ट्रेिनग प्रोग्रॅम फॉर विमेन
    व्यवसाय आणि उद्योगात असणाऱ्या आणि नव्याने या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी हा तीन महिने कालावधीचा अभ्यासक्रम नरसी मोनजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजने सुरू केला आहे.
० आंत्रप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम
मुंबईस्थित स्मॉल इंडस्ट्रीज सíव्हस इन्स्टिटय़ूटतर्फे दोन आठवडे ते १० दिवस कालावधीचा आंत्रप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम चालवला जातो. या अभ्यासक्रमात उद्योजकतेला प्रोत्साहन, प्रकल्पाची आखणी, उद्योजक व्यक्तिमत्त्व विकास, उद्योजकता विकासासाठी उपयुक्त असणाऱ्या शासनाच्या योजना, कर्ज सोयी, लघु उद्योगाचे व्यवस्थापन यांसारख्या विषयांचं प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षणाला
१८ वर्षांखालील व्यक्तींना प्रवेश दिला जातो. या प्रशिक्षणासाठी सर्वसाधारण गटासाठी १०० रुपये शुल्क आकारले जाते. राखीव गटातील उमेदवारांकडून शुल्क आकारले जात नाही.
   पत्ता- डायरेक्टर, स्माल इंडस्ट्रीज सíव्हस इन्स्टिटय़ूट, मिनिस्ट्री ऑफ एसएसआय, कुर्ला-अंधेरी रोड, साकीनाका, मुंबई- ४०००७२ वेबसाइट- www.sisimumbai.com
ईमेल- dcdi-mumbi@dcmsme.gov.in

० पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन फॅमिली मॅनेज्ड बिझनेस
हा अभ्यासक्रम  एस. पी. जैन इन्स्टिटय़ूट अॅण्ड रिसर्च या संस्थेने सुरू केला आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी दीड वर्षे. ज्या कुटुंबात लहान-मोठा व्यवसाय असेल त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम खास तयार करण्यात आला आहे.
पत्ता- असिस्टंट रजिस्ट्रार, सेंटर फॉर फॅमिली मॅनेज्ड बिझनेस, एस. पी. जैन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च, भवन कॉलेज कॅम्पस मुन्शी नगर, दादाभाई रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई  ४०००५८, वेबसाइट- spjimr.org
 ईमेल- fm@spjimr.org

० स्टार्ट युवर बिझनेस
एस.पी.जैन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च संस्थेने आंत्रप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट या विषयांतर्गत  स्टार्ट युवर बिझनेस हा लघुमुदतीचा प्रशिक्षणक्रम सुरू केला आहे.
कालावधी- १२ आठवडे. ईमेल- syb.spjimr.org

०  ग्रो यूवर बिझनेस
एस.पी.जैन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च संस्थेने आंत्रप्रेन्युअरशिप डेव्हपलमेंट या विषयांतर्गत ग्रो युवर बिझनेस हा लघुमुदतीचा प्रशिक्षणक्रम सुरू केला आहे.
कालावधी- ६ आठवडे.  ईमेल- gyb.spjimr.org

० एमबीए- फॅमिली बिझनेस अँड आंत्रप्रेन्युअरशिप
    मोदी इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नालॉजी अँड सायन्स या संस्थेने हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी- दोन वर्षे. अर्हता-कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी.
पत्ता- मोदी इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नालॉजी अँड सायन्स, लक्ष्मणगढ- ३३२३११ जिल्हा- सिकर. राजस्थान.
वेबसाईट- www.mitsuniversity.ac.in
ई मेल- contact@mitsuniversity.ac.in

० पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन आंत्रप्रेन्युअरशिप मॅनेजमेंट
वेिलगकर इन्स्टिटय़ूटच्या वुई स्कूलमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन आंत्रप्रेन्युअरशिप मॅनेजमेंट हा ११ महिने कालावधीचा अभ्यासक्रमसुद्धा उद्योजक होण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. हा अभ्यासक्रम ५० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांला करता येतो.
पत्ता- प्रि. एल. एन. वेिलगकर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अॅण्ड रिसर्च, एल. एन. रोड, माटुंगा रेल्वे स्टेशन, मुंबई- ४०००१९  वेबसाइट: www.welingkar.org

०  प्रोग्रॅम इन फॅमिली बिझनेस  
दिल्ली स्कूल ऑफ बिझनेस संस्थेने प्रोग्रम इन फॅमिली बिझनेस हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी- दोन वष्रे. अर्हता- कोणत्याही शाखेतील ५० टक्के गुणांसह पदवी.
पत्ता- दिल्ली स्कूल ऑफ बिझनेस, व्हीआयपीएस, टेक्निकल कॅम्पस, ए. यू. ब्लॉक, आऊटरिरग रोड, पितमपुरा
दिल्ली- ११००३४,  वेबसाइट- www.dsbe.edu
 ईमेल- contact@dsbe.edu

० इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ आंत्रप्रेन्युअरशिप
या संस्थेमार्फत एक ते पाच दिवसांचे उद्योजकता विकासाचे प्रशिक्षण कार्यक्रम वर्षभर चालवले जातात.
पत्ता- इन्स्टिटय़ूट ऑफ आंत्रप्रेन्युअरशिप, बशिष्ट चारियाली, एन.एच.३७, बायपास, गेम व्हिलेज, लालमाती, गौहाटी- ७८१०२९.
वेबसाइट-iie.nic.in
ईमेल- director@iie.gov.in

० आणखी काही उद्योजकतेविषयीचे अभ्यासक्रम-
* अॅमिटी बिझनेस स्कूल नॉयडा- एबीए इन आंत्रप्रेन्युअरशिप. (एबीए- अप्लाइड बिहेव्हिअरल अॅनालिसिस)
* आयआयएम इंदोर- स्पेशलायझेशन इन फॅमिली ओन्ड बिझनेस अॅण्ड आंत्रप्रेन्युअरशिप
* इंटरनॅशनल कॉलेज ऑफ फॅशन दिल्ली- एबीए इन आंत्रप्रेन्युअरशिप (फॅशन)
* केआयआयटी स्कूल ऑफ मॅनेजमेंट भुवनेश्वर- एबीए इन आंत्रप्रेन्युअरशिप
* एक्सएलआरआय जमशेदपूर- सर्टििफकेट इन आंत्रप्रेन्युअरशिप मॅनेजमेंट
* टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स, मुंबई- एमए इन सोशल आंत्रप्रेन्युअरशिप
* निरमा इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद- एमबीए इन फॅमिली बिझनेस अॅण्ड आंत्रप्रेन्युअरशिप
* आयआयएम बेंगळुरू- मॅनेजमेंट प्रोग्रॅम फॉर आंत्रप्रेन्युअरशिप अॅण्ड फॅमिली बिझनेस.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2014 1:06 am

Web Title: study of entrepreneur
Next Stories
1 कागदापासून मायक्रोस्कोप!
2 विज्ञान-तंत्रज्ञान
3 भावनिक बुद्धिमत्ता
Just Now!
X