नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, नेवेली येथे पदवीधर इंजिनीअरांसाठी थर्मल इंजिनीअरिंग विषयातील अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत-

जागांची संख्या व तपशील – अभ्यासक्रमासाठी उपलब्ध असणाऱ्या जागांची एकूण संख्या ७७ असून त्यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्जदारांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग यासारख्या विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
निवड पद्धती – अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षा व मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
अर्जासह पाठवायचे शुल्क – अर्जासह ८०० रु. प्रवेश शुल्क रोखीने भरण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या http://www.nptineyveli.in या संकेतस्थळाला भेट द्यावी व शुल्क स्टेट बँकेच्या कुठल्याही शाखेत भरावे.
अधिक माहितीसाठी संपर्क – अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटच्या दूरध्वनी क्र . ०४१४२- २६९८७४ वर संपर्क साधावा अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.nptineyveli.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख – विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले प्रवेश अर्ज दि प्रिंसीपॉल-डायरेक्टर, नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, सदर्न रिजन, ब्लॉक- १४, नेव्हेली ६०७८०३ या पत्त्यावर २९ डिसेंबर २०१४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.