web-knowledge1LinkedIn.com
LinkedIn.com  तसंच LinkedIn चं मोबाइल अ‍ॅप प्रोफेशनल नेटवìकगसाठी लोकप्रिय आहे. िलक्डइनवरून नोकऱ्या शोधण्याचे तसेच फ्रीलान्सरना काम मिळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. यावर अकाऊंट उघडल्यावर तुम्ही तुमचे शिक्षण, कामाचा अनुभव आदी तुमच्या नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित माहिती भरायची असते. त्यामार्फत तुम्ही तुमच्या व्यवसायाशी संबंधित व्यावसायिकांशी तसेच कंपन्यांच्या प्रोफाइलशी जोडले जाऊ शकता. तुमच्या प्रोफाइलनुसार िलक्डइन तुम्हाला त्या-त्या इंडस्ट्रीमधल्या नोकरीच्या संधीचीही माहिती देते. पसे भरून प्रीमियम अकाऊंटची सोय घेतल्यास तुम्हाला हीच सेवा चांगली आणि तुम्हाला हवी तशी मिळते. यावर तुमच्या ओळखीचे व्यावसायिक किंवा कलिग तुम्हाला तुम्ही कोणत्या कौशल्यात चांगले आहात हे एन्डोर्स करू शकतात. उदा. एखादी व्यक्ती अकाऊंट्समध्ये तज्ज्ञ असेल तर तुम्ही तसे एन्डोर्स केल्यास तिच्या प्रोफाइवर ते दिसते, तसेच किती व्यक्तींनी एन्डोर्स केले आहे हेही दिसते. शिवाय रेकमेंडेशन देण्याचीही सोय यावर आहे, ज्याचा फायदा जॉब बदलताना होऊ शकतो. अ‍ॅण्डॉइड, ब्लॅकबेरी, आयओएस अशा सगळ्याच प्लॅटफॉर्मवर हे अ‍ॅप आहे.काही दिवसांनी ईमेल करायचा असल्यास तसं आधीच सेटिंग करून ठेवल्यास विशिष्ट दिवशी मेल करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अ‍ॅन्ड्रॉइड व आयओएससाठी हे अ‍ॅप उपलब्ध आहे.

Glassdoor
Glassdoor  हे अ‍ॅप (www.glassdoor.com) सध्या जॉब मार्केटमध्ये काय चाललेय, त्यातले चढउतार याबाबतची माहिती मिळवण्यासाठी आपल्याकडे असायलाच हवे. यात तुम्हाला नोकऱ्यांच्या संधी शोधता येतातच, शिवाय त्या सेव्हही करून ठेवता येतात. तसेच कंपन्या किती पगार ऑफर करताहेत याची तुलना करता येते. त्या जॉबबद्दल किंवा कंपनीबद्दल इतर व्यावसायिकांनी केलेल्या कमेंट्स वाचता येतात. नोकरीच्या मुलाखतीला जाताना कोणते महत्त्वाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याबाबतची माहितीही इथे दिलेली असते. पुश नोटिफिकेशनद्वारे या अ‍ॅपमार्फत आपल्याला नव्या जॉबची माहिती मिळते. हे अ‍ॅप अ‍ॅण्डॉइड, आयओएस या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

Pocket Resume
हे आयओएस आणि ब्लॅकबेरी या प्लॅटफॉर्मसाठी असलेले अ‍ॅप अफलातून आहे. कारण तुमच्या व्यक्तिमत्त्वाची पहिल्यांदा छाप पडते ती तुमच्या रेझ्यूमेद्वारे! तो जर का चांगला किंवा अपडेटेड नसेल तर तुमचे नुकसान होऊ शकते. हे अ‍ॅप तुमचा रिझ्यूमे आवश्यकता असल्यास रि-डिझाइन करते किंवा माहिती अपडेट करते. हे करत असताना त्या फाइलमध्ये रिफॉरमॅटिंग होत असल्याने त्याची मांडणीही हलत नाही. इथे रिझ्यूमेच्या टेम्पलेट्सही पाहायला मिळतात. pocketresume.net  या वेबसाइटचाही वापर करता येऊ शकतो.

भाषांतरासाठी उपयुक्त साइट्स
इंग्रजी, तसेच जपानी, फ्रेंच, जर्मन अशा परदेशी भाषा तसेच स्थानिक भाषा तज्ज्ञांना फ्रीलान्स भाषांतरकार किंवा दुभाष्या म्हणून कामे मिळवण्यासाठी translatorscafe.com  व translationdirectory.com या दोन वेबसाइट्स अत्यंत उपयुक्त आहेत. या वेबसाइट्स भाषांतर आदी कामे घेणाऱ्या संस्था किंवा कंपन्या आणि भाषांतरकार यांच्यातल्या दुव्याचे काम करते. या वेबसाइटवर आपण आपला व्यावसायिक म्हणून प्रोफाइल तयार करायचा असतो. त्यात तुम्ही रोज किती भाषांतर करू शकता, शिक्षण, भाषांतराचा दर, सॉफ्टवेअरचा वापर आदी गोष्टी भरल्यानंतर तुम्हाला ईमेलने नोटिफिकेशन्स यायला सुरुवात होते. त्यानुसार तुम्ही कामांसाठी अर्ज करू शकता. याशिवाय पोस्ट केलेल्या कामांसाठी तुम्ही बीिडग म्हणजे बोलीदेखील लावू शकता. या वेबसाइट्स तुम्हाला कोणत्या कंपन्या ब्लॅक लिस्टेड आहेत हेही सांगतात, जेणेकरून त्यांच्याशी आपण व्यावसायिक संबंध जोडू नयेत. इथे पसे भरून प्रीमियम अकाऊंटच्या सुविधाही घेता येतात.