हा शब्द आला की लगेचच शिवाजी राजांची आठवण होते. ‘क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज..’ अशी वाक्ये कानात घुमू लागतात. पण कुलावतंस शब्द आला कुठून? याचा अर्थ काय, असा विचार केल्यास कुल म्हणजे कूळ, कुटुंब, खानदान असा अर्थ सापडतो. मग ‘..वतंस’ म्हणजे काय बुवा? तर वतंस नव्हे तर अवतंस. कुल + अवतंस या दोन शब्दांच्या संधीतून कुलावतंस हा शब्द तयार झालेला आहे. अवतंस म्हणजे पुष्पे, रत्ने घालून तयार केलेले शिरोभूषण किंवा मुकुट. असे हे शिरोभूषण धारण करणारा कोण? तर कूळप्रमुख त्या काळानुसार अर्थातच राजा. म्हणजेच कुळासाठी भूषण ठरलेला, कुळाला स्वकतृत्त्वाने शोभिवंत करणारा तो कुलावतंस. यात महत्त्वाची आणि लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे अनुस्वार हा ‘त’वर आहे ‘व’वर नाही.

उचलबांगडी 

kolhapur lok sabha marathi news, sanjay mandlik kolhapur marathi news
कोल्हापूरच्या आखाड्यात दत्तक प्रकरण तापणार ?
Aurangzeb had changed the name of Pune to 'Muhiabad' after chatrapati shivaji maharaj death
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबानं पुण्याला दिलं होतं ‘हे’ नाव; जाणून घ्या इतिहास
Harsh Goenka shares video
ग्वाल्हेरच्या राजवाड्यात राजेशाही जेवणाचा थाट! पाहा, कसे वाढले जाते महाराजांचे ताट; हर्ष गोयंकांनी शेअर केला Video
shahu chhatrapati marathi news, bhagat singh sukhdev rajguru kolhapur marathi news
शहीद दिनानिमित्त शाहू महाराजांचे अभिवादन

‘अमुकप्रकरणी तमुक एखाद्या अधिकाऱ्याची उचलबांगडी केली.’ वगैरे आपण अनेकदा वाचतो. ऐकतो. बोलतोही. एखाद्या व्यक्तीला त्याच्या इच्छेविरुद्ध एखाद्या पदावरून बाजूला करणे म्हणजे त्याची उचलबांगडी करणे. या शब्दातील ‘उचल’चा अर्थ लक्षात येतो पण ‘बांगडी’चं प्रयोजन कळत नाही. खरे तर हा शब्द उचलपांगडी असा होता. ‘पांगडी’ म्हणजे माणसाला हात-पाय बांधून पांगळे करण्याची स्थिती. एखाद्या मनुष्याला जबरदस्तीने हटवायचे असल्यास त्याचे हातपाय बांधून त्याला उचलण्यात येते. त्यावरून तयार झाला ‘उचलपांगडी’; म्हणजे एखाद्या व्यक्तीची पांगडी करून त्याला उचलून फेकून देणे. शिवाय पांगडी म्हणजे मासे धरण्याचे, कोळ्यांचे मोठे जाळे. जाळ्यात भरपूर मासे अडकले की कोळी लोक या पांगडीची टोके पकडून ताकदीने ते बाहेर काढतात आणि एकदम किनाऱ्यावर फेकून देतात. त्यावरून नको असलेल्या एखाद्याला बाजूला काढणे या अर्थानेही उचलपांगडी हा शब्द तयार झालेला असू शकतो. पण पुढे वहिवाटीत ‘प’चा ‘ब’ झाला आणि पांगडीचे बांगडी झाले. आणि उचलबांगडी हा शब्द रूढ झाला.