कोइम्बतूरमधील एका गावात राहणाऱ्या अरुणाचलम मुरुगनंथम यांना सॅनिटरी नॅपकीन तयार करणाऱ्या यंत्राची निर्मिती करण्यात यश आलं. या यंत्राच्या मदतीने आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या महिलांनासुद्धा परवडू शकतील असे सॅनिटरी नॅपकीन मुरुगनंथम यांनी तयार केले. या यंत्रामुळे देशातल्या महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

कोणत्याही संशोधनाची पहिली पायरी म्हणजे समस्येचं आकलन. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटना डोळे उघडे ठेवून पाहिल्यास अशा अनेक समस्या आपल्याला जाणवायला लागतात. पण, या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने मात्र फारच थोडय़ा व्यक्ती प्रयत्न करतात. अशाच एका प्रयत्नशील व्यक्तींपकी एक आहेत अरुणाचलम मुरुगनंथम.
मुरुगनंथम हे तामिळनाडूतल्या कोइम्बतूर मधल्या पुदूर गावात राहतात. लहानपणी एका अपघातामध्ये वडील वारल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या आईवर आली. फारसं शिक्षण नसलेली त्यांची आई इतरांच्या शेतावर मोलमजुरीची कामं करायला लागली. आईचा भार हलका करण्यासाठी मुरुगनंथम यांनी दहावीनंतर शिक्षण सोडलं आणि काही नोकरी मिळते का, याचा शोध सुरू केला. आर्थिक ओढाताणीच्या त्या काळात मुरुगनंथम यांनी अनेक नोकऱ्या केल्या. एखाद्या कंपनीत कधी मशीन ऑपरेटर, कधी वेिल्डग करणारा हेल्पर, कधी विमा कंपनीत एजंट, तर कधी सूत गिरणीत तयार होणारं सूत विकणारा एजंट किंवा एखाद्याच्या शेतात मजूर म्हणून मुरुगनंथम यांनी काम केलं. जवळपास तीन दशकं त्यांना आर्थिक चणचणीचा सामना करावा लागला. त्याच दरम्यान मुरुगनंथम यांच्या आयुष्यात एक घटना घडली. वरवर साधी वाटणारी ही घटना मुरुगनंथम यांच्यातला संशोधक जगासमोर आणण्यासाठी कारणीभूत ठरली.
मुरुगनंथम यांनी आपल्या पत्नीला जुन्या कापडाचे तुकडे घेऊन बाथरूममध्ये जाताना बघितलं. हे कपडे कशासाठी नेतेस, अशी विचारणा केल्यावर ‘तुम्हा पुरुषांना याबद्दल काय सांगणार?’ असं त्यांची पत्नी त्यांना म्हणाली. या उत्तरावरून मुरुगनंथम यांना समजलं की, आपली पत्नी मासिक पाळी दरम्यान हे वापरलेल्या कापडाचे तुकडे उपयोगात आणते. असल्या वापरलेल्या टाकाऊ कापडांपेक्षा सॅनिटरी नॅपकीन का वापरत नाहीस, असं मुरुगनंथम यांनी विचारल्यावर त्यांची पत्नी त्यांना म्हणाली, ‘घरातल्या सगळ्या बायका जर अशा सॅनिटरी नॅपकीन वापरायला लागल्या तर महिन्याला येणारा दुधाचा खर्च कमी करायला लागेल!’
पत्नीने दिलेल्या उत्तरामुळे सर्वसामान्य महिलांची स्थिती काय असते, याची कल्पना मुरुगनंथम यांना आली. घरातली स्त्री आपल्या आरोग्यापेक्षा आपल्या कुटुंबाला जास्त महत्त्व देते, स्वत:च्या गरजांपेक्षा कुटुंबातल्या इतर व्यक्तींच्या गरजा तिला जास्त महत्त्वाच्या वाटतात आणि या गरजा भागवण्यासाठी ती कुणालाही न सांगता अनेक तडजोडी करत असते.
आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे सॅनिटरी नॅपकीन विकत न घेऊ शकणाऱ्या आपल्या देशातल्या महिलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, असं मुरुगनंथम यांना मनोमन वाटलं. आरोग्याला अपायकारक ठरणार नाहीत आणि सगळ्यांना परवडतील असे सॅनिटरी नॅपकीन तयार करण्याच्या दृष्टीने मुरुगनंथम विचार करायला लागले. सुरुवातीला त्यांनी कापूस वापरून सॅनिटरी नॅपकीन तयार केले. पण त्यांचा अपेक्षित परिणाम आढळला नाही. मग मुरुगनंथम यांनी बाजारात उपलब्ध असलेल्या सॅनिटरी नॅपकीन्सचा अभ्यास केला. या नॅपकीन्समध्ये त्यांना लाकडापासून तयार केलेल्या तंतूंचा वापर केल्याचं आढळून आलं. या तंतूंची द्रव पदार्थ शोषून घेण्याची क्षमता चांगली होती आणि या तंतूंमुळे पॅडचा आकार कायम राखला जात होता.
मुरुगनंथम यांनी मग खास मुंबईमधून त्यांना हवा तो कच्चा माल मागवला आणि हा कच्चा माल वापरून सॅनिटरी नॅपकीन तयार करण्याचं एक यंत्र तयार करण्याच्या कामाला ते लागले. शाळेत असताना लागलेली विज्ञानाची आवड आणि या आवडीमुळे अनेकदा विज्ञान प्रदर्शनात घेतलेल्या सहभागाचा अनुभव त्यांना या वेळी उपयोगी पडला. इतरांच्या शेतात मजुरी करताना कोणती यंत्रे नादुरुस्त झाली की, मुरुगनंथम ती दुरुस्त करत असत. त्यामुळे त्यांना यंत्रांची चांगली जाण होती.
२००४ साली मुरुगनंथम यांना सॅनिटरी नॅपकीन तयार करणाऱ्या यंत्राची निर्मिती करण्यात यश आलं. या यंत्राच्या मदतीने आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या महिलांनासुद्धा परवडू शकतील असे सॅनिटरी नॅपकीन मुरुगनंथम यांनी तयार केले आणि आजूबाजूला राहणाऱ्या महिलांना वापरण्यासाठी दिले. या सॅनिटरी नॅपकीनचे चांगले परिणाम मिळाले.
मुरुगनंथम यांनी आपल्या यंत्रात सुधारणा घडवून आणल्या आणि दिवसाला सुमारे एक हजार सॅनिटरी नॅपकीन तयार होऊ शकतील असं सुधारित यंत्र बनवलं. या यंत्राच्या मदतीने चार टप्प्यांत सॅनिटरी नॅपकीन तयार केले जातात. विशेष म्हणजे, तयार झालेले नॅपकीन अतिनील किरणांच्या मदतीने र्निजतुक करण्याचीही सोय या यंत्रात आहे.
मुरुगनंथम यांनी तयार केलेल्या या यंत्राचा उपयोग केवळ सॅनिटरी नॅपकीन तयार करणं एवढाच नसून या यंत्रामुळे देशातल्या महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
या यंत्राचं एकस्व मिळण्यासाठी आणि या यंत्राचा देशभरात प्रसार करण्यासाठी मुरुगनंथम यांना नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन या संस्थेने मदत केली आहे. त्यामुळे मुरुगनंथम यांना आपल्या जयश्री इंडस्ट्रीजच्या माध्यमातून देशातल्या २३ राज्यांमध्ये सुमारे २२५ पेक्षा जास्त यंत्रांची विक्री करणं शक्य झालं आहे.  
ँ३३स्र्://ल्ली६्रल्ल५ील्ल३्रल्ल२.्रल्ल/ या संकेतस्थळावर मुरुगनंथम यांनी तयार केलेली सविस्तर माहिती दिलेली आहे. सर्वसाधारणपणे, सॅनिटरी नॅपकीन तयार करणाऱ्या यंत्राची किंमत सुमारे साडेतीन कोटी रुपये इतकी असते. पण मुरुगनंथम यांनी तयार केलेली यंत्रे मात्र केवळ ७५ हजार ते तीन लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. ही यंत्रे दर मिनिटाला दोन सॅनिटरी नॅपकीन तयार करतात. या यंत्रांच्या मदतीने एक ते दीड रुपयापेक्षाही कमी किमतीत सॅनिटरी नॅपकीन कसा तयार करता येऊ शकतो आणि या लघुउद्योगातून महिलांना कसा फायदा होऊ शकतो, याचं गणितसुद्धा मुरुगनंथम यांनी आपल्या संकेतस्थळावर मांडलेलं आहे. आपल्या देशात महिला बचत गटाची संकल्पना आता रुजायला लागली आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून हे यंत्र विकत घेऊन महिलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करणं शक्य आहे.
विज्ञानाची आवड आणि यंत्रांची जाण असलेल्या अरुणाचलम मुरुगनंथम या तुमच्या-आमच्यातल्या संशोधकाने या यंत्राच्या निर्मितीमुळे अनेक मान-सन्मान मिळवले आहेत. पण, या मान-सन्मानांपेक्षा कुटुंबाचं हित डोळ्यासमोर ठेवून अनेक तडजोडी करणाऱ्या आपल्या देशातल्या लाखो महिलांची समस्या सोडवून मिळणारं समाधान मुरुगनंथम यांना महत्त्वाचं वाटतं.  
 ल्ल      
        ँीेंल्ल३’ंॠ५ंल्ल‘ं१@ॠें्र’.ूे

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास