उद्योजकतेचे कौशल्य शिकवणाऱ्या काही महत्त्वाच्या अभ्यासक्रमांची माहिती-
उद्योजकता ही शिकता येते, या तत्त्वाला अनुसरून देशभरातील अनेक महत्त्वाच्या शिक्षणसंस्थांमध्ये उद्योजकता अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. उद्योजकता विषयक देशभरातील प्रमाणपत्र, पदविका अथवा पदव्युत्तर पदवी अशा विविध प्रशिक्षणक्रमांची माहिती पुढीलप्रमाणे आहे-
० आंत्रप्ररिन्युरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या संस्थेने ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस आंत्रप्ररिन्युरशिप’ हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी दोन वर्षे. अर्हता – कोणत्याही विषयातील पदवी. हा अभ्यासक्रम एमबीएच्या समकक्ष समजला जातो. पत्ता- पीजीपी सेक्रेटरिएट, ईडीआय, पोस्ट ऑफिस भट- ३८२४२८, जिल्हा गांधीनगर, वेबसाइट- http://www.ediindia.ac.in
ईमेल- pgp@ediindia.org
० इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंटने ‘सर्टििफकेट इन आंत्रप्ररिन्युरशिप’ हा सहा महिने कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी. युवक-युवतींना नवीन व्यावसायिक संधीचा शोध घेता येणे शक्य व्हावे या अनुषंगाने या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. पत्ता- स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सटिी मदान घारी, नवी दिल्ली- ११००६८
ईमेल- soms@ignou.ac.in
० एस. पी. जैन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च या संस्थेने ‘स्टार्ट युवर बिझनेस सर्टििफकेशन प्रोग्रॅम’ हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या युवकांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो. या अभ्यासक्रमात व्यवसाय जगताशी संबंधित विविध पलूंची माहिती दिली जाते. हा अभ्यासक्रम दर शनिवारी आणि रविवारी  असा ११ आठवडे शिकवला जातो. पुढील सत्र ५ सप्टेंबर २०१५ पासून सुरू होणार आहे. पत्ता- चेअरपर्सन, सेंटर ऑफ आंत्रप्रेरिन्युरशिप, एस. पी. जैन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च, भवन्स कॉलेज कॅम्पस, मुन्शी नगर, दादाभाई रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई- ४०००५८
ईमेल- msrao@spjime.org
वेबसाइट- http://www.spjime.org
० प्रि. एल. एन. वेिलगकर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड रिसर्च अंतर्गत कार्यरत वुई स्कूल या संस्थेने ‘डिप्लोमा इन आंत्रप्ररिन्युरशिप’ हा सहा महिने कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमात स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य आणि त्यासाठी लागणाऱ्या संसधानाचे व्यवस्थापन आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. पत्ता- प्रि. एल. एन. वेिलगकर्स इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड रिसर्च, लक्ष्मी नप्पू रोड, माटुंगा जिमखान्याच्या विरुद्ध दिशेला, माटुंगा, मुंबई- ४०००१९,
वेबसाइट- http://www.welingkaronline.org  pgdmdlp@welingkarmail.org

० सिम्बॉयसिस सेन्टर फॉर डिस्टन्स लìनगने ‘सर्टििफकेट प्रोग्रॅम इन आंत्रप्रेरिन्युरशिप’ हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. नवीन उत्पादनासाठी वा सेवांच्या कल्पना, व्यवसायाचा आराखडा, वित्तीय आराखडा, नियोजनपूर्तीसाठीची साधने, व्यावसायिक संधी, विक्री, विपणन, मनुष्यबळ विकास आदी विषयांचा समावेश या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. कालावधी- सहा महिने, पत्ता- सिम्बॉयसिस सेंटर फॉर डिस्टन्स लìनग, सिम्बॉयसिस भवन, १०६५, बी, गोखले क्रॉस रोड, मॉडेल कॉलनी, पुणे- ४११०१६
वेबसाइट- http://www.scdl.net
० नरसी मोनजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंटने ‘एमबीए इन आंत्रप्रेरिन्युरशिप अ‍ॅण्ड फॅमिली बिझनेस’ हा  दोन वष्रे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. पत्ता- स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, एसव्हीकेएम, नरसी मोनजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, व्ही. एल. मेहता रोड, विलेपाल्रे (पश्चिम), मुंबई- ४०००५६
ईमेल-enquiry@nmims.edu
वेबसाइट- http://www.nmims.edu
० अ‍ॅमिटी बिझनेस स्कूलने ‘एमबीए इन आंत्रप्रेरिन्युरशिप’ हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. कालावधी- दोन वष्रे. पत्ता- अ‍ॅमिटी बिझनेस स्कूल, एफ-३, ब्लॉक, अ‍ॅमिटी युनिव्हर्सटिी कॅम्पस, सेक्टर- १२५, नॉयडा- २०१३०३,
ईमेल- admissions@amity.edu
वेबसाइट-  http://www.amity.edu
० थडोमल सहानी सेंटर फॉर मॅनेजमेंट या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन आंत्रप्रेरिन्युरियल मॅनेजमेंट’ हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. पत्ता- थडोमल सहानी सेंटर फॉर मॅनेजमेंट, २५७, स्वामी विवेकानंद रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई- ४०००५०
वेबसाइट- centreformanagement.com ईमेल- info@centreformanagement.com
– सुरेश वांदिले

mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
cashew farmer marathi news, konkan farmer marathi news
काजू वायदे : कोकणातील उत्पादकांना वरदान
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!